IPL 2021 : दिल्लीची विजयी घोडदौड सुरूच

अबुधाबी -ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव करत गुणतालिकेत पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीचा 10 सामन्यातील हा आठवा विजय असून त्यांनी एकूण 16 गुणांसह अंतिम-चारमध्ये निश्‍चित केला आहे. दिल्लीने दिलेल्या 155 धावांच्या माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात राजस्थान 20 षटकांत 6 बाद 121 धावांपर्यतच मजल … Read more

IPL 2021 : रोमांचक लढतीत पंजाबचा विजय

शारजा  -शारजाच्या मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात पंजाबने हैदराबादवर 5 धावांनी विजय मिळविला. पंजाबने दिलेल्या 126 धावांचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकांत 7 बाद 120 धावांपर्यत मजल मारता आली. निर्धारित धावांचा पाठलाग करताना हैदराबादचीही सुरुवात निराशाजनक ठरली. सलामीवीर डेविड वॉर्नर, कर्णधार केन विल्यमसन आणि मनिष पांडे झटपट बाद झाल्याने हैदराबादची 8 षटकात 3 बाद 32 अशी … Read more

IPL 2021 : सांघिक खेळाने चेन्नईची बेंगळुरूवर मात

शारजा – महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने हायव्होल्टेज लढतीत सांघिक खेळाच्या जोरावर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाचा 6 गडी राखून पराभव केला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या सुरू झालेल्या या दुसऱ्या पर्वातील सामन्यात चेन्नईने विजय मिळवताना क्वॉलिफायर गटातील प्रवेशाची आशा कायम राखली. बेंगळुरूने विजयासाठी दिलेले 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने दमदार सलामी दिली. सलामीवीर ऋतुराज … Read more

IPL वर करोनाची पुन्हा वक्रदृष्टी; हैद्राबादचा नटराजन ‘पॉझिटिव्ह’

दुबई – देशात करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केल्याने या वर्षी मे महिन्यामध्ये आयपीएल स्पर्धा अर्ध्यावर बंद करावी लागली होती. या श्रुंखलेतील उर्वरित सामने आता दुबई येथे हलवण्यात आले असून यातील पहिला सामना १९ सप्टेंबरला खेळवण्यात आला. स्पर्धा नुकतीच सुरु झाली असतानाच आता पुन्हा एकदा करोना विषाणू संकटाने तोंड वर काढले आहे. हैद्राबाद … Read more

अमिरातीला निघाली यजुवेंद्र चहलची बायको धनश्री; इन्स्टावरचा व्हिडीओ पहाच

मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलच्या 14 व्या पर्वाबाबत स्पर्धेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित 31 सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयने ही महत्त्वाची आणि मोठी घोषणा करताच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची बायको धनश्री वर्माला अत्यानंद झाला. तिने खास डान्स व्हिडीओ शेअर … Read more

IPL 2021 : आयपीएलमधील उर्वरित सामने ‘या’ देशात होणार

मुंबई – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल सामने अर्ध्यातच स्थगित करण्यात आले होते. यासंदर्भात क्रिकेट चाहत्यांमध्ये उर्वरीत सामने कथी होणार अथवा होणार की नाही होणार याविषयी उत्सुक्ता होती. याबाबत आज इंडियन प्रीमियर लीग बाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने मोठा निर्णय घेतला असून आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये होणार असल्याचे जाहिर केले आहे. यासंदर्भात … Read more

#IPL2021 : ‘या’ दिवशी होणार ‘आयपीएल’ची पहिली व शेवटची मॅच; सामन्यांची तारीख ठरली

मुंबई – क्रिकेटपटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय काहीदिवसांपूर्वी घेण्यात आला. करोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आता पुढचे सामने कधी खेळवण्यात येणार याबाबत अजून काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र, आता लवकरच आयपीएल स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलच्या चौदाव्या पर्वातील उरलेल्या मॅचेस 19 किंवा 20 सप्टेंबर रोजी सुरू … Read more

पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड प्राची सिंगचा अप्रतिम बेली डान्स

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर आणि क्रिकेटमधलं भारताचं उद्याचं भविष्य असलेल्या पृथ्वी शॉने आयपीएलच्या 14 व्या पर्वात आपल्या बॅटची जादू दाखवली. सात सामन्यात त्याने शानदार तीन अर्धशतकं झळकावली. पृथ्वी आपल्या शानदार बॅटिंगने तर नेहमी चर्चेत असतो पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही लोक चर्चा करत असतात. पृथ्वी टीव्ही स्टार प्राची सिंगला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. प्राचीही … Read more

IPL 2021 : जोस बटलरचं दमदार शतक; राजस्थानचा हैद्राबादवर “रॉयल’ विजय

नवी दिल्ली – अरुण जेटली स्टेडियमवर झालेलया सामन्यात राजस्थानने दिलेल्या 221 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैद्राबादला 20 षटकात 8 बाद 165 धावाच करता आल्या. त्यामुळे राजस्थानने 55 धावांनी विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी 221 धावांचा बचाव करताना शिस्तबद्ध मारा केला. त्यांनी नियमित अंतराने विकेट्‌स घेतल्याने हैद्राबादच्या … Read more

#IPL2021 : दमदार खेळीनंतर, भर मैदानात हात जोडून पोलार्डने केलं वडिलांना वंदन

नवी दिल्ली – किरॉन पोलार्डच्या  वादळी अर्धशतकाच्या जोरावर काल मुंबई इंडियन्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्स संघावर ४ गडी राखून रोमांचक विजय मिळवला. मधल्या फळीतील पोलार्डने चेन्नईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करताना आयपीएलच्या या हंगामातील १७ चेंडूंत वेगवान अर्धशतक ठोकलं. त्याने ३४ चेंडूंत ६ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ८७ धावा केल्या. … Read more