रशियामध्ये मोठा दहशतवादी हल्ला ; अंधाधुंद गोळीबार अन् स्फोटात ७० जणांचा मृत्यू, 150 जखमी; ISIS ने जबाबदारी स्वीकारली

Moscow Concert Hall Attack । रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ल्यात  70 जणांचा मृत्यू झाला आहे तर  १५० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री १२ अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) गोळीबार आणि स्फोट घडवून आणला. मॉस्कोमध्ये झालेल्या या भीषण हल्ल्याची … Read more

NIA Raids : भारतावर हल्ल्याचा ISIS चा कट; NIA चे कर्नाटक, महाराष्ट्रात 40 हून अधिक ठिकाणी छापे

NIA Raids : दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आज सकाळपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सुमारे 44 ठिकाणी छापे टाकत आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) च्या माध्यमातून देशभरात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या कटाशी संबंधित प्रकरणात हा छापा टाकण्यात आला आहे. ISIS ही जगातील सर्वात … Read more

पुण्यातील इसिस मॉड्युलप्रकरणी 7 जणांविरुद्ध आरोपपत्र; एनआयएची मोठी कारवाई

मुंबई – पुण्यातील इसिस मॉड्युलप्रकरणी दहशतवादी हल्ले घडविण्याच्या कटात सहभागी असलेल्या सात जणांविरुद्ध आज आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दहशतवाद आणि हिंसाचाराशी संबंधित कारवायांसाठी निधी गोळा करणे, वॉन्टेड दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि सुधारित स्फोटके तयार करण्यासाठीची पूर्वतयारी केली जात असल्याचेदेखील आढळून आले आहे. मोहम्मद … Read more

सिलिंग फॅनमध्ये लपवली होती बॉम्बची ‘रेसिपी’; ‘इसिस’ दहशतवाद्यांकडून खुलासा

पुणे -“इसिस’ दहशतवादी संघटनेच्या महाराष्ट्र गटाशी संबंधित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. पुण्यात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांना पकडले होते. त्यानंतर हा साथीदार पसार झाला होता. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली. दरम्यान, दहशतवाद्यांकडे केलेल्या तपासात त्यांनी सरतेशेवटी सिलिंग फॅनमध्ये लपवलेली बॉम्बची रेसिपी सापडली होती. ही रेसिपीच दहशतवाद्यांना … Read more

‘आयसिस’शी संबंध; ठाण्यातून एकाला अटक

पुणे – दहशतवादी संघटना ‘आयसिस’च्या पुणे मॉड्युलशी संबंधित आणखी एका आरोपीला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली. आरोपी विदेशी दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय असल्याचे आढळून आल्याने त्याला शुक्रवारी ठाण्यातील पडघा येथून अटक करण्यात आली. शमील साकिब नाचन (रा. पडघा, ता. भिवंडी, जि. ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बॉम्ब बनविण्याचे … Read more

दहशतवादी कनेक्‍शनचा तपास आता ‘एनआयए’कडे

पुणे – पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे लागेबांधे “इसिस’ या दहशतवादी संघटनेशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता याप्रकरणाचा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला जाणार आहे. याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. “एनआयए’ सध्या “इसिस’चा महाराष्ट्र मॉड्युलच्या डॉ. अदनान अली सरकारचा तपास करत आहे. डॉ. सरकार आणि “एटीएस’ने अटक केलेल्या आरोपींचे लागेबांधे … Read more

विदेश वृत्त: मालदिवमधील दहशतवाद्यांवर अमेरिकेची कारवाई

माले (मालदिव)  – मालदीवमध्ये इसिस आणि अल-कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या समर्थकांवर अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. मालदीवमधील दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याबद्दल अमेरिकेने 20 व्यक्तींना अटक केले असून 29 कंपन्यांवर बंदी घातली आहे. भारत आणि मालदीवचे संबंध खूप घनिष्ठ आहेत. त्यामुळे भारताला अडचणीत आणण्यासाठी या दोन्ही दहशतवादी संघटनांनी मालदिवमधून कारवाया सुरु केल्या होत्या. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे … Read more

डॉ. अदनान ‘इसिस’चा म्होरक्‍या; चौकशीत धक्‍कादायक माहिती समोर

पुणे – पुण्यातील नामवंत खासगी रुग्णालयात भूलतज्ज्ञ असलेला डॉ. अदनान अली सरकार हा “इसिस’च्या महाराष्ट्र गटाचा (मॉड्युल) म्होरक्‍या असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. डॉक्‍टर ते “इसिस’चा म्होरक्‍या असलेल्या सरकार याचा गुन्हेगारीचा आलेख चढता असून, “इसिस’ संबंधित देशभरात आतापर्यंत अटक केलेल्यांचा त्याच्याशी कसा संबंध आला आहे, याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सुरू केला आहे. … Read more

पुणे: कोंढव्यातून दोघांना अटक ; एकाचा आयसिसशी संबंध तर दुसऱ्याकडून दहशतवाद्यांना आश्रय

‘एनआयए’ने घेतले डॉक्‍टरला ताब्यात पुणे – शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात दहशतवाद्यांसंबंधीच्या हालचालींत वाढ झाल्याचे दिसत आहे. 18 जुलै रोजी कोथरूड पोलिसांनी महम्मद इम्रान खान व महम्मद युनूस साकी या दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) व दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) आयसिसशी संबंध व दहशतवाद्यांना आश्रय(टेरर फंडिंग) दिल्याप्रकरणी दोघांना कोंढवा परिसरातून अटक केल्याने खळबळ उडाली आहे. … Read more

अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्याचे ISIS दहशतवादी संघटनेशी संबंध, NIAने केली अटक

अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी फैजान अन्सारी याला ISIS शी संबंध असल्याच्या आरोपावरून NIA ने अटक केली आहे. तपास संस्थेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) 19 वर्षीय विद्यार्थ्याला ISIS या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यापूर्वी त्याच्या झारखंडमधील घर आणि उत्तर प्रदेशातील भाड्याच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली. … Read more