पुणे जिल्हा : इंदापूर आय कॉलेजसमोरील अनाधिकृत होर्डिंग बोर्ड हटवला

– नगरपालिकेने धडक कारवाई करीत उचलले पाऊल, तेवढ्यापुरती कारवाई नको इंदापूर – अनाधिकृत होर्डिंग कोसळून अनेकांना जीवाला मुकावे लागले. यामुळे राज्य सरकारने नगरपालिका,गाव पातळीवर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी धोकादायक असलेले होर्डिंग यामुळे एखादा अपघात किंवा जीवित हानी होऊ नये म्हणून,आदेश जारी केले आहेत.त्यामुळे इंदापूर नगर परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले असून,इंदापूर आय कॉलेजसमोरील असणारे अनधिकृत होर्डिंग … Read more

पुणे जिल्हा : इंदापूर, बारामतीत मुसळधार पावसाची बॅटिंग

शेत, रस्ते, ओढे-नाले ओव्हरफ्लो : बळीराजा सुखावला भवानीनगर – इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर, बेलवाडी, त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील काटेवाडी, पिंपळी, लिमटेक, कण्हेरी, खताळपट्टा, ढेकळवाडी परिसरामध्ये मुसळधार पावसास सुरुवात झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी संपूर्ण आभाळ एकवटल्याने मुसळधार पाऊस सुरू झाल्याने वाहन चालकांची मात्र तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी रात्री सलग सहा ते सात तास जोराचा पाऊस … Read more

पुणे जिल्हा : खडकवासलातून इंदापूरला अर्धा टीएमसी पाणी

पालकमंत्री अजित पवार यांचे अधिका-यांना निर्देश नागरिकांच्या आंदोलनाला यश इंदापूर – इंदापूर तालुक्यातील शेटफळ गढे-कळस-रूई-कौठळी-बिजवडी-तरंगवाडी भागातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. या परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची भेट घेत खडकवासलातून पाणी सोडण्यासाठी विनंती केली होती. तसेच पाण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गही रोखला होता. अखेर नागरिकांच्या … Read more

लाखेवाडीत रंगला इंदापूर, माळशिरस, माढा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

इंदापूर – इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानीगड  विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये एस. एस. सी. उत्तीर्ण सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांनी वर्षभर कष्ट मेहनत करून मिळवलेल्या यशाचे कुणीतरी कौतुक केले तर आणखी मेहनत करून उत्तुंग यश मिळवण्याची प्रेरणा … Read more

तब्बल सात दिवस इंदापूर तहसीलचे काम बंद; नागरिकांची प्रचंड गैरसोय

इंदापूर – इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांच्या शासकीय वाहनावरील चालक यांच्यावर शुक्रवार (ता.24 मे)रोजी सकाळी गौण खनिज उत्खननावर कारवाई केल्याचा राग मनात धरून हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर इंदापूर पोलिसांनी पाच जणांसह इतर आरोपी यांचेवर गुन्हा दाखल करीत यांधील तीन आरोपींना अटक ही करण्यात यश मिळवलेले होते. मात्र मुख्य आरोपी अद्यापही फरार … Read more

पुणे जिल्हा | खडकवासल्यातून इंदापूरसाठी पाणी सोडा

इंदापूर, (प्रतिनिधी)- इंदापूर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून, शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची ही तीव्र टंचाई जाणवत आहे. हातातोंडाशी आलेली शेतात असणारी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. याची गंभीर दखल घेत राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे खडकवासल्यातून इंदापूर साठी पाणी … Read more

पुणे | मग्रुरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही -रोहित पवार

पुणे- सत्तेत असताना मग्रुरीची भाषा वापरत असाल तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना दिला. येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते़. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला केलेल्या दमदाटीबद्दल भरणे यांनी मी … Read more

आईच्या हत्येप्रकरणी मुलाला जन्मठेपेची शिक्षा

बारामती –  वादविवादातून कुदळ व कुऱ्हाडीने आईची हत्या केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे. पी. दरेकर यांनी मुलास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संदिप वेताळ मिसाळ (वय ३५ वर्षे, रा. भोगवस्ती, काटी, ता. इंदापुर, जि. पुणे ) याने त्याची आई कलावतीची हत्या केली होती. या प्रकरणाची हकीकत अशी की, सदर घटना (दि. २४ … Read more

इंदापूर शहरात भरत शहा यांच्या पदयात्रेला उस्फुर्त युवकांचा प्रतिसाद

इंदापूर –  शहरातील भगवान महावीर जैन मंदिरात पुष्पहार अर्पण करून शहरात प्रचाराला सुरवात करण्यात आली.बारामती लोकसभेच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ युवक वर्ग सक्रिय झाला असून, इंदापूर शहरातील एक नंबर वार्ड पासून कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी पदयात्रेला सुरवात केली आहे. शहरातील शेकडो युवक या पदयात्रेत सामील झाले असून … Read more

‘पंतप्रधानांनी पुस्तक विक्रेत्यांचे वाटोळे केले’, इंदापूरातील पुस्तक विक्रेता थेट पीएम मोदींवर संतापला

इंदापूर – शहरातील श्रेयश व्हरायटीज, नारायणदास रामदास हायस्कूलच्या गाळ्यात असलेल्या पुस्तक विक्रेत्याने शासनाचे काय खरे आहे, पुस्तकाच्या किमती मोदींनी वाढवल्या, तरीही शासकीय पुस्तके फाटकीच येतात, असा त्रागा करत ग्राहकांवर चिडण्याचा प्रकार केला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, पुणे-इंदापुरात राष्ट्रीय महामार्गावर नारायणदास रामदास हायस्कूल असून या हायस्कूलच्या गेटवरच या पुस्तक विक्रेत्याचे दुकान आहे. आजपर्यंत … Read more