“हर घर तिरंगा’ अभियान “हर घर संविधान’शिवाय अपूर्ण ! डॉ. बाबा आढाव यांचे मत : मार्केट यार्डातील बाजार घटकांची बैठक

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना निश्‍चितपणे “हर घर तिरंगा’ लावला पाहिजे; परंतु त्याचबरोबर भारतीय संविधानदेखील आपल्या सर्वांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणून केंद्र शासनाने घोषित केलेली “हर घर तिरंगा’ ही घोषणा “हर घर संविधाना’शिवाय अपूर्ण ठरणार आहे, अशी भावना ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली. … Read more

#Video : केंद्र सरकारने सादर केलेलं 102 वं घटना दुरुस्ती विधेयक अपुरं – विनायक राऊत

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने सादर केलेलं 102वं घटना दुरुस्ती विधेयक अपुरं आहे. मराठा समाजापासून गुर्जरपर्यंत आरक्षण देण्यासाठी 102 वं घटना दुरुस्ती विधेयकात काय तरतूद केली हे सांगा आम्हाला? समाजासमाजाला डोकं फोडण्याची संधी या विधेयकानं दिल्याचं कुणी म्हटलं तर चूक असेल काय? मायबाप सरकार न्याय द्या. पण भांडणं लावू नका. – विनायक राऊत (शिवसेना, खासदार … Read more

अपुरी माहिती पाठवणाऱ्या पुण्यातल्या 8 लॅबला नोटीस

पुणे  – करोना बाधितांची अपुरी माहिती महापालिकेला पाठवल्याबद्दल महापालिकेने आठ “पॅथॉलॉजी लॅब’ ना नोटीस पाठवल्या आहेत. मागील आठवड्यात “लॅब’चालकांची बैठक घेऊन त्यांना संपूर्ण कल्पना देण्यात आली होती. तसेच अपुरी माहिती दिल्यास परवाना रद्द करण्याबाबत इशाराही दिला होता. तरीही आठ पॅथॉलॉजी लॅबने अपुरी माहिती दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.     खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये करोना … Read more

बावधनमध्ये खाेदकाम अपूर्णच, रस्ते दुरुस्तीचे ‘वावडे’

कोथरूड  – केबल, पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्याबाजूला कंपन्यांकडून खोदकाम केले जाते. मात्र, ते काम वेळेत पूर्ण करून आणि खड्डे तात्काळ बुजवून रस्ता व्यवस्थित करण्यात या कंपन्यांना “वावडे’च असल्याचे दिसून येते. मग ते शहरातील रस्ते असो, किंवा महामार्गालगतचे सेवा रस्ते. बावधन येथील सेवा रस्त्यावर खोदकाम करून पंधरा दिवस झाले, तरी त्याचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे याठिकाणी दररोज … Read more

निगडी उड्डाणपुलाचे काम अपूर्णच

पिंपरी (प्रतिनिधी) – निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यान चौकात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे डांबरीकरण अर्धवट आहे. पुलासाठी दिलेल्या कामाची मुदत संपून जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीही ठेकेदार काम पूर्ण करत नसल्याने उड्डाणपुलाचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवत आहे. 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन होते. … Read more

पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अजूनही अपूर्ण

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यातील वाद काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कारण आता पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचे गुरुवारी भारताने स्पष्ट केले. मात्र सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रगती झाली असल्याचे भारताने म्हटले आहे. भारत आणि चीनने सीमेवरील बहुसंख्य ठिकाणांहून आपापले सैन्य पूर्णपणे मागे घेतल्याचा … Read more