सातव्या टप्प्यात कोणत्या जागांवर मतदान ? ; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘या’ दिग्गज नेत्यांसाठी आज मतदान

Voting for legendary leaders।

Voting for legendary leaders। लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सातव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या ५७ जागांवर मतदान होत आहे. सातव्या टप्प्यात 10.06 कोटी मतदार 904 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. सातव्या टप्प्यात कोणत्या जागांवर मतदान होत आहे? Voting for legendary leaders। लोकसभा … Read more

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचा आज ९१ वा वाढदिवस ; पंतप्रधानांसह सर्व राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंह यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त  माजी पंतप्रधानांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच सर्वपक्षीय नेत्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी, … Read more

नेपाळ: पर्यटकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश; अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली :  नेपाळमधील माउंट एव्हरेस्टजवळ हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यामुळे आत बसलेल्या सर्व सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये स्थानिक नेपाळी पायलट आणि मेक्सिकोतील एका कुटुंबाचा समावेश होता. या कुटुंबाला घेऊन जाणारे हे हेलिकॉप्टर मंगळवारी अचानक बेपत्ता झाले होते. यानंतर शोधमोहीम … Read more

मुंबई, पुण्यासह दिल्लीत मान्सून सक्रिय; हवामान विभागाची अधिकृत घोषणा

मुंबई : मागच्या एक महिन्यापासून प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने आता सगळीकडे दमदार एंट्री केलीआहे. त्यातच आता मुंबई आणि दिल्लीत मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून  करण्यात आली आहे. मुंबईत 11 जून रोजी मान्सून दाखल होण्याची तारीख आहे. तर दिल्लीत 27 जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, यावर्षी मुंबईत 14 दिवस उशिराने मान्सून … Read more

पुणे जिल्हा : वह्यांसह शालेय साहित्यांच्या दरात भरमसाठ वाढ

मंचर, घोडेगावात दुकानदारांकडून डिस्काउंट जाहीर : पालकांमधून नाराजीचा सूर मंचर – गेल्या आठवड्यापासून शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने मंचर आणि घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे स्टेशनरी दुकानात विविध शालेय साहित्य घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी शालेय साहित्यांच्या किमतीत मोठया प्रमाणात वाढ झाली असून, किमतीत 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ … Read more

गुजरातमध्ये दर्गा हटवण्यावरून मोठा राडा ; पोलिसांवर हल्ला, दगडफेक अन् जाळपोळीत एकाचा मृत्यू ; पोलीस उपनिरीक्षकासह अनेक जण जखमी

नवी दिल्ली : गुजरातमध्ये सध्या वातावरण चांगलेच तापले आहे.  जुनागढ येथील दर्गा हटवण्याच्या नोटीसवरून या ठिकाणी मोठा राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे.  नोटीस मिळाल्यानंतर दर्गासमोर शेकडो लोकांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. एवढंच नाही तर  पोलिसांवर दगडफेक सुरू केली. या घटनेत डेप्युटी एसपीसह चार पोलीस जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर … Read more

देशभरात उन्हाचा पारा वाढणार! अनेक राज्यात पारा 42 अंशावर जाणार?; हवामान विभागाचा इशारा

नवी दिल्ली :  देशामध्ये अगोदरच  उन्हामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. त्यातच हवामान विभागाने आणखी पुढचे दोन दिवस तापमानाचा पारा वाढण्याचा इशारा दिला आहे. देशातल्या अनेक राज्यात तापमान 45 अंशावर गेले आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा आणखी त्रास सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत कमाल तापमान 42 अंश सेल्सिअल आणि किमान … Read more

चक्र फिरले! समीर वानखेडेंसह तीन अधिकाऱ्यांच्या घरी सीबीआयचे छापे; वानखेडेंची तब्बल १३ तास चौकशी

मुंबई : एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांचे चक्र फिरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सीबीआयने धाड टाकली आहे. त्यांच्या सोबतच सीबीआयने आर्यन खान क्रूझ प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने त्यांच्या मुंबई, दिल्ली, रांची आणि कानपूरमधील एकूण 29 ठिकाणी छापेमारी केली.एवढेच नाही तर सीबीआय … Read more

मोठी बातमी ! म्यानमारमध्ये सैन्याचे संपूर्ण गावावर एअर स्ट्राईक; चिमुकल्यांसह १०० जणांचा मृत्यू, तर सरकारकडून वार्तांकन करण्यास मनाई

बर्मा : म्यानमार सैन्याकडून चक्क एका गावावर  एअर स्ट्राईक केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत लहान मुले, पत्रकारांसह तब्बल १०० लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या गावात म्यानमारच्या विरोधी गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात नागरिक सहभागी झाले होते. म्यानमार मध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमार … Read more

धक्कादायक ! उत्तराखंडमधील कारागृहात एका महिलेसह 44 कैदी HIV पॉझिटिव्ह; प्रशासन हादरले

नवी दिल्ली : उत्तराखंडमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. राज्यातील हल्दवानी तुरुंगात एका महिलेसह ४४ हून अधिक कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कैदी एचआयव्ही बाधित झाल्याने कारागृह प्रशासनाला एकच गोंधळ उडाला  आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कैद्यांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, … Read more