#IPL2022 | आयपीएल स्पर्धेची उड्डाणे कोट्यान्‌कोटी

मुंबई  -आयपीएल स्पर्धा यंदाच्या मोसमात सुरुवातीच्या सामन्यांत फारशी लोकप्रियता दिसत नव्हती. मात्र, या स्पर्धेचे बाजारमूल्य काही दिवसांतच सर्वाधिक ठरले असून जगातील सर्वात श्रीमंत लीग बनली आहे. आयपीएलच्या बाजारमूल्यातील वाढ ही अमेरिकेतील एनबीए व एनएफएलपेक्षाही जास्त आहे. आयपीएलची सुरुवात झाल्यावर 2009 साली फोर्ब्जने केलेले आठही संघांचे मूल्यांकन जवळपास 67 मिलियन डॉलर (जवळपास 515 कोटी रुपये) होते. … Read more

….तर मी पण कोट्यधीश असतो – रवी शास्त्री

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक व माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनाही आत्मप्रौढी दाखवण्याचा मोह आवरलेला दिसत नाही. आमच्या काळी आयपीएल स्पर्धा असती तर मलाही कोट्यवधींचा करार मिळाला असता, असा दावा शास्त्री यांनी केला आहे. बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा सुरू केल्यावर अनेक खेळाडूंवर करोडो रुपयांची बोली लागलेली पाहून मलाही माझी कामगिरी आठवली. 1980 सालच्या … Read more

क्रिकेट काॅर्नर (#IPL) : पॉवर हिटर्स स्पर्धा गाजवणार

-अमित डोंगरे अमिरातीत यंदा सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत अद्याप रंगत अशी दिसलीच नसली तरी येत्या काही सामन्यांपासून दिग्गज फलंदाज भरात येतील व पॉवर हिटिंगची मजा येइल. हिट आऊट गेटआऊट या साध्या तत्त्वावर टी-20 सामने खेळले जातात. प्रत्येक फलंदाजाला यात संधी मिळते असे नाही. पहिल्या मोसमात राहुल द्रविड किंवा व्हीव्हीएस लक्ष्मण हे जरी आयकॉन खेळाडू म्हणून … Read more

क्रिकेट काॅर्नर (#IPL) : … अन्‌ रोवली गेली आयपीएलची मुहूर्तमेढ

-अमित डोंगरे ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आयपीएल स्पर्धा अस्तित्वात आल्याचे सांगितले जात असले तरीही त्याची मुख्य कल्पना अमेरिकेतील प्रोफेशनल लीग पाहिल्यावरच या स्पर्धेचा आराखडा तयार करण्यात आला होता. या स्पर्धेला पॅकर सर्कसप्रमाणे सुरुवातीला हिणवले गेले. आयपीएल म्हणजे इंडियन पैसा लीग अशाही डागण्या दिल्या गेल्या. मात्र, याच स्पर्धेने जागतिक क्रिकेटचे आयामच बदलून टाकले. भारतीय क्रिकेट नियामक … Read more

आयपीएल स्पर्धेसाठी शाहरूखच्या अटी…

मुंबई – आयपीएल स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत होणार असे मत बीसीसीआयने व्यक्‍त केल्यानंतर संघमालकांनी आनंद व्यक्‍त केला असला तरीही कोलकाता नाइट रायडर्सचा सहमालक व प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान याने ही स्पर्धा खेळविण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत. आता यावर बीसीसीआय काय मत व्यक्‍त करेल याकडे लक्ष लागले आहे. करोनामुळे आयपीएल स्थगित करावी लागली होती. ही स्पर्धा मूळ … Read more