कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करा; आमदार राम शिंदे यांची सरकारकडे मागणी

जामखेड  – कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा, यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. याबाबत आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे. त्यानंतर जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून याबाबतचा अहवाल मागवला आहे. आमदार शिंदे यांनी केलेल्या महत्वपूर्ण मागणीमुळे जामखेड तालुक्यातील … Read more

Crime News । कर्जत येथे खुन करुन मृतदेह पुरला जामखेड तालुक्यात, पोलिसांनी केली दोन आरोपींना २४ तासात अटक

जामखेड (प्रतिनिधी) – कर्जत शहरातील राजीव गांधी नगर परिसरामध्ये राहत असणारा महेश उर्फ दहिष्या नर्गीषा काळे वय ३० वर्ष या युवकाचा काठीने व विटा याने मारहाण करून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाखाली पुरून ठेवण्याची खळबळ जनक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना कर्जत पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक … Read more

जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मुकादमावर गोळीबार; दोघांवर गुन्हा दाखल

जामखेड  : दीड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादम जखमी झाला असून याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दोघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्ट नुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की घटनेतील फीर्यादी आबेद … Read more

‘जामखेड तालुक्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, अन्यथा….; स्वप्नील खाडे यांचा इशारा

जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यामध्ये सन २०२३ मध्ये पूर्ण पाऊसकाळ हा कोरडा गेलेला असून थोडाफार प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यातच लघुपाटबंधारे व विविध स्वरूपाचे तलाव, नद्या, नाले यात कसल्याही प्रकारची पाणी पातळी साचलेली नाही. त्यामुळे तालुक्यात तात्काळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून चारा चावण्यासह पाण्याचे टँकर चालू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी तहसीलदार गणेश … Read more

नगर: जामखेड तालुक्यात अवकाळीच्या तडाख्यात फळबागाचे मोठे नुकसान; झाडाखाली फळांचा खच

जामखेड – तालुक्यातील खर्डा, पिंपळगाव आळवा, घोडेगाव परिसरात शनिवार (ता. 18) मार्च रोजी दुपारी अवकाळी पाऊस व गारपीटने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर ज्वारी, गहू, हरबरा, कांदे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये गारांचा खच साचलेला होता. जामखेड तालुक्यातील काही भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असून … Read more

जामखेड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यातील मुदत संपलेल्या, नव्याने स्थापित, आयोगाने निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या 3 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी हरकती व सूचना 4 मार्च 2022 पर्यंत तहसील कार्यालय येथे दाखल कराव्यात. असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे. जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या … Read more

प्रेयसीच्या आत्महत्यानंतर प्रियकरानेही घेतला गळफास; जामखेड तालुक्यातील घटना

जामखेड – तालुक्यातील आपटी या ठिकाणी धक्कादायक घटना घडली असून अल्पवयीन प्रेयसीच्या आत्महत्या नंतर काही वेळातच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी दोघा अल्पवयीन मुलगा व मुलीने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र दोघांनी आत्महत्या का केली या बाबत अद्याप माहिती समजु शकली नाही. या बाबत समजलेली माहिती अशी की, … Read more

जामखेड तालुक्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू

जामखेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोडेगाव, पाटोदा व खर्डा येथील तीन जणांचा वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.  याबाबत समजलेली माहिती अशी की, जामखेड शहरातील कर्जत रोडवरील एका विहीरीत मयत अमोल विश्वनाथ मोरे (वय २५, रा. पाटोदा ता. जामखेड) … Read more

जामखेड तालुक्‍यातील ‘तो’ बिबट्या अद्यापही मोकाटच!

ग्रामस्थांत भीतीचे वातावरण कायम जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्‍यातील नायगाव, बांधखडक शिवारात गेल्या 15 दिवसांपूर्वी आढळून आलेल्या बिबट्याला पडण्यास अजूनही वन विभागाला यश आलेले नाही. त्यामुळे या भागात बिबट्याची दहशत कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी कोणी बाहेर पडण्यास धजावत नाही. त्यामुळे या बिबट्याला पकडण्याचे आव्हान वन विभागापुढे कायम आहे. मागील पंधरा … Read more

जामखेड तालुक्यात वादळासह गारपीट

जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यातील नान्नज, जवळा, हळगाव, शिऊर, राजेवाडी, पाडळी, राजुरीसह अनेक गावात वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस झाला. त्यामुळे या गावात अनेक ठिकाणी वीजेचे पोल, घरांचे पत्रे व झाडे उन्मळून पडली.तसेच नाहुली येथील शेतकरी राजेंद्र दशरथ जाधव यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जखमी झाले. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक ढग दाटले. तालुक्यातील शिऊर, हळगाव, पाडळी, सावरगाव, कुसडगाव, झिक्री, नान्नज, दैवदैठण, धोंडपारगाव, राजुरी, नान्नज, जवळा, राजेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. शहरातील बसस्थानकाजवळील साईबाबा हॉस्पिटल समोरील रस्त्यावरील झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळले. जामखेड खर्डा या राज्य मार्गावरील राजुरी या ठिकाणी वादळाने वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ जीवनावश्यक वाहनांची वाहतूक बंद झाली होती. तालुक्यातील पाडळी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक झाडे कोलमडून पडली असून गारपीटीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे.तसेच जामखेड तालुक्यातील शिऊर येथील बिंडावस्तीवर देखील मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. तसेच शिऊर येथील शेतकरी सोमनाथ तनपुरे यांच्या पॉलिहाऊसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हळगाव, पाडळी येथे दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. जवळा या ठिकाणी देखील वादळाने अनेक घरांच्या पत्र्याचे शेड उडुन गेले आहे. जवळा व गोयकरवाडी परिसरात तूफान वादळी वाऱ्यामुळे वीजेचे खांब देखील मोडून पडले. सर्वत्रच करोनाचा प्रादुर्भावाने मोठ्या संकटात सापडला असताना आता हातातोंडाशी आलेला घास गारपीटीने हिसकावून घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडत आहे. या गारपीटीत टरबूज, खरबूज, भाजीपाला इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात गारपीटीने झालेल्या पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच तालुक्यातील गारपीट झालेल्या भागात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी भेट देऊन पहाणी केली आहे.