भारतीय नौदलाचे जहाज शिवालिक सिंगापूरहून रवाना

सिंगापूर – आयएनएस शिवालिक हे दक्षिण चीन समुद्र आणि प्रशांत महासागरात तैनात करण्यात आलेले भारतीय नौदलाचे जहाज ३० मे रोजी सिंगापूरहून जपानच्या योकोसुका येथे जाण्यासाठी निघाले. सिंगापूर येथे जहाजाच्या थांब्यादरम्यान विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. त्यात चांगी नौदल तळावरील बेस कमांडर यांची भेट, क्रांजी युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करणे, सिंगापूरमधील भारताच्या उच्चायुक्तांशी भेट, … Read more

चर्चा तर होणार…! ‘ममता बॅनर्जी यांनी 9 किमी पायी चालत केला रोड शो’

Lok Sabha elections 2024 । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी दम दम आणि कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ दोन रोड शो केले. आपल्या दोन्ही रोड शोमध्ये ममता बॅनर्जी यांनी सुमारे 9 किलोमीटरचे अंतर पायी कापले. समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या रोड शोमध्ये, टीएमसी सुप्रीमो पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह जेसोर रोडवरील विमानतळाच्या गेट क्रमांक … Read more

‘राहुल गांधींनी अग्निवीर भरती समजून घ्यावी’ अमित शहांचे सडेतोड उत्तर..

Lok Sabha Election 2024 । चार वर्षांच्या कंत्राटी स्वरूपाच्या लष्कर भरतीसाठी मोदी सरकारने जी अग्निपथ योजना सुरू केली आहे तो थेट राष्ट्रीय सुरक्षेशीच खेळण्याचा प्रकार असून त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे’ अशी टीका काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे. इंडिया आघाडीचे सरकार सततेवर आल्यानंतर ही योजना तातडीने रद्द केली जाईल असेही कॉंग्रेसने म्हटले आहे. … Read more

कोस्ट गार्डमध्ये महिलांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे पुन्हा कान टोचले ; म्हटले,”तुम्ही नाही केले तर आम्ही करू”

Coast Guard Women Posting।

Coast Guard Women Posting। सर्वोच्च न्यायालयाने तटरक्षक दलात महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना केंद्र सरकारच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित केले. तटरक्षक दलात महिलांना कायमस्वरूपी कमिशन न देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली. न्यायालयाने सोमवारी या प्रकरणी सुनावणी करताना ,“भारतीय तटरक्षक दलात पात्र महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन (Permanent Commission) प्रदान करा. महिलांना यापासून वंचित ठेवता … Read more

पिंपरी | नागरिकांना रणगाडे, हेलिकॉप्टर, तोफा पाहण्याची संधी

पिंपरी, (प्रतिनिधी) – भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलाची संरक्षण सिद्धताअसलेले हेलिकॉप्टर, रणगाडे, जड संरक्षण वाहने, तोफा अशा अनेक महत्वपूर्ण शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन मोशीत आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणार्‍या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’तून देशाची संरक्षण दले, संरक्षण उपकरणे निर्मितीतील सार्वजनिक उपक्रम तसेच यातील खासगी उद्योग, नवीन … Read more

भारताच्या कूटनीतीचा जगात पुन्हा डंका ; कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ नौसैनिकांची सुटका ; ७ जण मायदेशी परतले

Qatar-India Relations।

Qatar-India Relations। आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा भारताची यशस्वी कूटनीती पाहायला मिळाली. कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौसैनिकांची अखेर सुटका करण्यात आली. त्यातील ७ जण मायदेशीदेखील परतले आहेत. परराष्ट्र मंत्रायलयाने याविषयी माहिती दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या नौसैनिकांच्या सुटकेसंबधी एक  निवेदन जारी केले आहे.  कतारविरुद्ध हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली सर्व आठ माजी नौसैनिकांना मध्यपूर्वेतील या … Read more

INS Sumitra : अरबी समुद्रात भारतीय नौदलाचे धाडस ; 24 तासांत 2 जहाजांची चाच्यांपासून सुटका ;19 पाकिस्तानींना सोडवले

INS Sumitra : भारतीय नौदलाचे धाडस पुन्हा एकदा अरबी समुद्रात पाहायला मिळाले. अरबी समुद्रात २४ तासांत भारतीय नौदलाने दोन जहाजांना चाच्यांपासून वाचवले. एवढेच नाही तर नौदलाने एका जहाजातून 19 पाकिस्तानी क्रू मेंबर्सची तर दुसऱ्या इराणी जहाजातून 17 क्रू मेंबर्सची सुटका केल्याची कौतुकास्पद कामगिरी समोर आली आहे. भारतीय नौदलाने 28 आणि 29 जानेवारी रोजी अरबी समुद्रात … Read more

हौथींचा हल्ला झालेल्या ब्रिटीश टँकरला भारतीय नौदलाकडून मदत

नवी दिल्ली – हौथी बंडखोरांनी हल्ला केलेल्या ब्रिटीश तेलवाहू टँकरला भारतीय नौदलाने मदत केली आणि जहाजाला लागलेली आग वेळीच विझवली आहे. एडनच्या आखातामध्ये चाचेगिरीला आळा घालण्यासाठी तैनात असलेल्या आयएनएस विशाखापट्टणमवरील कर्मचार्‍ यांनी ही मदत केली. एमव्ही मार्लिन लॉन्डा या ब्रिटनच्या तेलवाहू टँकरवर हौथी बंडखोरांनी क्षेपणास्त्र डागल्यामुळे या जहाजाला आग लागली होती. हा हल्ला लाल समुद्रातून … Read more

…आणि घुमला भारत माता की जय चा नारा

नवी दिल्ली – सागरी चाच्यांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय नौदलाने सोडवलेल्या एमव्ही लिला नॉर्फ्लोक या नौकेवरील भारतीय कर्मचाऱ्यांनी आज भारतीय नौदलाचे आभार मानले आणि हर्षोल्हासाने भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. सोमोलियाच्या किनाऱ्याजवळ सागरी चाच्यांनी शुक्रवारी या व्यापारी मालवाहू जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. मदतीचा इशारा मिळाल्यानंतर भारतीय नौदलाचे आयएनएस चेन्नई हे … Read more

सागरी चाच्यांना पकडण्यासाठी नौदलाकडून पाठलाग सुरू

नवी दिल्ली  – उत्तर अरबी समुद्रामध्ये संशयित सागरी चाच्यांना पकडण्यासाठी भारतीय नौदलाची मोहिम अजूनही सुरू आहे. या सागरी चाच्यांनी एका व्यापारी जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. या व्यापारी जहाजावर एकूण २१ कर्मचारी आहेत. त्यापैकी १५ कर्मचारी भारतीय आहेत. एमव्ही लिला नॉर्फ्लोक या जाहाच्या अपहरणाचा प्रयत्न भारतीय नौदलाने शुक्रवारी हाणून पाडला होता आणि जहाजावरील या … Read more