युक्रेनचा तिढा सोडवण्याची जिनपिंग यांची तयारी

बीजिंग – युक्रेनचा तिढा सोडवण्यासाठी विधायक भूमिका बजावण्याची चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तयारी दर्शवली आहे. चीनमधील सरकारी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याबरोबर फोनवरून चर्चा करताना जिनपिंग यांनी युक्रेनचा तिढा योग्य मार्गाने सोडवण्यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीने भूमिका घेण्याची गरज असल्याचे आवाहन केले. त,ेच या प्रकरणी चीन आपली विधायक भूमिका यापुढेही … Read more

अमेरिका-चीन संबंध सुधारणार; बायडेन-जिनपिंग यांच्यात तैवान, सागरी हद्द, व्यापार, अर्थकारण विषयावर चर्चा

बीजिंग- वॉशिंग्टन  – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात आज बहुप्रतिक्षित शिखर परिषद झाली. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने या चर्चेदरम्यान मानवी हक्क, व्यापार, तैवान आणि भारत- प्रशांत क्षेत्रातील संबंधांसह विविध विषयांवर चर्चा झाली. बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांदरम्यान फोनवरून दोनवेळा चर्चा झाली होती. मात्र दूरदृश्‍य … Read more

युद्धखोरीमुळे जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्ष पदाची तिसरी संधी हुकणार

बीजिंग- चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या युद्धखोरीमुळे जागतिक पातळीवर चीन टीकेच्या भोवऱ्यात सापडला आहे. परिणामी शी जिनपिंग यांना आता फार काळ राष्ट्राध्यक्षपदी राहता येणार नाही, असे ठोकताळे जागतिक पातळीवर बांधले जात आहेत. तैवानाच्या सागरी आणि हवाई हद्दीतील घुसखोरी, मानवी हक्कल्लांचे उल्लंघन आणि इतर अनेक मुद्द्यांवर जाब विचारण्यासाठी जी 7 परिषदेने नुकतेच शी जिनपिंग यांना … Read more

चीनचा अमेरिकेला इशारा!

बीजिंग – तैवानच्या खाडीतील युद्धनौकेच्या निमित्ताने अमेरिका आणि चीनमधील तणाव पुन्हा एकदा उफळला आहे. अमेरिकेची युद्धनौका तैवनच्या खाडीत असल्याचे निदर्शनास आणून चीनने या संदर्भात अमेरिकेला इशारा दिला आहे. या युद्धनौकेच्या उपस्थितीवरून आपण आपल्या नाविक आणि हवाई दलांना सतर्क केले आहे, असे चीनने म्हटले आहे. चीनच्या नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रवक्‍ते मेजर. झांग चुनशुयान यांनी या संदर्भातील … Read more

जिनपिंन यांच्या आदेशानेच गलवान खोऱ्यात हिंसाचार

वॉशिंग्टन – लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेला हिंसाचार हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर झाला आहे, अशा दावा अमेरिकेच्या “न्यूजवीक’ या वृत्तपत्राने केला आहे. तसेच या संघर्षात चीनचे 40 ते 50 नव्हे तर 60 सैनिक ठार झाल्याचाही उल्लेख केला आहे. “न्यूजवीक’च्या वृत्तात इशारा देताना म्हटले की, चीन आपल्या अपयशामुळे अधिक अस्वस्थ … Read more

नेपाळशी यापुढेही घनिष्ट संबंध ठेवणार – शी जिनपिंग यांचे प्रतिपादन

बीजिंग – नेपाळबरोबर चीनला घनिष्ट संबंध कायमच ठेवायचे आहेत, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. नेपाळमध्ये पंतप्रधान के. पी. शर्मा ओली हे चीनचे मित्र आहेत; परंतु त्यांना सत्तेवरून घालवून देण्याचा प्रयत्न तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या दुसऱ्या गटाने हाती घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर शी यांच्या वक्‍तव्याला महत्त्व दिले जात आहे. चीन-नेपाळ संबंधांना 65 वर्षे पूर्ण … Read more

चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी अनुभवले कथकलीचे सौंदर्य

मल्लपुरम्‌ : बंगालच्या उपसागराच्या समोर असणाऱ्या शेकडो वर्ष पुरातन असणाऱ्या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपींग यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला. भारतीय पारंपरिक नृत्य कथकली आणि भरत नाट्यमच्या सादरीकरणातून भारतीय परंपरेची पाळेमुळे दर्शवण्यात आली. या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यापुर्वी जीनपींग यांना अर्जुनाने रपश्‍चर्या केलेले स्थळ, कृष्णाचा लोण्याचा गोळा आणि मल्लपुरम्‌मधील किनारावर्ती मंदिरांची सैर … Read more