पुण्यातील मेट्रो प्रकल्पांना गती द्यावी ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

पुणे – स्वारगेट ते पिंपरी चिंचवड, वनाज ते रामवाडी आणि हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या कामांना गती देण्यात यावी. पिंपरी-चिंचवड मनपा स्थानक ते निगडी मार्गास मंजुरी देण्यात आली असून त्याबाबत महामेट्रो, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यादरम्यानचा त्रिपक्षीय करार तातडीने पूर्ण करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार प्रकल्पाच्या … Read more

पुणे जिल्हा : सर्व विभागात समन्वय ठेवा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पेरणेत नियोजनाचा आढावा शिक्रापूर – एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त पातळीवर दोन महिन्यांपासून नियोजन सुरु असून अनेक बैठका झालेल्या आहेत. सर्व विभागांचा योग्य समन्वय रहावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ते … Read more

बारामतीसाठी आत्तापासूनच कामाला लागा ; राहुल कुल यांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सूचना

राहू – तालुकानिहाय आपल्या पक्षाची ताकद किती आहे. पक्षाची बलस्थाने काय आहेत, हे आपणास माहिती आहे. काही काळात आपण बारामती लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. प्रत्येक बूथ सक्षम होण्यासाठी अधिक जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे बारामती लोकसभेचे प्रमुख व आमदार राहुल कुल यांनी केले. बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रमुखपदी आमदार कुल, … Read more

पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घ्या – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्ता भरलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई रक्कम मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे. या भरपाईपोटीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करा. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या. अशा तक्रारी आल्यास त्याची तात्काळ … Read more

महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली तात्काळ तयार करा; गृहमंत्री वळसे पाटलांचे निर्देश

मुंबई – विविध संघटित व असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महिला नोकरी करीत आहेत. या सर्व महिलांची सुरक्षा हा राज्य शासनाच्या दृष्टीने प्रधान्याचा विषय असून गृह विभागाने सर्वसमावेशक मार्गदर्शक नियमावली तात्काळ तयार करून जाहीर करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. राज्यातील माहिती तंत्रज्ञान प्रकल्प असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी गठित समितीने … Read more

सिंघू बॉर्डर खुली करण्याची याचिका अमान्य; हायकोर्टात जाण्याच्या सूचना

नवी दिल्ली – दिल्ली हरियाणा सीमेवरील सिंघू बॉर्डर शेतकरी आंदोलनामुळे गेले अनेक दिवस बंद आहे, ही सीमा खुली करण्यात यावी आणि तेथील रस्ते वाहतुकीला अनुमती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सोनिपतच्या रहिवाशांनी सुप्रीम कोर्टात केली होती, पण सुप्रीम कोर्टाने या याचिकेचा विचार करण्यास नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांनी या विषयी हायकोर्टात जावे, असेही सुप्रीम कोर्टाने त्यांना … Read more

राज्यपाल कोश्‍यारींवर हायकोर्टाचे ताशेरे; आमदार नियुक्तीचा तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना

मुंबई  – राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवूनही राज्यपाल कोश्‍यारी यांनी त्यावर कोणताही निर्णय गेल्या आठ महिन्यात घेतलेला नाही. हा विलंब अवाजवी आहे, राज्यपालांनी या अवधीत काही तरी निर्णय घेणे अपेक्षित होते. यावर आता त्यांनी तातडीने निर्णय घ्यायला हवा असे नमूद करीत मुंबई हायकोर्टाने या विलंबाबद्दल राज्यपाल कोश्‍यारी यांच्यावर ताशेरे मारल्याने त्यांना … Read more

फ्रान्सचा प्रवास टाळण्याची अमेरिकेच्या नागरिकांना सूचना

वॉशिंग्टन – फ्रान्समध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढायला लागल्याने तेथे जाणे टाळावे, अशी सूचना अमेरिकेने आपल्या नागरिकांना केली आहे. फ्रान्समध्ये करोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा बरीच कमी आहे. मात्र सध्या फ्रान्समध्ये करोनाची चौथी लाट सुरू आहे. त्यामुळे अमेरिकेने फ्रान्सवर चौथ्या श्रेणीची प्रवासी बंदी घातली आहे. अमेरिकेच्या आघाडीच्या वैद्यकीय संस्था असलेल्या “युएस सेंटर फॉर डिसीज … Read more

राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत अद्यापही निर्णय नाही; केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश

मुंबई – विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्‍त 12 आमदारांच्या नियुक्‍त अद्यापही झालेल्या नाहीत. यासंदर्भात महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पाठविलेल्या यादीवर राज्यपालांनी 8 महिन्यांनंतरही स्वीकृतीची मोहोर उमटवलेली नाही किंवा ती यादी फेटाळलेलीही नाही. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्‍न उपस्थित करत केंद्र सरकारला सोमवारपर्यत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. रतन सोली लुथ नामक व्यक्तीने राज्यपाल नियुक्त सदस्यांसंदर्भात मुंबई … Read more

नंदीग्रामचे सर्व इलेक्‍शन रेकॉर्ड जपून ठेवण्याच्या सूचना

कोलकाता – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मतदारसंघातील सुवेंदू अधिकारी यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका कोलकाता हायकोर्टाने दाखल करून घेतली असून, हायकोर्टाने निवडणूक आयोगाला या मतदारसंघातील मतमोजणी आणि संबंधित सर्व रेकॉर्ड जपून ठेवण्याची सूचना जारी केली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यानच्या काळात सुवेंदू अधिकारी आणि अन्य संबंधितांवर … Read more