आफ्रिकेत बहुपयोगी आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन

जोहान्सबर्ग : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारतानं दक्षिण आफ्रिकेत सुरु केलेल्या बहुपयोगी आंतरराष्ट्रीय केंद्राचं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि नायजेरियाचे अध्यक्ष महामदू इसोफू यांनी संयुक्तरित्या काल उद्घाटन केले. हे आंतरराष्ट्रीय केंद्र भारत आणि नायजेरियामधल्या सदृढ मैत्रीचे प्रतिक आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे जारी केलेल्या पत्रकात सांगण्यात आले. महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारताने … Read more

एनआयसी टेककॉन्क्‍लेव्ह 2020 चे उद्‌घाटन

रविशंकर प्रसाद दुसऱ्या एनआयसी टेककॉन्लेव्ह 2020 चे प्रसाद यांनी केले उद्‌घाटन नवी दिल्ली : जीवन सोपे आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाची रचना केली पाहिजे, असे इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) आयोजित दुसऱ्या एनआयसी टेककॉन्क्‍लेव्ह 2020 चे उद्‌घाटन करताना बोलत होते. … Read more

ग्रंथदिंडीने होणार साहित्य संमेलनाचा शुभारंभ

उस्मानाबाद : उस्मानाबादेत संत गोरोबाकाका साहित्य नगरीत आयोजित 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त गुरुवारी शहरात दीडशे प्रसिध्द साहित्यीक दाखल होणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो दाखल झाले आहेत. संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री ना.धो.महानोर मावळत्या अध्यक्षा डॉ.अरूणा ढेरे आज सायंकाळी दाखल होणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले-पाटील यांनी … Read more

पिंपरीतील नगरसेवकांमध्ये श्रेयवादाची लढाई

भाजप-राष्ट्रवादीत कलगीतुरा; एकाच पाण्याच्या टाकीचे एकाच दिवशी दोन वेळा उद्‌घाटन पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी प्रभागात उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे एकाच दिवशी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उद्‌घाटन केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मंगळवारी दहा वाजता उद्‌घाटन केल्यानंतर भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते उद्‌घाटन केले. दोन पक्षातील दोन नगरसेवकांमध्ये रंगलेला हा … Read more

उद्‌घाटन झाले, परंतु कामे अपूर्ण

पिंपरी – पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्‌डाणपुलाच्या जवळील मोकळया जागेत महापालिकेच्या वतीने गाळे उभारण्यात आले आहे. फूल बाजाराचे उद्‌घाटनही घाई-घाईत करण्यात आले. परंतु अजूनही येथील काही कामे अर्धवट आहे. व्यापारी पुढील आठवडयात पालिकेने दिलेल्या गाळयात दुकाने थाटतील. मात्र, काही कामे अर्धवट आहेत. या फूल बाजारात स्वच्छतागृह, पाण्याची सोय, वीज जोड, सुरक्षेतसाठी प्रवेशद्वार असे विविध कामे … Read more

देशाच्या पहिल्या खासगी रेल्वेचे लोकार्पण

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दाखवला हिरवा झेंडा लखनऊ ते दिल्ली मार्गावर धावणार तेजस एक्‍सप्रेस नवी दिल्ली : देशाची पहिली खासगी रेल्वे देशाच्या सेवेत दाखल झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज तेजस एक्‍सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचे लोकार्पण केले. लखनऊ ते नवी दिल्ली या मार्गावर ही नवीन रेल्वे धावणार आहे. आयआरसीटीसीद्वारे संपूर्णपणे चालविण्यात … Read more

50 इलेक्‍ट्रिक बसेस उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत!

पुणे -पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या 50 इलेक्‍ट्रिक बसेसवरची धूळ स्वातंत्र्यदिनी झटकली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ई-बसचे उद्‌घाटन होण्याची शक्‍यता आहे. पीएमपीकडे अपुऱ्या बसेसच्या पार्श्‍वभूमीवर 50 ई-बस कधीच दाखल झाल्या आहेत. मात्र, त्या भेकराईनगर येतील डेपोमध्ये धूळखात पडून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यासाठी या बसेस रस्त्यांवर आणण्यास टाळाटाळ केली जात आहे. स्मार्ट सिटी … Read more

अवसरी आरोग्य केंद्राची इमारत उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

पावणेतीन कोटी खर्च : दीड वर्षापासून मुहूर्त मिळेना अवसरी – अवसरी खुर्द येथे दोन कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुमारे गेल्या दीड वर्षे उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्‌घाटन कधी होणार आणि जनतेला आरोग्य सेवेचा लाभ कधी मिळणार, या आशेवर अवसरी ग्रामस्थ आहेत. ग्रामस्थांनी लवकरात लवकर याचे … Read more