Indian student Missing : अमेरिकेतील भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता

ह्युस्टन – अमेरिकेत शिक्षण घेणारी २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी गेल्या ७ दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. निथीशा कंदुला असे या विद्यार्थिनीचे नाव असून कॅलिफोर्निया विद्यापिठामध्ये ती शिक्षण घेत आहे. दिनांक २८ म पासून ती बेपत्ता आहे. तिला सर्वात शेवटी लॉस एंजेलिसमध्ये बघितले गेले होते. दिनांक ३० मे … Read more

Indian student : अमेरिकेतील ‘त्या’ भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर सापडला; १२०० डॉलरची मागितली होती खंडणी

Indian student | America – अमेरिकेत उमा सत्य साई या विद्यार्थ्यानंतर आता अब्दुल अराफात या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला आहे. गेल्या महिन्यापासून बेपत्ता असलेला हा २५ वर्षीय विद्यार्थी क्लीवलँड येथे मृतावस्थेत आढळून आला आहे. मुळचा हैदराबाद येथील असेला मोहम्मद अब्दुल अराफत याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त … Read more

आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू; आतापर्यंत १० जणांनी गमावला जीव

न्यूयॉर्क  – अमेरिकेच्या ओहियो येथे शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा काल रात्री मृत्यू झाला. उमा सत्य साई गड्डे असे याविद्यार्थ्याचे नाव असून त्याचा मृत्यू गूढ आणि संशयास्पद असल्याचे भारताच्या अमेरिकेतील दुतावासाने म्हटले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून कशामुळे त्याचा मृत्यू झाला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. उमा साई हा भारतीय वंशाचा तेलगु विद्यार्थी … Read more

शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची निघृण हत्या

न्यूयॉर्क – उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याची बेघर गर्दुल्याने हातोडीचे घाव घालून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. जॉर्जिया प्रांतातील लिथोनिया शहरामध्ये ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे हत्या झालेला भारतीय विद्यार्थी या गर्दुल्याला गेल्या दोन दिवसांपासून मदतच करत होता. या हत्येचा प्रसंग सीसीटिव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. हत्या झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचे नाव विवेक … Read more

भारतातून अमेरिकेला शिकायला गेलेली 29 वर्षीय विद्यार्थीनी बेपत्ता; माहिती देणाऱ्यास FBIकडून 8 लाखाचे बक्षीस जाहीर

FBI Reward On Indian Missing Student: अमेरिकेची गुप्तचर आणि सुरक्षा एजन्सी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने न्यू जर्सीमधून हरवलेल्या भारतीय विद्यार्थीनीबद्दल माहिती देणाऱ्यास यूएस $ 10,000 चे बक्षीस जाहीर केले आहे. गेल्या वर्षी एफबीआयने भारतीय विद्यार्थिनी मयुशी भगत हिचा ‘मिसिंग पर्सन’ यादीत समावेश केला होता. रंगीबेरंगी पँट आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट घालून 29 एप्रिल … Read more

धक्कादायक ! अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्सच्या भारतीय विद्यार्थ्यावर चाकुने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

Indiana : अमेरिकेतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे सत्र काही केल्या थांबत नाहीत. कारण अमेरिकेतील इंडियाना राज्यातील फिटनेस सेंटरमध्ये मागच्या महिन्यात एका भारतीय विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्याच्यावर तेंव्हापासून उपचार सुरु होते मात्र बुधवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. वरुण राज पुचा  या भारतीय तरुणावर हल्ला करण्यात आला होता. त्याचा बुधवारी … Read more

भारतीय विद्यार्थ्याची कॅनडात हत्या

टोरांटो/नवी दिल्ली – भारतीय विद्यार्थ्याची कॅनडाच्या टोरांटो शहरातील उपनार्ग स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कार्तिक वासूदेव असे त्याचे नाव आहे. सेंट जेम्स शहराच्या ग्ने रोड प्रवेशद्वारावर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्याच्या प्राथमोपचार करून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार करण्यापुर्वी त्याचा मृत्यू झाला होता, असे पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे. त्याकाळात … Read more

युक्रेनची राजधानी किव्हमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थी जखमी; केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांची माहिती

पॅरिस : रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता संपूर्ण जगावर उमटत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आतापर्यंत दोन भारतीय विद्यार्थ्यांना या युद्धात आपला जीव गमावावा लागला आहे. तर, आणखी एक विद्यार्थी युक्रेनची राजधानी किव्हमध्ये गोळीबारात जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  याविषयीची माहिती केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. रशिया-युक्रेन दरम्यानच्या … Read more

#RussiaUkraineWar | आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू

भटींडा – युध्दग्रस्त युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांना भयावह अनुभवांना सामोरे जावे लागत असतानाच पंजाबमधील बर्नाला येथील एका विद्यार्थ्याचा बुधवारी मृत्यू झाला. मात्र, त्याचा मृत्यू आजारपणामुळे झाला आहे. चंदन जिंदाल ( Chandan Jindal ) हा विद्यार्थी वॅन्नित्सीया विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाला चौथ्या वर्षाला शिकत होता. त्याचा आज सकाळी मृत्यू झाला. त्याच्या मेंदुत रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याने त्याच्यावर महिनाभरापासून येथील … Read more

“प्रत्येक मिनिट मौल्यवान आहे”, भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या सहाव्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटादरम्यान एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारत सरकारला विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी धोरणात्मक योजनेची गरज आहे. प्रत्येक मिनिट मौल्यवान आहे. युक्रेनमधील बाॅम्बस्फोटात कर्नाटकातील हावेरी येथील नवीन शेखरप्पा (21 वर्ष) असे मृत विद्यार्थ्याचे … Read more