महाराष्ट्र चेंबरच्या सहकार्याने बारामतीच्या व्यापार, उद्योगाला चालना मिळेल – उदय सामंत

बारामती : बारामतीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय कार्यालय सुरू झाले या कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक व्यापारी उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल व उद्योगांना चालना मिळेल. इंद्रायणी, पवना नदी प्रदूषण मुक्त करणार, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी रेड कार्पेट केले असून गर्जे मराठी या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला असून तो खूप महत्त्वाचा आहे. तसेच बारामतीकरांना एमआयडीसी चे विभागीय कार्यालय … Read more

पिंपरी | उष्णता वाढल्याने रसाळ फळांना मागणी वाढली

चिखली,  (वार्ताहर) – उद्योगनगरीमध्ये मागील काही दिवसांपासून दुपारी ऊन, रात्री, पहाटे थंडी वाढली आहे. वातावरणात सतत बदल होत आहे. परंतु दुपारचे ऊन असहाय्य होत असल्याने नागरिक पोटात गारवा निर्माण करणार्‍या रसाळ फळांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढू लागला आहे. दुपारी घराबाहेर पडणे अशक्य होऊ लागले आहे. शरीरातील पाण्याची क्षमता टिकून ठेवण्यासाठी … Read more

पिंपरी | एमआयडीसीमध्ये छोट्या उद्योजकांना भूखंड द्या

पिंपरी, (प्रतिनिधी) – एमआयडीसीमध्ये छोट्या उद्योजकांना भूखंड मिळत नाही. तो उपलब्ध करून देण्याची मागणी केली फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष गोविंद पानसरे यंनी पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली. तर, लघु उद्योग जर देशाच्या आर्थिक विकासाचा कणा असेल तर त्यांना आवश्यक सेवा सुविधा त्वरेने पुरवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी दिल्याची माहिती पानसरे यांनी … Read more

पुणे जिल्ह्यात पाण्यावरून राजकारण पेटण्याची शक्‍यता

पुणे – यंदा जिल्ह्यात अपुरा पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणे जेमतेम भरली. त्यानंतर परतीच्या पावसाने सुध्दा पाठ फिरविली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. अपुऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातूनही पाण्याची मागणी वाढत आहे. पाण्यावरून ग्रामीण व शहरी, असा वाद निर्माण होत आहे. पुढील वर्ष तर निवडणुकांचे आहे. त्यामुळे पाण्यावरून राजकारण पेटण्याची शक्‍यता आहे. अशातच … Read more

नगर :उद्योगासाठी घेतलेल्या जमिनीची परस्पर विक्री

४५ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा पाथर्डी – संस्थेच्या नावाने लघु उद्योगासाठी घेतलेली जमीन अकृषक करून व बनावट लेआउट करत त्याची परस्पर खरेदी विक्री केल्याप्रकरणी तालुक्यातील खरवंडी कासार येथील भगवानगड औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व सभासद अशा मिळून एकूण ४५ जणांविरोधात सहकार विभागाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहकार खात्याचे उपलेखापरीक्षक महेंद्र तुळशीराम … Read more

बॅंकेच्या प्रत्येक शाखेने नवउद्योजकांना कर्ज द्यावे; जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्राच्या सूचना

पुणे – युवक-युवतींनी नोकरीऐवजी स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करून उद्योजक व्हावे, यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) राबवला जातो. पण, याला बँकांकडून सहकार्य मिळत नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंका, खासगी बॅंका आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सर्व शाखेने प्रत्येकी दोन नव उद्योजकांची कर्ज प्रक्ररणे मंजूर करावीत, अशा सूचना जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्राने … Read more

‘…पण मी कधीच तक्रार केली नाही’; तापसी पन्नूने बॉलीवूडमधील भेदभावावर व्यक्त केले स्पष्ट मत

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने अनेक चित्रपटात काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सिनेइंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच तिच्या बॉलीवूडमधील करिअरला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूड इंडस्ट्रीवर भाष्य केले आहे. एका मुलाखतीत तापसी म्हणाली की, “इंडस्ट्रीत काम करताना माझ्याबरोबर अनेकदा भेदभाव करण्यात … Read more

अभिनेत्री हंसिका मोटवानीला करावा लागला भेदभावाचा सामना, म्हणाली ‘काही डिझायनर कपडे…’

मुंबई – अभिनेत्री हंसिका मोटवानीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. खास करून तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अधिक काम केले आहे. मात्र यावरून अनेकदा भेदभाव केला जात असे. इंडस्ट्रीच्या नावाखाली तिच्याशी काही डिझायनर्सने भेदभाव केल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. हंसिकाने सांगितले की, ‘काही डिझायनर मी दाक्षिणात्य अभिनेत्री असल्याने मला कपडे देण्यास स्पष्टपणे नकार देत असत. पण … Read more

‘आत्मनिर्भर भारता’साठी वाहन उद्योग महत्त्वाचा; नितीन गडकरी यांची माहिती

पुणे – केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा त्याचबरोबर सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा वाहननिर्मिती हा उद्योग आहे. देशात तयार होणाऱ्या मोठ्या व्यावसायिक वाहनांपैकी 50 टक्के वाहनांची निर्यात होते. वाहननिर्मिती क्षेत्रात भारत चौथ्या स्थानावर पोचला असून आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत या उद्योगाचा वाटा फार मोलाचा ठरला असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी … Read more

माणदेशी : अन्नप्रक्रिया उद्योगातून श्‍वेता काकडे यांनी कष्टपूर्वक निर्माण केली स्वतःची ओळख

श्रीकांत कात्रे खोबऱ्याच्या किसाला मागणी असते, हे सहजासहजी कुणाच्या लक्षात येत नाही. पण सौ. श्‍वेता काकडे यांनी त्यातला व्यवसाय हेरला. खोबऱ्याच्या किसाची विक्री करून त्यांनी व्यवसायाची सुरवात केली. आणि आता त्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची चव लोकांच्या जिभेवर रेंगाळू लागली आहे. कष्ट आणि मेहनतीने तसेच अत्याधुनिक मशिनरीचा उपयोग करत त्यांनी हळूहळू व्यवसायाचा विस्तार केला. … Read more