जिल्हा ग्राहक आयोगाला मिळाले अध्यक्ष, सदस्य

पुणे – उत्पादन कंपनी अथवा इतरांनी फसवलेल्या ग्राहकांना आता लवकर न्याय मिळणार आहे. दि. 1 मार्चपासून रिक्‍त असलेल्या पुणे जिल्हा ग्राहक आयोगाला अध्यक्ष आणि एक सदस्य मिळाला आहे. तर अतिरिक्त ग्राहक आयोगालाही एक सदस्य मिळाला आहे. तर, मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या राज्य ग्राहक आयोगाच्या 10 सदस्यांची भरती झाली आहे. पुण्यासह रिक्त असलेल्या राज्यातील सर्व … Read more

PUNE : प्रशासन-कर्मचारी वाद चिघळणार; ऑनलाईन माहिती भरण्यास कर्मचाऱ्यांचा नकार?

पुणे – महापालिकेतील आजी-माजी नगरसेवकांसह, पालिकेच्या सध्या कार्यरत कर्मचारी आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी वैद्यकीय सेवा योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास महापालिका कर्मचाऱ्यांनी कुटूंबातील सदस्यांची माहिती ऑनलाईन भरण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी काढले होते. मात्र, ही माहिती प्रशासन ही योजना बंद करून त्याचे खासगीकरण करत ती विमा कंपनीला देण्यासाठी करणार असल्याचा समज कर्मचाऱ्यांमध्ये … Read more

PUNE : विमा कंपनी नाही तर, पालिकाच राबविणार शहरी गरीब योजना

पुणे – शहरातील एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटुंबासाठीच्या शहरी गरीब योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये विमा कंपनीकडे दिली जाणार नाही. ही योजना पूर्वीप्रमाणेच महापालिका राबविणार असल्याचा खुलासा महापालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केला आहे. शहरी गरीब विमा कंपनीकडे देण्यासंदर्भात कधीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. महापालिकेकडून विमा कंपनीला ही … Read more

शिर्डी मतदारसंघातील शेतकऱ्यांना 7 कोटींची भरपाई

शिर्डी – शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राहाता तालुका व आश्‍वी सर्कलमधील एकूण 7 हजार 538 शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत स्थानिक आपत्ती पूर्वसूचनेप्रमाणे 6 कोटी 88 लाखांची भरपाई मिळाली आहे. विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ही भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरीप हंगाम 2022-23मध्ये तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग … Read more

अग्रलेख : एलआयसीचा बहुचर्चित आयपीओ

भारताच्या पूर्ण सरकारी मालकीची असलेल्या एलआयसी या विमा कंपनीचे आता मोदी सरकारने आयपीओच्या माध्यमातून खासगीकरण सुरू केले आहे. या आयपीओची मोठीच धूम गुंतवणूक विश्‍वात होती. आज या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची मुदत संपली. सामान्य गुंतवणूकदारांनीही या आयपीओमधील गुंतवणुकीत बरेच स्वारस्य दाखवले होते. त्यानुसार या आयपीओला कमीअधिक प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला. हा एक मोठाच सिलसिला होता. त्याच्या … Read more

विमा दावा मंजूर होण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्वरित विमा कंपनीस कळवावे – जिल्हाधिकारी इटनकर

नांदेड – नांदेड जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना मोठया प्रमाणात पुर येऊन शेती व पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे.  विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना संबधीत शेतकऱ्यांनी तात्काळ विमा कंपनीस कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. कंपनीच्या नियमाप्रमाणे ही माहिती 72 तास … Read more

…तर विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा; कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आदेश

अमरावती – पीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन तेथील व्यवस्थेची तपासणी केली. कंपनीच्या कार्यालयात निकषानुसार यंत्रणा व व्यवस्था आढळली नाही. या कंपनीविरुद्ध तत्काळ तक्रार दाखल करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी … Read more

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या फळपिकांच्या नुकसानीची विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी

जळगाव– हवामान आधारित फळपिक विमा योजना (अंबिया बहार) सन २०१९-२० अंतर्गत प्राप्त तक्रारीनुसार जबाबदार विमा कंपनी (भारतीय कृषि विमा कंपनी) व बँक शाखांनी ३० जून, २०२१ अखेर सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांचे बँक खात्यांवर अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. हवामान आधारित फळपिक विमा योजना (अंबिया बहार) सन २०१९-२० अंतर्गत प्राप्त … Read more

HDFC ला आपल्या विमा कंपन्यातील गुंतवणूक कमी करावी लागणार!

मुंबई- हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे एचडीएफसीला रिझर्व बॅंकेने दिलेल्या सूचनांनुसार एचडीएफसीला एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स आणि एचडीएफसी ईर्गो या कंपन्यातील आपले भाग भांडवल 50 टक्के पर्यंत कमी करण्यास सांगितले आहे. या दोन्ही कंपन्यांचे विलिनीकरण प्रक्रीयेनंतर रिझर्व बॅंकेने ही सूचना केली आहे. सध्या एचडीएफसी कडे एचडीएफसी ईर्गो हेल्थचे 52.25% तर एचडीएफसी ईर्गोचे 50.58 टक्के भाग भांडवल … Read more

बळीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटात

पुणे – राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे मोठी अडचण ही अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांची होणार आहे. विशेष करून ज्या शेतकऱ्यांचा पिक विमा आहे. त्यांचे विम्याचे पैसे रखडणार आहेत. असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. ऐन दिवाळीच्या काळात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याच दरम्यान राज्यात निवडणुका होत्या. या निवडणुका झाल्यानंतर … Read more