पुण्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद!

पुणे – खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत अडीच टीएमसी कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे महापालिकेने जुलै अखेरपर्यंत धरणसाखळीतून दोन टीएमसी कमी पाणी वापर करावा, अशा सूचना पाटबंधारे विभागाने दिल्या होत्या. त्याच नियोजनाचा एक भाग म्हणून शहरात आता गुरूवारी पाणी पुरवठा बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे. शहरात प्रत्येक गुरूवारी पाणी बंद ठेवल्यास महापालिकेस महिन्याला ०.२५ टीएमसी पाणी वाचविता … Read more

आळंदी कार्तिकी यात्रेचे योग्य नियोजन करा; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश

पुणे – आरोग्य, नगरपालिका, पंचायत समिती, पाणीपुरवठा व स्वच्छता, आपत्तीव्यवस्थापन, महावितरण, पोलीस आदी सर्वच विभागांनी योग्य समन्वय ठेऊन आळंदी यात्रा उत्साहात पार पडेल याचे नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. कार्तिकी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. नदीमध्ये … Read more

पाण्याचा स्रोत काही सापडेना; गळती होते की सोडले जाते?

हर्षद कटारिया सहकारनगर – सिंहगड रस्त्यावर पु.ल.देशपांडे उद्यानालगत दररोज शकडो लिटर पिण्याचे स्वच्छ पाणी नाल्यात वाहून जात आहे. जनता वसाहत येथील स्थानिक नागरिकांनीही येथे गेली 15 वर्षांपासून हे पाणी वाहत असून ते कुठून येते हे माहिती नाही, असे सांगितल्याने पाण्याची गळती होते की सोडले जाते? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याबाबत “प्रभात’मध्ये वृत्त प्रकाशित होताच … Read more

PUNE : धरणे 97 टक्‍क्‍यांवर, आता नियोजनाची गरज

पुणे – यंदा जिल्ह्यातील बहुतांश धरणे काठोकाठ जरी भरली असली, तरी अनेक तालुक्‍यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा वर्षभरासाठीच्या पाणी वाटपाचे नियोजन करताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये 97 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली असली, तर उपलब्ध पाणीसाठ्याचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. … Read more

खडकवासलाच्या पाणीसाठ्यात वाढ; पानशेत धरणातून विसर्ग वाढविला

पुणे – घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पानशेत धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने पानशेत धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणांतून विद्युतनिर्मिती केंद्रातून 600 क्‍युसेक तर सांडव्याद्वारे 1194 असे एकूण 1794 क्‍युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे. शहरात आणि घाटमाथ्यावर चांगला पाऊस सुरू असला तरी पाणलोट क्षेत्रात मात्र, शनिवारी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. … Read more

पाणी ‘किलो’वर, बिले ‘टनां’वर; थकीत बिलांसाठी राज्य शासनाने बोलाविली बैठक

पुणे – पाटबंधारे विभागाकडून शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करत असताना, पालिकेस देण्यात आलेले पाणी शहरातील उद्योगांना दिले जात असल्याची आकडेवारी सादर करून पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे तब्बल 650 कोटींच्या थकबाकीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, पिण्यासाठी दिले जाणारे पाणी पाटबंधारे विभाग किलोलीटरने मोजून त्यावर बिल आकारते. मात्र, व्यावसायिक वापरासाठीच्या पाण्याला प्रती टन लिटरप्रमाणे बिल लावले … Read more

…पुण्याला मिळतेय कमी पाणी, गळतीच्या आकड्यातील गोंधळ; 34 गावांबाबतही घोळ

पुणे  -महापालिकेचा पाणी वापर राज्यशासनाने मंजूर केलेल्या पाण्याच्या कोट्यापेक्षा अधिक असल्याने महापालिकेने दरवर्षी पाण्याचे अंदाजपत्रक पाटबंधारे विभागास सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार महापालिकेने 2022-23 या वर्षासाठी पाटबंधारे विभागाकडे 16.52 टीएमसी पाणी देण्याची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात पाटबंधारे विभागाने 12.41 टीएमसीच पाणी मंजूर केले आहे. मात्र, पालिकेच्या मागणीतील 4 टीएमसी पाणी कमी करताना पाटबंधारे … Read more

जांभूळवाडी तलावाचा विकास खुंटला, PMC सह पाटबंधारे खात्याच्याही दुर्लक्षाचा परिणाम

  संतोष कचरे आंबेगाव बुद्रुक, दि. 4 -आंबेगाव परिसराचे भूषण असलेल्या जांभुळवाडी पाझर तलावाची निर्मिती 1972मध्ये करण्यात आली. अंदाजे साधारण 70 एकर जमिनीमध्ये हा तलाव पसरला आहे. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपीची सुविधा म्हणून या तलावाकडे आजही पाहिले जाते. परंतु, या तलावाच्या विकासाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. पाटबंधारे खाते आणि महानगरपालिका यांच्यातील तांत्रिक वादात … Read more

पिंपरी: पाटबंधारे विभागाला महापालिका देणार 20 कोटी 38 लाख रुपये

सिंचन पुनर्स्थापना खर्चाच्या चौथ्या हप्त्याची रक्कम पिंपरी – आंद्रा धरणातून पाणी आरक्षणापोटी महापालिकेने सिंचन पुर्नस्थापना खर्च म्हणून आतापर्यंत तीन हप्त्यात पाटबंधारे विभागाला 60 कोटी 48 लाख रुपयांची रक्कम अदा केली आहे. आता चौथ्या हप्त्यामध्ये 20 कोटी 16 लाख तसेच उर्वरित पाणीपट्टीची अनामत रक्कम म्हणून 22 लाख 4 हजार रुपये अशी एकूण 20 कोटी 38 लाख … Read more

हडपसर : अनाधिकृत झोपड्यांवर पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

हडपसर –  येथील औद्योगिक वसाहती मागील मुठा कालव्यालगत दोन्हीही बाजूने नव्याने होत असलेल्या व काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिक्रमणांवर पाटबंधारे विभाग व पालिकेने संयुक्तपणे कारवाई सुरु केली आहे. या सुमारे तीनशेच्यावर झोपड्यांवर ही कारवाई होत आहे. पाच जेसीबी, डंपर तसेच पाटबंधारे विभाग, पालिका व पोलीस असे सुमारे चारशे कर्मचारी ही कारवाई करीत आहेत. येथील पाटबंधारे विभागाच्या … Read more