पुणे | मोबाईल मेडिकल व्हॅनचे लोकार्पण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सकस अन्नधान्याचा पुरवठा, आजाराचे वेळेवर निदान करणारी सुविधा आणि आजार झाल्यास किफायतशीर दरातील उत्तम उपचार या आरोग्याच्या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या मोबाईल मेडिकल व्हॅनचे लोकार्पण करताना पाटील बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश … Read more

पुणे | देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे लोकार्पण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भारतीय संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये दिली आहेत. देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानात दिलेली कर्तव्ये पार पाडली तर ते महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन जनरल ऑफिसर, कमांडिंग इन चिफ दक्षिण कमांड लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी केले. भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुपच्या … Read more

पुणे जिल्हा | सासवड येथे वैकुंठ रथाचे लोकार्पण

सासवड,(प्रतिनिधी) – येथे तुकाराम महाराज बीज निमित्त श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्था यांच्या वतीने अडीच लाख रुपये खर्च करून वैकुंठ रथ लोकार्पण सोहळा बुधवारी (दि. 27) आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पार पडला. सकाळी नगरपालिके समोरुन रथाची मिरवणूक काढण्यात आली. नगरपालिका ते कन्हैया चौक, नेताजी चौक, भैरमपूरा चौक, मार्गे मारुती मंदिर येथून संत सोपानदेव … Read more

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य सेवांचे लोकार्पण

मुंबई : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने डोंबिवली पूर्व येथील सुतिकागृह या ठिकाणी पीपीपी तत्वावर विकसित केल्या जाणाऱ्या मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर हॉस्पिटलच्या भूमिपूजनासह विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा रविवारी (३ मार्च) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुखकर करण्यासाठी शासन, प्रशासन आणि … Read more

पुणे जिल्हा : बांगाच्या ओतूर शाखेचे दिमाखात उद्घाटन

टायर्स मल्टी ब्रॅण्डेड शोरूम ग्राहकांच्या सेवेत रुजू ओतूर – जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर येथे नामांकित बांगा टायर्स मल्टी ब्रँड शोरूमचे उद्घाटन शनिवारी (दि. 24) विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी याकोहामा टायरचे एजीएम नितीन कलदगी, अनुपम सिंग राणा, विजय सिन्हा उंदरे, विनायक पाटील, चरणजीत … Read more

नगर | इंडो-आयरिश हॉस्पिटलचे नितीन गडकरी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी ला लोकार्पण

नगर, (प्रतिनिधी) – येथील इंडो-आयरीश जनरल ॲण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा दि.२६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता केंद्रीय दळणवळणमंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. अत्याधुनिक आरोग्यसेवेला विश्वास व सामाजिक बांधिलकीची जोड देणार असल्याची माहिती डॉ. दिलीप जोंधळे यांनी दिली. या सोहळ्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ.संग्राम भय्या जगताप, मा. … Read more

नगर | शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिवजयंती मुहूर्तावर लोकार्पण

शेवगाव, (प्रतिनिधी)- पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे सोमवारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर लोकार्पण होणार आहे. जुन्या पंचायत समितीच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे स्थलांतर नवीन प्रशासकीय इमारतीसमोर करावे, अशी तालुक्यातील शिवप्रेमींची इच्छा होती. माजी सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. त्यासाठी भरीव निधीची तरतूदही केली. … Read more

पिंपरी | खोपोलीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्‍घाटन

खालापूर,(वार्ताहर) – खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आमदार चषकाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्‍घाटन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.खोपोलीतील डीपी रोड ग्राउंडवर या स्पर्धा येत्या १९ फेब्रुवारी होमार आहेत. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम उपस्थित होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी संतोष जंगम होते. प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, माजी नगरसेवक मोहन औसरमल, शेकापक्षाचे तालुका … Read more

पुणे जिल्हा | जिल्हा ग्राहक पंचायत संस्थेचे उद्घाटन

रांजणगाव गणपती, (वार्ताहर)- रांजणगाव महागणपती सभागृहामध्ये ग्राहक पंचायत या राज्यव्यापी नवीन संस्थेचा उद्घाटन समारंभ पार पडला. ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या विचाराने व सोबत काम करून प्रेरित होऊन सामाजिक कार्यकर्ते अशोक रावसाहेब भोरडे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी व ग्राहकांना शोषणमुक्त करण्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे. यानिमित्ताने निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे, … Read more

पुणे | मुक्तछंदच्या धागा प्रदर्शनाचे उद्घाटन

Businesses self-help

पुणे {प्रभात वृत्तसेवा} – महिलांना घरगुती व्यापातून बाहेर काढून व्यावसायिकतेकडे नेण्याची गरज असून, त्यासाठी महिला व्यावसायिक व बचत गटांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व मदतकेंद्र कोथरूड परिसरात उभे करावे. त्यासाठी डाॅ. मेधा कुलकर्णी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. मुक्तछंदतर्फे स्वयंरोजगाराचा धागा विणणाऱ्या पुण्यातील महिला उद्योजकांच्या उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन उपसभापती … Read more