उद्योजकांच्या समस्यांबाबत 15 दिवसांत तोडगा – सुभाष देसाई

कोल्हापूर : उद्योजकांच्या समस्यांबाबत ग्रामविकास, नगरविकास, उद्योग विभाग, उद्योग संस्थांचे प्रतिनिधी यांची एकत्रित 15 दिवसांत मंत्रालयात बैठक घेऊन निश्‍चितपणे त्यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते. देसाई म्हणाले, एकात्मिक औद्योगिक वसाहत धोरण … Read more

अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग; रिक्षासह 45 हजाराचा मुद्देमाल जप्त :

कोल्हापूर : रिक्षामध्ये अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग करतांना रिफिलिंगचे साहित्य व अन्य मुद्देमाल असा 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी राजू चंद्रकांत मस्के (व.व.38, रा. लक्षतीर्थ वसाहत) व रिक्षाचालक रमेश रामदास मोरे (व.व. 40, रा. सुतारमळा, रंकाळा परिसर) यांच्याविरुध्द पुरवठा निरीक्षक काशिनाथ रामचंद्र पालकर यांनी राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद  दाखल केली आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी … Read more