“मुख्यमंत्री साहेबांना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा”

मुंबई : राज्यात कोरोनाचा वेग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केले तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला. त्यानंतर, इतरही विरोधकांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी … Read more

फोन टॅपिंग प्रकरण : अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल; फडणवीसांची होणार चौकशी ?

मुंबई –  महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन टॅपिंग झाले होते. हे टॅपिंग रश्मी शुक्ला यांनी केले असून जेव्हा हा प्रकार उघड झाला तेव्हा त्यांनी सरकारची माफी मागितली होती.  या प्रकरणात  आता अज्ञात व्यक्तीविरूद्ध सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणात गुप्तचर विभागाचे गोपनीय पत्रे बेकायदेशीररित्या मिळवण्यात आली होती असं तक्रारीत म्हटलं आहे. … Read more

फोन टॅपिंग प्रकरणानंतर ठाकरे सरकारने कसली कंबर; मंत्र्यांना दिल्या खास सूचना

मुंबई –  महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन टॅपिंग झाले होते. हे टॅपिंग रश्मी शुक्ला यांनी केले असून जेव्हा हा प्रकार उघड झाला तेव्हा त्यांनी सरकारची माफी मागितली होती.  या प्रकरणानंतर ठाकरे सरकारने कंबर कसली असून आपल्या मंत्र्यांना खास सूचना दिल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे सरकारने आपल्या मंत्र्यांना फोन किंवा कॅमेऱ्यासमोर बोलताना भान ठेवावे. तसेच … Read more

33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी 16 सदस्यांची समिती

मुंबई – राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी विधानसभेच्या 16 सदस्यांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत केली. समिती चार महिन्यात सभागृहाला अहवाल सादर करेल, असेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले. सदस्य रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विधिमंडळाच्या समितीमार्फत वृक्ष लागवड मोहिमेची … Read more

अहमदनगर: “पत्रकार रायकर यांच्या मृत्युची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी’

संगमनेर (प्रतिनिधी) – खासगी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी पांडूरंग रायकर यांचे बुधवारी कोविडच्या संसर्गातून पुण्यात निधन झाले. त्यांचा दुर्दैवी मृत्यू व्यवस्थेचे धिंडवडे काढणारा आहे. अगदी कोपरगावमध्ये त्यांच्या कोविड चाचणीपासून ते पुण्यात त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होण्यापर्यंतचा प्रवास पोखरलेल्या व्यवस्थेचे पितळ उघडे पाडणारा ठरला. त्यांच्या मृत्यूला केवळ गलथान प्रशासकीय व्यवस्था कारणीभूत आहे, असे आमचे ठाम मत … Read more

फेसबुकच्या भारतातील राजकीय हस्तक्षेपाची चौकशी करा

कॉंग्रेसने सीईओ झुकेरबर्ग यांना लिहीले पत्र नवी दिल्ली – फेसबुकने भारतातील निवडणूक राजकारणात हस्तक्षेप केल्याच्या संबंधात जी माहिती उजेडात आली आहे त्या प्रकरणाची कालबद्ध पद्धतीने उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे केली आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी हे पत्र लिहीले आहे. फेसबुकच्या भारतातील टीमने भाजपशी हातमिळवणी करून लोकांवर … Read more

भेसळयुक्त इंधन पुरवठ्याची तात्काळ चौकशी करा – विधानसभाध्यक्ष नाना पटोले

भंडारा : महाराष्ट्र राज्यामध्ये बायोडिझलच्या नावाने भेसळयुक्त डिझेल व इंधनाचा पुरवठा करणाऱ्यांवर चौकशी करुन शासकीय निकषानुसार सदर पंप सुरु आहे अथवा नाही याबाबत तात्काळ तपासणी करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपायुक्त यांना दिले. या संदर्भातील निवेदन फेडरेशन ऑफ महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे सचिव अमित … Read more

चुकीच्या गुन्ह्यांची चौकशी करा !

नारायणगाव पोलिसांकडे पत्रकारांची निवेदनाद्‌वारे मागणी नारायणगाव (वार्ताहर) – जुन्नर तालुक्‍यात पत्रकारांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आरोपींसह तक्रारदार यांचीही योग्य ती चौकशी करावी. पत्रकारांवर बदनामी करण्याच्या दृष्टीने दाखल करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांबाबत चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा, असे निवेदन आज पत्रकारांच्या वतीने नारायणगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले. यावेळी अतुल परदेशी, सुरेश वाणी, रवींद्र पाटे, सचिन कांकरिया, ऍड. … Read more

…म्हणून जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनला जाणार

न्यूयॉर्क : जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाचे उगमस्थान असणाऱ्या चीनमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक पुढच्या आठवड्यात दाखल होणार आहे. या ठिकाणी हे पथक जाऊन करोनाचा प्रसार नेमका कुठून सुरु झाला ते तपासणार आहे. सध्याच्या घडीला चीन याबाबतची नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे असेही संघटनेने म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेने या … Read more

सदोष बियाण्यांच्या तक्रारीची तातडीने तपासणी करा

सोयाबीन शास्त्रज्ञ आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांची समिती गठित-कृषिमंत्री दादाजी भुसे  मुंबई : सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्याची तातडीने दखल घेत तक्रारीची पडताळणी तातडीने करण्यासाठी तपासणी पथकाची संख्या वाढवावी, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज विभागाला दिले. याप्रकरणी संबंधित दोषी कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना कृषिमंत्री भुसे यांनी आज … Read more