बर्ड फ्ल्यु प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची केंद्राची राज्यांना सुचना

नवी दिल्ली – देशातल्या चार राज्यांमध्ये एच ५ एन १ विषाणूची प्रकरणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वच राज्यांना या संबंधात अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सांगितले आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने २० मे रोजी सर्व राज्यांसाठी या विषाणुच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी ही सुचना जारी केली आहे. एव्हीयन इन्फ्लूएंझा किंवा बर्ड … Read more

वाळू गटांचे लिलाव सुरु करावे; महूसलमंत्री थोरात यांचे निर्देश

मुंबई : राज्य शासनाने वाळू उत्खनन करण्याबाबत नवीन सुधारित धोरण आणले आहे. या धोरणानुसार सर्व निकष पूर्ण असलेल्या वाळू गटांचे लिलाव सुरु करावे तसेच महसूल विभागाशी संबंधित कामांना गती द्यावी, असे निर्देश महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांची आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी … Read more

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई :- राज्यातील जिल्हा परिषदांच्या तसंच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही, या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे, त्यासाठी शालार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात … Read more

कोरोना संसर्ग वाढत असल्याने आवश्यक असणारी पूर्वतयारी करावी

मुंबई :- राज्यात कोविड विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना सध्या दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी. आवश्यक त्या उपाययोजना करण्यारबरोबरच सज्ज राहून इतर संबंधित विभागांबरोबर समन्वयाने काम करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिल्या. राज्यातील सध्याची परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग … Read more

नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले. … Read more

बीड : शेतकऱ्यांना यावेळी प्राधान्याने कर्जवाटप करावे

पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश बीड : शेतकऱ्यांना यावेळी प्राधान्याने कर्जवाटप केले जावे. तसेच सूचनांप्रमाणे कर्जवाटप न केल्यास बँकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. राज्यात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त प्रमाणात कर्जमाफी मिळालेली आहे. आता नव्याने पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँकांनी सज्ज व्हावे आणि कुठलीही दिरंगाई न करता स्केल … Read more

भंडारा : शेतकऱ्यांना ‘फास्ट ट्रॅक’ मोडवर पीक कर्ज द्या

पालकमंत्री सुनील केदार यांचे जिल्हा प्रशासनास निर्देश… भंडारा :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था उभी राहू शकते. खरीप हंगामात पीक कर्जासाठी नियमांचे पालन करून जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांना फास्ट ट्रॅक मोडवर कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. पीक कर्ज वाटपासाठी महसूल, कृषी व बँक सखी असा टास्कफोर्स तयार करण्यात यावा, … Read more