‘लय हवा आहे ‘तुतारी’ची, सत्ता बदल होणारच’ – आमदार रोहित पवार

इंदापूर – दौंड शुगर तसेच अंबालिका, जरांडेश्वर कारखान्याचे कर्मचारी प्रचाराला आले आहेत. ज्यांच्यावर कारवाई झाली तेच कर्मचारी, अजितदादांच्या गटाचा प्रचार करण्यासाठी आले आहेत. त्या कर्मचाऱ्यांची चूक नाही ते स्वाभिमानी आहेत. ते भेटतात, गप्पा मारतात, आणि जाता जाता सांगतात, लय हवा आहे, लोक म्हणतात कुणाची ते म्हणतात तुतारीची.. त्यामुळे आमचे कार्यकर्ते सांगतात, टेन्शन नॉट, अशी माहिती … Read more

पुणे जिल्हा | फडणवीसांच्या शिष्टाईमुळे वातावरण निवळले

इंदापूर, (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील महिन्यात आपल्या पक्षाचा मेळावा घेत,वेगळी ऊर्जा आपल्या गटातील कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी यांना दिली. तर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,अचानकच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना आदेश देऊन, अजित पवार गटाशी मनोमिलन करण्याचा निर्णय आपली राजकीय नीती वापरत यशस्वी केला. … Read more

शिवतारेंनंतर आज हर्षवर्धन पाटलांची मनधरणी? फडणवीस सुनेत्रा पवारांचा लोकसभेचा मार्ग सुकर करणार…

Devendra Fadnavis In Indapur|

इंदापूर – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे मार्केट कमिटी आवारामध्ये शुक्रवारी (दि. 5) दुपारी 3 वाजता भाजपचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. हर्षवर्धन पाटील म्हणाले, बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय नेतृत्वाबरोबर माझी चर्चा झाली आहे, या चर्चेसाठी त्यांनी दिल्लीला … Read more

पुणे जिल्हा | मोडी लिपी प्रशिक्षणासाठी युवकांचा प्रतिसाद

बारामती, (प्रतिनिधी)- शिवजयंती उत्सव समिती बारामती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त’ मोडी लिपी प्रशिक्षण’ चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण मोफत आहे. यास बारामतीसह इंदापूर, दौंड, फलटण, पुरंदर आदी परिसरातून युवकांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे. राजमाता जिजाऊ कार्यालय भिगवण रोड बारामती या ठिकाणी मोडी लिपी प्रशिक्षक ऍड ओंकार चावरे हे दि. … Read more

इंदापुरात महाविकास आघाडीची जाहीर सभा शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडणार

इंदापूर – येत्या २३ मार्च रोजी सकाळी दहा वाजता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्या प्रांगणावर देशाचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर सभा व शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, उद्योजक श्रीनिवास पवार, युवकचे … Read more

पुणे जिल्हा | रेडाच्या सरपंचपदी पुन्हा सुनीता देवकर

इंदापूर, (प्रतिनिधी) – रेडा (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीचे सरपंचपद पुन्हा सुनिता नानासाहेब देवकर यांचेकडे आले आहे. यासंबंधीचा आदेश राज्य शासनाच्या अव्वर सचिव नीला रानडे यांनी बुधवारी (दि. 13) काढला. त्यानंतर सुनीता देवकर यांनी गुरुवारी (दि. 14) सरपंचपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके फोडून आपला जल्लोष साजरा केला. या ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी व … Read more

पुणे जिल्हा | इंदापुरात सत्तेची मस्ती व दादागिरी वाढली

पळसदेव, (वार्ताहर) – दहा वर्षांच्या काळात इंदापूर तालुक्याची अवस्था न सांगण्यासारखी झाली आहे. गैरमार्गाने संपत्ती निर्माण करण्याच्या कामांमुळे सत्तेची मस्ती व दादागिरी वाढली आहे. यातून कमिशनाचा धंदा वाढला असून, मंजूर कामातून 46 टक्क्यांपर्यंतचा मलिदा वाटून घेतला जात आहे. टक्केवारीतही आता अ, ब, क, ड, प्रकार पडले आहेत. या भ्रष्ट कारभाराला प्रशासन वैतागले असून, सामान्य जनतेला … Read more

पुणे जिल्हा | इंदापूरकरांचा संघर्ष वाया जाऊ दिला जाणार नाही -सुनेत्रा पवार

इंदापूर, (प्रतिनिधी) – इंदापूरकर गेली वर्षभर जो संघर्ष करीत आहेत तो संघर्ष वाया जाऊन दिला जाणार नाही, असे आश्वासन बारामती हायटेक टेक्सस्टाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. कृष्णा ताटे व माजी नगराध्यक्ष अलकाताई ताटे यांच्या निवासस्थानी इंदापूरकर नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्यासाठी इंदापूरकरांशी त्या बोलत होत्या. … Read more

पुणे जिल्हा | हिंगणगाव हद्दीत मराठा समाजाकडून रस्ता रोको

वडापुरी, (वार्ताहर)- इंदापूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या व उजनी धरणाच्या समोरील पुलालगत पुणे-सोलापूर महामार्गावर हिंगणगावच्या हद्दीत सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (दि. 24) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हिंगणगाव या ठिकाणी सकल … Read more

पुणे जिल्हा | उजनी धरणाचा पाणीसाठा खालावल्याचा परिणाम

पळसदेव, (वार्ताहर) – प्राचीन बांधकाम कलेच्या अचाट सामर्थ्याचे साक्षीदार असलेले व शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास लाभलेले पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत श्री पळसनाथाचे प्राचीन मंदिर 45 वर्षे उजनी धरणाच्या पाण्यात राहूनही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. उजनी धरणाची पाणी पातळी जशी कमी होत आहे, तसे हे मंदिर पाण्याबाहेर येत आहे. सध्या मंदिराचे शीखर पूर्णपणे उघडे … Read more