‘मतमोजणी’च्यावेळी ‘इंडिया’ आघाडी दक्ष राहणार

चेन्नई  – उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या प्रक्रियेत इंडिया आघाडीचे सर्वच पक्ष अतिशय दक्ष राहणार आहेत असे द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेते आरएस भारती यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयाचा अंदाज वर्तवणारा एक्झिट पोल म्हणजे एक भूलथाप आहे आणि ते केवळ मोदी सर्वेक्षण आहे असेही त्यांनी म्हटले आहे. एक्झिट पोल केवळ काही तासांसाठी अस्तित्वात … Read more

इंडिया आघाडीला मिळणार तब्बल ‘इतक्या’ जागा…; विजय वडेट्टीवारांनी फेटाळले एक्झिट पोलचे निष्कर्ष

India Aghadi | Vijay Vadettivar – महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही एक्झिट पोलचे भाकीत फेटाळून लावले असून त्यांनी म्हटले आहे की ते केवळ केंद्रातील सत्ताधारी पक्षाला खूश करण्यासाठी केले गेले आहे. ४ जूनला सत्य बाहेर येईल आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इंडिया आघाडीचे सरकार ४ जून रोजी स्थापन होईल.महाराष्ट्रात आम्हाला ३५ पेक्षा … Read more

‘इंडियाचा अंतर्गत विरोधामुळे दारूण पराभव होईल’ – भाजप

नवी दिल्ली – इंडिया आघाडीतील अंतर्गत विरोध ठळकपणे दिसून येत आहे. त्यामुळे त्या आघाडीचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव होईल, असा दावा भाजपने मंगळवारी केला. इंडिया आघाडीतील घटक पक्ष पंजाब आणि पश्‍चिम बंगालमध्ये एकमेकांविरोधात लढत आहेत. त्या आघाडीने १ जूनला बैठक बोलावली आहे. मात्र, तृणमूल कॉंग्रेसने बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यातून इंडियामधील मतभेद, … Read more

कॉंग्रेसच्या घोषणापत्राबाबत मोदी खोटे बोलत आहेत; मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आरोप

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांची दिशाभूल करण्यासाठी कॉंग्रेसच्या घोषणापत्राबाबत चुकीची माहिती देत आहेत असा आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. हरियाणातील आपल्या पहिल्या प्रचारसभेत ते बोलत होते. कॉंग्रेस संपत्तीचे फेरवितरण आणि महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेण्याची योजना तयार करत असल्याचा मोदी यांचा दावा साफ खोटा असल्याचेही खर्गे यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसची सत्ता … Read more

‘इंडिया आघाडीच्या ऐक्यासाठी आम्ही मुद्दाम कमी जागा लढलो’; मल्लिकार्जून खर्गे यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली – इंडिया आघाडीतील घटक पक्षांना एकत्र ठेवण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जाणीवपूर्वक कमी जागा लढवल्या आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, संघटित विरोधी पक्षांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी ही तडजोड केली गेली होती आणि त्यातून इतर पक्षांना … Read more

‘प्रत्येक टप्प्यावर इंडिया आघाडी सत्तेच्या दिशेने’; अरविंद केजरीवाल यांचा दावा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांचा अंदाज घेतल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार सत्तेच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे आणि ४ जून रोजी इंडिया आघाडी सत्तेत येणार आहे असा दावा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात इंडिया आघाडी सत्तेच्या अधिकाधिक जवळ पोहचत असल्याचे संकेत आहेत असा दावा केजरीवाल यांनी केला … Read more

Lok Sabha Election 2024 : इंडिया आघाडी ३०० जागा जिंकेल ! तेजस्वी यादव यांचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024 – आम्हाला देशभर जनतेचा पाठिंबा मिळत आहे. यावेळी सत्यापुढे असत्य टिकणार नाही आणि आम्ही ताकदीने निवडणूक लढवत असून आम्हाला जनतेचे भरभरून प्रेम मिळत आहे. त्यामुळेच सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला ३०० हून अधिक जागा मिळतील, असा दावा बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. लोकसभा निवडणुक … Read more

उद्धव ठाकरेंचा विश्वास – ‘इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीत 300हून अधिक जागा जिंकेल आणि सरकार स्थापन करेल’

मुंबई  – आमचा पक्ष काय तुमच्या पदवी सारखा बनावट किंवा नकली आहे काय असा सवाल करीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. (Uddhav Thackeray believes – ‘India Aghadi will win more than 300 seats in Lok Sabha elections and form government’) काल बोईसर येथे घेतलेल्या सभेत बोलताना … Read more

इंडिया आघाडीत फूट ! ‘हा’ पक्ष लढणार स्वतंत्र

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या विरोधात स्थापन झालेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत गर्जना केली होती. मात्र आता काही तासांच्या आतच जम्मू काश्‍मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी वेगळा मार्ग पत्करला आहे. काश्‍मीरमधील तीन जागांवर स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे या राज्यात इंडिया आघाडी संपुष्टात … Read more

‘लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार…’; इंडिया आघाडीने पुकारला मोदी सरकार विरूद्ध एल्गार

India Alliance | Modi government | Lok Sabha Election 2024 – दिल्लीच्या रामलिला मैदानावर विरोधी इंडिया आघाडीने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मोदी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. आम्ही या सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात एकजुटीने लढा देऊ. या लढ्यात आम्ही जिंकू आणि देशातील लोकशाही वाचवू असा निर्धार या सभेतील नेत्यांनी व्यक्त केला आहे. । India Alliance … Read more