#IPL2020 #Final : दिल्ली कॅपिटल्सला पंत, अय्यरने सावरले

दुबई –  कर्णधार श्रेय्यस अय्यरच्या नाबाद अर्धशतकी आणि रिषभ पंतच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने  20 षटकांत 7 बाद 156 धावा करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईसमोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान ठेवले आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला गोलंदाजी दिली होती. दिल्लीची सुरूवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टने मार्कस स्टोईनिसला … Read more

#IPL2020 #Final : दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला

दुबई – आयपीएल स्पर्धेत आज बलाढ्य मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वपूर्ण सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेत पाचवे विजेतेपद साकार करण्यासाठी रोहित शर्मा आणि कंपनी तर, पहिल्याच विजेतेपदासाठी श्रेयस अय्यर सज्ज झाले आहेत. या महत्त्वपूर्ण अशा लढतीस थोड्या वेळातच सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला … Read more

आवाज कुणाचा : मुंबई व दिल्लीमध्ये रंगणार आज अंतिम लढत

दुबई – आयपीएल स्पर्धेत आज बलाढ्य मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वपूर्ण सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेत पाचवे विजेतेपद साकार करण्यासाठी रोहित शर्मा आणि कंपनी तर, पहिल्याच विजेतेपदासाठी श्रेयस अय्यर सज्ज झाले आहेत.  यंदाच्या स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबईने 14 सामने खेळताना 9 विजयांची नोंद केली. त्यांना 5 सामने गमवावे लागले असले … Read more

क्रिकेट कॉर्नर : सातत्याचा अभाव

-अमित डोंगरे मुंबईकर अजिंक्‍य रहाणे याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे हे जरी सांगितले जात असले तरीही त्याची सातत्यता यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिसून न आल्यामुळे आता त्याच्या कामगिरीवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. भारतीय संघातील एक तंत्रशुद्ध फलंदाज अशी रहाणेची ओळख आहे. काही सामन्यांत तर त्याने कर्णधार विराट कोहलीवरही मात करत संघाच्या विजयात मोलाचे वाटे उचलले आहेत. त्याच्या … Read more

मुुंबई इंडियन्सच्या लकी आजी अमिरातीत दाखल

दुबई – मुंबई इंडियन्स संघासाठी सातत्याने प्रार्थना करत असलेल्या व संघासाठी अत्यंत लकी ठरत असलेल्या आजी अमिरातीत दाखल झाल्या असून आयपीएल स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी त्या उपस्थित राहणार आहेत. 2017 सालच्या आयपीएल स्पर्धेपासूनच मुुंबईच्या प्रत्येक सामन्यासाठी त्या स्टॅण्डमध्ये बसलेल्या दिसून आल्या आहेत. तसेच त्या मुंबई संघासाठी हाती कोणती तरी पोथी घेत प्रार्थनाही करताना अनेकदा दिसलेल्या आहेत. … Read more

क्रिकेट कॉर्नर : ऋतुराज ठरतोय ब्रॅण्ड

-अमित डोंगरे महाराष्ट्राचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडची चर्चा यंदाच्या आयपीएल स्पर्धेत होऊ लागली व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याला प्रशस्तिपत्रक देत त्याच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले. आता त्याला आकशही ठेंगणे वाटू लागले असेल. खरोखर महाराष्ट्राच्या मातीतील हा लढवय्या खेळाडू येत्या काळात स्टारपदाकडे पोहोचेल यात शंका वाटत नाही.  यंदाच्या आयपीएल स्पर्धेत त्याने केलेल्या अनेक खेळींचे कौतुक झाले. … Read more

#IPL2020 : दिल्ली दिमाखात अंतिम फेरीत

आबूधाबी – केन विल्यम्सनची वादळी अर्धशतकी खेळी व अब्दुल समदने दिलेल्या दमदार साथीनंतरही गोलंदाजांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने दुसऱ्या क्वॉलिफायरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव करत आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत त्यांची लढत बलाढ्य मुंबई इंडियन्सशी मंगळवारी होणार आहे.  विजयासाठी 190 धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा … Read more

#DCvSRH Qualifier 2 : धवनच्या खेळीने दिल्ली सुस्थितीत

आबूधाबी – सलामीवीर शिखर धवनच्या 78 तर शेमरन हेटमायरच्या नाबाद 42 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने क्वॉलिफायरच्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 20 षटकांत 190 धावा करण्याचे आव्हान ठेवले.  दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फलंदाजीत बढती मिळालेल्या मार्कस स्टोनिस व सलामीवीर शिखर धवन यांनी सार्थ ठरवला. … Read more

#DCvSRH : दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला…

आबुधाबी –आयपीएल स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात क्वॉलिफायर दोनमधील लढत होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने सुरुवातीचे काही सामने सोडले तर अत्यंत सुमार खेळ केला असल्याने याही सामन्यात हैदराबादचेच पारडे जड राहण्याची शक्‍यता जास्त आहे. हैदराबाद व दिल्ली यांच्यातील लढतीस थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (टाॅस) हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं … Read more

#IPL2020 : यंदा विजेत्याला मिळणार ‘इतके’ कोटी

नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेच्या विजेत्या संघाला गेल्या वर्षीपर्यंत 20 कोटी रुपये मिळत होते. यंदा मात्र, 10 कोटी रुपयांवरच समाधान मानावे लागणार आहे. बक्षीस रकमेत निम्मी कपात होणार असल्याचे बीसीसीआयने गेल्या मार्च महिन्यातच जाहीर केले होते.  यंदाच्या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या मंगळवारी होणार आहे. त्यात प्ले-ऑफमधील तसेच अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या संघांनाही मानधन दिले जाते. … Read more