satara | पराभव झाला असला तरी माणमध्ये उठावदार काम

वडूज, (प्रतिनिधी) – माढा लोकसभा मतदारसंघात भजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला असला तरी माण मतदार संघात आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पक्ष कार्यकर्त्यांनी उठावदार काम केले आहे. काही झाले तरी उद्याच्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरेच आमदार असतील, असा ठाम विश्वास माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी व्यक्त केला. येथील नगरसेविका सौ. रेखा … Read more

मोठ्या शहरात कर्तबगारी दाखविणे अवघड आ. गोरे

वडूज – खेडेगावातून येऊन मोठ्या शहरात कर्तबगारी दाखविणे फार मोठे अवघड काम आहे, असे मत माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. मुळीकवाडी (ता. खटाव) येथील पुकळे बंधूंनी पुणे येथील सिंहगड रोडवर वैष्णवी उद्योग समूहाच्यावतीने आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खडकवासल्याचे आ. भीमराव तापकीर, खटावचे माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर, कुमारभाऊ गोसावी, आयकर आयुक्त … Read more

सातारा – रामराजेंच्या नादाला लागलेल्यांचे वाटोळेच झाले

सातारा – आजपर्यंत रामराजेंच्या नादाला जे लागले त्यांचे वाटोळेच झाले आहे. त्यांना काळाचा महिमा कधी समजलाच नाही. सिद्धनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीत आम्ही फलटणमध्ये लीड घेऊन त्यांना तोंडावर पाडले. त्याची त्यांना शरम नाही. मी अनेक संस्था वाचवल्या आहेत. मात्र, फलटणची मालोजीराजे बॅंक चालवायला देणाऱ्यांनी, श्रीराम साखर कारखाना, दूध संघासारख्या संस्थांची वाईट अवस्था करणाऱ्यांनी माझ्या नादाला लागू नये, … Read more

सातारा – टेंभू योजनेचे काम फेब्रुवारीत सुरु करणार

सातारा  – बारामतीचे पवार इथे येऊन तुम्हाला द्यायला पाणीच नाही असे जाहीरपणे सांगायचे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या अभूतपूर्व निर्णयामुळे कलेढोण, मायणीसह गावांमध्ये पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला असताना पवारांचेच बगलबच्चे पाणी त्यांनी आणल्याचा हास्यास्पद कांगावा करत आहेत, असा टोला आ. जयकुमार गोरे यांनी लागावला. कवसकुलीच्या बियांनी कितीही अडचणी आणल्या तरी टेंभू योजनेच्या कामांची सुधारित प्रशासकीय … Read more

सातारा – विखळे येथील पाणी परिषदेत दिलेला शब्द पूर्ण केला

सातारा – कृष्णा खोरे लवादाचा निर्णय बदलण्याचा आणि पाण्याचे फेरवाटप करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यांच्यामुळेच माण, खटावच्या वंचित भागाला पाणी उपलब्ध झाले आहे. टेंभूच्या आरक्षित अडीच टीएमसी पाण्याने 37 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. फडणवीस सोडून दुसरा कुणी नेता आजपर्यंत आपल्या पाठीशी उभा राहिला नाही, अशी खंत आ. जयकुमार गोरे यांनी … Read more

सातारा – जयकुमारच्या नादाला अजिबात लागू नका

सातारा -“”मी प्रांत, कलेक्‍टर, आयुक्त, सचिव आणि पवारांचा चमचा नाही. मी तालुक्‍यात आलो तेव्हाही चांगली गाडी घेऊनच आलो होतो. माझे जे काही आहे ते व्यवसायातून आणि खुल्या किताबाप्रमाणे आहे. पवारांनी माझी पाच वेळा चौकशी लावली होती. मात्र, ज्या दिवशी तुमची चौकशी लावू त्यादिवशी तुमची जागा कुठे असेल याचा विचार करा. जयकुमारला डिवचू नका. नादाला तर … Read more

नगर – 603 गावांत लंपीचा प्रादुर्भाव

नगर – जिल्ह्यात लम्पी साथरोगाची लागण आटोक्‍यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 603 गावात 855 बाधीत जनावरांची संख्या आहे. तर 292 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मागीलवर्षी हाच आकडा 50 हजारांपर्यंत गेला होता. तरीही पावसाळ्यामुळे आवश्‍यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आहेत. जिल्ह्यात 13 लाख जनावरांची संख्या असून 72 हजार 685 गोवर्गीय जनावरांची संख्या आहे. … Read more

आ. जयकुमार गोरे यांनी जयंत पाटलांना दिले आव्हान

सातारा – दुष्काळग्रस्तांच्या मुळावर उठलेल्या बारामती, फलटण आणि लोधवडेकरांसारख्या नतद्रष्टांमुळे माजी मंत्री जयंत पाटील यांनीच जिहे कठापूरच्या वाढीव कामाचे टेंडर रखडवले होते. मात्र, त्याच जयंत पाटील यांनी माझ्यावर असभ्य टीका केली. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी इस्लामपुरात स्टेज टाकून माझ्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी दिले. माजी आयुक्त असणाऱ्या अधिकाऱ्याला प्रस्ताव … Read more

जयकुमार गोरेंनी मानले फडणवीस यांचे आभार

सातारा  -खटाव, माणसह सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी अतिरिक्‍त पाण्याची तरतूद करण्यासाठी फेर जलनियोजनाचा निर्णय घेणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ. जयकुमार गोरे यांनी आभार मानले. मुंबई येथे श्री. फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी दुष्काळी जनतेच्या वतीने धन्यवाद दिले. अवर्षण प्रवण खटाव, माण, कोरेगाव आणि सातारा तालुक्‍यात शेती सिंचनासाठी अतिरिक्‍त पाणी उपलब्ध करणे गरजेचे होते. कृष्णा … Read more

शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन घेतली जयकुमार गोरे यांची भेट; तीन दिवसांपूर्वी झाला होता अपघात

पुणे – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदार जयकुमार गोरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. यावेळी पवारांनी गोरे यांच्या तब्येतीबाबत विचारपूस देखील केली. राज्यात एकीकडे हिवाळी अधिवेशनामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असल्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशात पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन शरद पवार यांनी गोरे यांची भेट घेतल्यामुळे एका वेगळ्या राजकारणाचे दर्शन यावेळी सर्वांना … Read more