ऑक्‍टोबरमध्ये औद्योगिक उत्पादन वाढण्याऐवजी झाले कमी

नवी दिल्ली – कर संकलन वाढून महागाई कमी होण्याची शक्‍यता निर्माण झाली असतानाच ऑक्‍टोबर महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा दर कोसळला आहे. ऑक्‍टोबर महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढण्याऐवजी चार टक्‍क्‍यांनी कमी झाल्याची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली. त्यामुळे या आघाडीवर केंद्र सरकारला वेगात उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा भारताच्या विकासदर आकडेवारीवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. … Read more

औद्योगिक उत्पादनात केवळ 1.9 टक्के वाढ

नवी दिल्ली – करोनानंतर आर्थिक परिस्थिती वेग घेण्याची शक्‍यता निर्माण झाली असतानाच सर्व समीकरणे बिघडू लागली आहेत. महागाई वाढत आहे. रुपयाचे मूल्य कोसळत आहे. त्याचबरोबर आता मार्च महिन्यातील औद्योगिक उत्पादन केवळ 1.9 टक्के दराने वाढले असल्याचे आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. मनुफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढावी म्हणून गेल्या अनेक महिन्यापासून प्रयत्न केले जात असतानाच मार्च … Read more

‘ऑक्‍टोबर’मध्ये औद्योगिक उत्पादनात ‘वाढ’; केंद्रीय उद्योग मंत्रालयाने व्यक्त केले समाधान

नवी दिल्ली – ऑक्‍टोबर महिन्यात औद्योगिक उत्पादन 3.2 टक्‍क्‍यांनी वाढल्याची आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केली आहे. एप्रिल ते ऑक्‍टोबर या दरम्यान औद्योगिक उत्पादन वीस टक्क्‌यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत औद्योगिक उत्पादन 17.3 टक्क्‌यांनी वाढले होते. गेल्या वर्षीच्या ऑक्‍टोबर महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 4.5 टक्क्‌यांनी वाढले होते त्या तुलनेत ऑक्‍टोबर महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन कमी … Read more

औद्योगिक उत्पादनात भरघोस वाढ; मात्र महागाईचा टक्का वाढत असल्यामुळे चिंता कायम

नवी दिल्ली – केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन तब्बल 3.1 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन केवळ एक टक्‍क्‍याने वाढले होते. एप्रिल ते सप्टेंबर या काळात औद्योगिक उत्पादन 23.5 टक्‍क्‍यांनी वाढले. गेल्या वर्षी या कालावधीत औद्योगिक उत्पादन 20.8 टक्‍क्‍यांनी कमी झाले होते. आता खात्रीने उद्योग क्षेत्रावरील करोनाचा … Read more

फक्त वीज कंपन्यांना कोळसा पुरवठा; औद्योगिक उत्पादनावर होणार परिणाम

नवी दिल्ली – देशात आणि परदेशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोळशाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे कोळसा कंपन्या फक्त वीज निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना काहीकाळ कोळसा पुरविणार आहेत. ऍल्युमिनियम, सिमेंटसारख्या इतर क्षेत्रांचा कोळसा पुरवठा काही काळ स्थगित करण्यात आले असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात कोल इंडिया कंपनीची शाखा असलेल्या साउथ ईस्टर्न कोल फिल्ड या कंपनीने संबंधितांना पत्र … Read more

देशातील औद्योगिक उत्पादनात भरीव वाढ

नवी दिल्ली – जुलै महिन्यातील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी विभागाने शुक्रवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन तब्बल 11.5 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. मात्र गेल्या वर्षी जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन उणे 10.5 टक्के इतके घसरले होते. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर आता वाढलेले औद्योगिक उत्पादन जास्त भासत असल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले. असे असले तरी उत्पादन वेगाने … Read more

औद्योगिक उत्पादनात समाधानकारक वाढ

नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मॅन्यफॅक्‍चरिंग क्षेत्रावर फारसा परिणाम झालेला नाही असे दाखविणारी आकडेवारी आज केंद्र सरकारने जाहीर केली. जून महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन तब्बल 13.6 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी लॉक डाऊनमुळे जून महिन्यात औद्योगीक उत्पादन वाढण्याऐवजी 16.6 टक्‍क्‍यांनी कमी झाले होते. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादनाचा महत्त्वाचा घटक … Read more

औद्योगिक उत्पादनात वाढ

नवी दिल्ली – मे महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 29.3 टक्‍क्‍यांनी वाढले असल्याची आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यामध्य लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे औद्योगिक उत्पादन उणे 33.4 टक्के इतके नोंदले गेले होते. त्या तुलनेत मे 2021 महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 29.3 टक्के इतके नोंदले गेले आहे. याचा अर्थ खऱ्या अर्थाने औद्योगिक उत्पादनात फारशी … Read more

दुसऱ्या लाटेचा औद्योगिक उत्पादनावर परिणाम; जूनपासून परिस्थिती सुधारण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बऱ्याच राज्यातील दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त झाले होते. त्याचा परिणाम औद्योगिक उत्पादनावर झाला आहे. एप्रिल महिन्यातील औद्योगिक उत्पादनाची पूर्ण आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी विभाग शुक्रवारी जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र बरेच व्यवहार बंद असल्यामुळे ही पूर्ण आकडेवारी जाहीर करणे बरोबर होणार नाही असे या विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. याच … Read more

कोरोनाचा फटका उद्योगनगरीतील 60% उत्पादन ठप्प

पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील केवळ करोनाबाधितांवरील उपचाराकरिता ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जात असल्याने एमआयडीसीतील जवळपास तीन हजार उद्योगांना फटका बसला आहे. सुमारे 60 टक्‍के उत्पादन ठप्प झाले आहे. लॉकडाऊनच्या भीतीने गावी जाणाऱ्या कामगारांना थांबविताना उद्योजकांना नाकी नऊ येत असतानाच, कच्च्या मालाचा तुटवडा व आता ऑक्‍सिजनचा पुरवठाच बंद झाल्याने मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योगांची चाके थांबली आहेत. … Read more