अमेरिकेत बेवारस सोडून दिलेल्या ट्रक मध्ये सापडले 46 मृतदेह

न्युयॉर्क – अमेरिकेतील टेक्‍सास प्रांतातील सॅन अँतोनिओ येथे रस्त्यावर बेवारस सोडून दिलेल्या एका ट्रक मध्ये 46 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी या ट्रकचा ताबा घेऊन तपास केला असता त्यात काही जीवंत माणसेही आढळून आली आहेत. अशा 16 जणांना वाचवण्यात आले आहे. त्यात चार मुलांचाहीं समावेश आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचवण्यात … Read more

अमेरिकेत आठवडाभरात 2,700 विमान उड्डाणे रद्द

वॉशिंग्टन – अमेरिकेत खराब हवामानामुळे विमान उड्डाणे रद्द होण्याचा प्रकार सुरूच राहिला आहे. शनिवारी मोठ्या संख्येने देशांतर्गत विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले. खराब हवामानाबरोबरच ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रवाशांची घटलेल्या संख्येमुळेही मोठ्या संख्येमुळे विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. गेल्या आठवड्याभरात अमेरिकेत एकूण 2,723 विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. जगभरात एकूण 4,698 … Read more

अमेरिकेत कोविड रिलीफ फंडामधून 100 अब्ज डॉलरची चोरी

वॉशिंग्टन – कोविड कालावधीमध्ये डबघाईला आलेल्या उद्योग आणि बेरोजगार झालेल्यांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोविड रिलीफ फंडातून 100 अब्ज डॉलरची चोरी झाल्याचे अमेरिकेतील गोपनीय सेवा विभागाने म्हटले आहे. सिक्रेट सर्व्हिस आणि लेबर डिपार्टमेंटने उपलब्ध करून दिलेल्या डाटाच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. कोविड रिलीफ फंडाचे राष्ट्रीय समन्वयक रॉय डॉस्टन यांनी ही माहिती दिली … Read more

अमेरिकेतील चक्रीवादळात 100 लोकांचा मृत्यू

टेनेसी (केंटुकी, अमेरिका) – अमेरिकेतील केंटुकी प्रांतात आलेल्या चक्रीवादळातील बळींची संख्या 100हून अधिक झाली आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका केंटकी प्रांतासह इलिनॉइस येथील अमेझॉनच्या केंद्राला बसला आहे. अमेरिकेत ताशी 320 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे 6 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. एकट्या केंटुकीमध्ये 70हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. … Read more

अमेरिकेत व्यापक लॉकडाऊनचा विचार नाही – बायडेन

वॉशिंग्टन- दक्षिण अफ्रिकेत सापडलेला नवीन विषाणु ही आमच्यासाठी चिंतेची बाब असली तरी त्यातून आमच्याकडे गोंधळाची स्थिती नाही. या संबंधात व्यापक लॉकडाऊन लागू करण्याचा प्रस्ताव आमच्या विचाराधिन नाही असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकन नागरीकांनी बुस्टर डोस सह आता पुर्ण लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले. मास्क वापरण्याचे निर्बंधही नागरीकांना प्रामाणिकपणे … Read more

CoronaVaccine : भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीला अमेरिकेत परवानगी नाकारली

नवी दिल्ली – करोना संसर्गाविरुद्धच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या कोवॅक्सिन लसीची निर्माता भारत बायोटेक कंपनीसंदर्भात निराशाजनक वृत्त आलं आहे. अमेरिकेत भारत बायोटेकच्या लसीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळू शकलेली नाही. तर भारतात कोवॅक्सिन लस पूर्ण क्षमतेने देण्यात येत आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन अर्थात एफडीएने भारत बायोटेकच्या कोविड लसीच्या आपात्कालीन वापरासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे … Read more