IAS – IPS होण्याचे स्वप्न भंगले ! सरकारी अधिकाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

नागपूर – सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरूण सरकारी अधिकाऱ्याने नागपुरात (Nagpur News) आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. शुभम कांबळे (वय २५) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते अन्न व औषध प्रशासन विभागात निरीक्षकपदी कार्यरत होते. पोलिसांना शुभम कांबळे (Shubham Kambale) यांच्या खोलीत ४ ते ५ रसायनांच्या बाटल्याही आढळल्या आहेत. तसेच … Read more

कडक सॅल्यूट.! मजुराची मुलगी बोर्डात आली तिसरी, 500 पैकी तब्बल मिळवले ‘इतके’ गुण; IPS होण्याची व्यक्त केली इच्छा…

हरियाणा – तुमच्या मध्ये जर प्रचंड इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही यशाला नक्की गवसणी घालू शकतात असे वाक्य आपल्या कानावर नेहमी पडत असते. याच वाक्याचं ताज उदाहरण हरियाणातील एका तरुणी घडवून दिले आहे. हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील ज्योती राणी हिने हरियाणा शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत 500 पैकी 496 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला … Read more

पुण्यातील श्रीकांत धिवरे यांना आयपीएस दर्जा; राज्यातील पाच अधिकाऱ्यांना बढती

पुणे – भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) या वर्षी महाराष्ट्र संवर्गातून पाच अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2003 च्या बॅचचे हे अधिकारी आहेत. त्यात पुण्यातील श्रीकांत धिवरे (एसपी सीआयडी पुणे युनिट) यांच्यासह प्रकाश जाधव (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), विनय राठोड (पोलीस उपायुक्त झोन 5 ठाणे शहर), अश्विनी सानप (एसपी, सिक्‍युरिटी कॉर्पोरेशन) आणि रश्‍मी करंदीकर … Read more

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडीमधील मतभेद पुन्हा समोर, अवघ्या 12 तासांत पाच जणांच्या पदोन्नतीला स्थगिती

मुंबई  – राज्यात तब्बल 39 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या. मात्र, पत्रक काढून 12 तास उलटत नाही तोच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. अवघ्या काही तासात पोलीस पदोन्नती आदेशाला स्थगिती दिल्यामुळे गृहखात्याचा अजब कारभार समोर आला आहे. तसेच या बदल्यांवरून महाविकास आघाडीमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल … Read more

मोठी बातमी : दिव्यांग नागरिकही IPS सह इतर नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे.  न्यायालयाने UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग उमेदवारांना IPS, रेल्वे संरक्षण दल आणि DANIPS मध्ये नोकरीसाठी अर्ज सादर करण्याची परवानगी दिली आहे. हा अंतरिम आदेश असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती अभय एस ओका यांच्या खंडपीठानेआपला हा अंतरिम आदेश दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी दिला … Read more

लातूरच्या लेकीचा देशात डंका; 21 व्या वर्षी यूपीएससीमध्ये मिळवले यश; बनली देशातील सर्वात लहान आयपीएस

मुंबई : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेकजण आपल्या आयुष्याची महत्वपूर्ण वर्ष देत असतात. मात्र त्यात अनेकांना अपयश देखील येत. मात्र या सगळ्यात लातूरच्या लेकीने नुकताच यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होत देशात आपला डंका वाजवला आहे. एवढंच नाही तर देशात सर्वात लहान आयपीएस बनण्याचा मान देखील या मुलीला मिळाला आहे. यूपीएससी परीक्षेचा नुकताच निकाल लागला. त्यामध्ये महाराष्ट्रातील … Read more

Success Story: पहिल्यांदा IPS, दुसऱ्यांदा IAS बनल्या गरीमा, जाणून घ्या UPSC क्रॅक करण्याच्या टिप्स

नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. यामुळेच या परीक्षेत प्रत्येकाला यश मिळत नाही. परंतु असे काही उमेदवार आहेत ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आयएएस अधिकारी गरिमा अग्रवाल पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास झाल्या आहेत. गरिमा या मूळ मध्य प्रदेशातील खरगोन येथील … Read more

राज्य सरकारवर आरोप करण्यापूर्वी IAS, IPS अधिकारी फडणविसांना भेटतात; राष्ट्रवादीचा आरोप

मुंबई : ‘भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टार्गेट केलं जात, असल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. हे नियोजित कट कारस्थान असल्याचं मलिक यांनी म्हटलं. नवाब मलिक म्हणाले की,  सरकारवर आरोप करण्यापूर्वी काही आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बैठका विरोधीपक्ष … Read more

‘यूपीएससी’च्या परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली – देशातील कोविड-19 ची साथ आणि काही राज्यांमध्ये असलेल्या पूरस्थितीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. ‘यूपीएससी’च्या प्राथमिक फेरीची परीक्षा 4 ऑक्‍टोबर रोजी होणार आहेत. पूरस्थिती आणि कोविड-19 ची स्थिती आटोक्‍यात यावी, यासाठी किमान 2-3 महिने या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल … Read more

…अन्‌ 14 व्या वर्षी आयएएस बनली!

कांग्रा (हिमाचल प्रदेश) : कार्यलयातील शिपायाच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत तब्बल 94 टक्के गुण मिळवले… त्याचं कौतुक म्हणून तिला चक्क उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसण्याचा मान मिळाला. तिचा असा सन्मान करणारे अधिकारी होते, आयएएस जतिन लाल. हिना ठाकूर या मुलीने दहावीत 94 टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. ते पाहून लाल यांनी तिला एक दिवस उपविभागीय … Read more