Russia-Ukraine war : रशियाचे लढाऊ विमान उडवल्याचा युक्रेनचा दावा

किव्ह – रशियाचे अत्याधुनिक लढाऊ विमान उडवल्याचा दावा युक्रेनने केला आहे.आपल्या सैन्याने फ्रंट लाइन्सपासून सुमारे ६०० किलोमीटर अंतरावरच्या हवाई तळावर तैनात असलेल्या एका अल्ट्रा-आधुनिक रशियन युद्धविमानाला लक्ष्य करण्यात आले, असे युक्रेनने रविवारी सांगितले. युक्रेनच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी युक्रेनला रशियाच्या आत मर्यादित हल्ल्यांसाठी त्यांची शस्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यानंतर युक्रेनने ही कारवाई केली आहे. हवाई तळावरच्या या … Read more

नव्या संरक्षण मंत्र्यांसमोर आव्हानांचा डोंगर; चीनच्या आक्रमकपणाला निर्बंध घालणे आवश्यक

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ अल्पावधीत सुरू होणार आहे. एनडीए 3.0 मध्ये यावेळी संरक्षण मंत्रीपद कोणाला मिळणार याकडे संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोक लक्ष ठेवून आहेत. नवे संरक्षण मंत्री मंगळवार, 11 जूनपर्यंत पदभार स्वीकारतील. परंतु त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. यामध्ये इंटिग्रेटेड थिएटर कमांड, एलएसी, चीनी घुसखोरी आणि … Read more

डेन्मार्कच्या पंतप्रधानांना धक्काबुक्कीचा प्रयत्न; हल्लेखोराला पोलिसांनी केली अटक

Mette Frederiksen – डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडेरिकसन यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न काल एका व्यक्तीने केला. कोपनहेगन शहराच्या मध्यभागात हा प्रकार घडला असून पोलिसांनी या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या हल्ल्याबद्दल अधिकाऱ्यांनी अधिक तपशील दिलेला नाही आणि फ्रेडरिकसन यांना काही दुखापत झाली की नाही हे स्पष्ट झाले … Read more

‘पाकिस्तानात खरी सत्ता असलेल्यांशीच चर्चा केली जाईल…’; इम्रान खान यांची भूमिका

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये खरी सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याशीच चर्चा केली जाईल, असे तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणाच्या सुनावणीनंतर अदियाला तुरुंगात काही निवडक पत्रकारांबरोबर केलेल्या अनौपचारिक वार्तालापादरम्यान इमारान खान यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याशीच आम्ही चर्चा करणार आहोत. राजकीय पक्षांकडे खरी सत्ता नाही. … Read more

खलिस्तानी पोस्टरवरून कॅनडातील मंत्री संतप्त; इंदिरा गांधींच्या हत्येची पोस्टर

ओटावा, (कॅनडा) – खलिस्तानी समर्थकांनी इंदिरा गांधींच्या हत्येचे पोस्टर लावल्याबद्दल कॅनडाचील मंत्र्याने संताप व्यक्त केला आहे. हिंसाचाराचे समर्थन केले जाऊ शकणार नाही आणि आपल्या देशात हिंसाचाराला प्रोत्साहन देणे कधीही मान्य नाही, अशा शब्दात कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांनी खलिस्तानवाद्यांना खडसावले आहे. या आठवड्यात, व्हँकुव्हरमध्ये भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे चित्रण करणाऱ्या पोस्टरच्या … Read more

चीननंतर भारत कॅनडासाठी धोकादायक; उच्चस्तरीय समितीने केला गंभीर आरोप

टोरांटो – गेल्या काही काळात भारत आणि कॅनडा संबंधांत काहीशी कटुता निर्माण झाली असताना त्या देशातील एका समितीने असा गंभीर आरोप केला आहे चीननंतर भारत हा देश कॅनडासाठी सगळ्यांत धोकादायक आहे. तर कॅनडाच्या पंतप्रधानांनीही त्यांच्या देशात इतर देशांच्या होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त केली आहे. कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर विषयक संसदीय समितीने हा अहवाल … Read more

बायडेन – ट्रम्प यांचा प्राथमिक फेऱ्यांमध्ये विजय; अखेरच्या प्राथमिक फेऱ्यांची निवडणूक समाप्त

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रीया म्हणून रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही प्रमुख पक्षांच्या प्राथमिक फेऱ्यांची प्रक्रीया मंगळवारी समाप्त झाली. विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये विजय मिळवला आहे. फारच थोड्या राज्यांमध्ये या प्राथमिक फेऱ्यांसाठी मतदान करण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांना आर्थिक हेराफेरीच्या … Read more

अमेरिका- दक्षिण कोरियाचा संयुक्त युद्धसराव

सेल  – अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांचा हवाई कारवाईचा युद्धसराव दक्षिण कोरियाच्या द्विपसमुहाजवळ करण्यात आला आहे. या युद्धसरावासाठी अमेरिकेची बी-१ बी लढाऊ विमाने दक्षिण कोरियाकडे गेली झाली आहेत. उत्तर कोरियांने दक्षिण कोरियाच्या हद्दीमध्ये घाणीने भरलेले शेकडो बलून पाठवले होते. तसेच दक्षिण कोरियातील जीपीएस सिग्नल जॅम देखील केले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला … Read more

पाकिस्तानी नेत्यांना सत्तेत हवीय इंडिया आघाडी; पाकिस्तान मोदी सरकारला का घाबरतोय? वाचा….

Pakistan | Narendra Modi – देशात लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे संपले आहेत. आता फक्त निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. भारतच नाही तर शेजारी देश पाकिस्तानही या निवडणूक निकालांची आतुरतेने वाट पाहत आहे. निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होतील. भारतात कोणाचे सरकार स्थापन होणार हे येत्या काही तासांतच ठरणार आहे. एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळताना दिसत … Read more

युक्रेन शांतता परिषदेतील सहभागाचे झेलेन्सकी यांचे आवाहन; चीनकडून अडथळा आणला जात असल्याचा केला आरोप

सिंगापूर – रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष समाप्त करण्याच्या उद्देशाने आयामी काळात स्वित्झर्लंडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी आशिया खंडातील प्रमुख देशांना केले आहे. सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शाग्री-ला या आशियातील प्रमुख देशांच्या सुरक्षा परिषदेमध्ये त्यांनी हे आवाहन केले. दोन आठवड्यांनी स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या शांतता परिषदेला उपस्थित राहण्याचे अद्यापही अनेक … Read more