Rozgar Mela : पंतप्रधान मोदी उद्या ५१ हजार लोकांना देणार सरकारी नोकऱ्या ; आतापर्यंत लाखो लोकांना मिळाले नियुक्तीपत्रे

Rozgar Mela : देशात यावर्षी अनेक रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून यामध्ये लाखो कामगारांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत. त्याच पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर म्हणजे उद्या दुपारी 4 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नव्याने नियुक्त झालेल्या 51,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाही पंतप्रधान संबोधित करणार आहेत. … Read more

सातारा जिल्हा रुग्णालयातील भरती पुढील महिन्यात शक्‍य

सातारा  – क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील मनुष्यबळासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. आवश्‍यक पदांच्या भरती प्रक्रियेची मोहीम पुढील महिन्यात राबवली जाण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर मनुष्यबळाचा प्रश्‍न सुटेल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांनी पत्रकारांना सांगितले. जिल्हा रुग्णालयाच्या 15 वॉर्डसह बाह्य रुग्ण विभागाचा डॉ. राधाकिसन पवार यांनी राऊंड घेतला. यावेळी रुग्णांशी चर्चा करून त्यांना … Read more

Govt Job: अभियांत्रिकी पदवीधारकांसाठी DRDOमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, मूळ वेतन 1.31 लाख रुपयांपर्यंत

DRDO RAC Scientist Recruitment 2023: संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने वैज्ञानिक ‘C’, वैज्ञानिक ‘D’, वैज्ञानिक ‘E’ आणि वैज्ञानिक ‘F’ च्या पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी DRDO मध्ये सामील होण्याची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rac.gov.in वर जाऊन रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. DRDO … Read more

UP: हातात रिव्हॉल्व्हर घेऊन इंस्टाग्रामवर रिल बनवणं महिला पोलिसाला पडलं महागात, गमावली नोकरी…

लखनौ – उत्तर प्रदेशातील आग्रा येथील महिला काॅन्स्टेबलला हातात रिव्हाॅल्व्हर घेऊन रिल बनवणे चांगलेच महागात पडले आहे. त्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. रिल व्हायरल झाल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. संबंधित प्रकरण पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्यांनी खजिल होऊन स्वत:च राजीनामा दिला. मात्र त्यानंतर त्यांनी सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी अर्ज … Read more

compassionate job: अनुकंपा तत्त्वावर भावाच्या जागी बहिणीला नोकरी मिळू शकत नाही – न्यायालय

बेंगळुरू  – विवाहित बहिणीचा तिच्या भावाच्या ‘कुटुंबा’च्या व्याख्येत समावेश नाही, असे सांगून भावाच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर (compassionate job) त्याच्या बहिणीला नोकरी मिळू शकत नाही. अशा प्रकारे नोकरीची मागणी करणाऱ्या एका महिलेची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्या. कृष्णा दीक्षित यांच्या खंडपीठासमोर तुमकुरू येथील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय पल्लवी जीएमने … Read more

नागपुरात तब्बल १११ जणांची नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक; भामट्याने लाटले ५ कोटी

नागपूर :  नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण जगभरातील तरुण ज्या संस्थेत जाऊन आपले स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा बाळगतात त्या नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक केली आहे. एका भामट्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 111 जणांची नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केली आहे. ओमकार तलमले असे फसवणूक करणाऱ्याचे नाव असून ओमकारने … Read more

सतिशशेठ धोंडीबा मिसाळ प्रतिष्ठानतर्फे भव्य नोकरी महोत्सव; आमदार माधुरी मिसाळ यांची माहिती

पुणे –  सतिशशेठ धोंडीबा मिसाळ प्रतिष्ठानतर्फे येत्या शनिवारी दि. १५ जुलै रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवक, युवतींसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी असून जवळपास ५००० पेक्षा अधिक जणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. ३५ पेक्षा जास्त नामांकित कंपन्या यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. इयत्ता पाचवी … Read more

शासन आपल्या दारी, नेत्यांची दिल्लीवारी; जेजुरीत होणारा कार्यक्रम पुन्हा रद्द

पुणे – आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधीनंतर खातेवाटपावरून सुरू असलेल्या वाद या कारणांमुळे जेजुरी (ता.पुरंदर) येथे होणारा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम दोनदा पुढे ढकलण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार होते. याठिकाणी मोठे शक्तीप्रदर्शन होणार असल्याने जय्यत तयारी प्रशासनाने केली होती. … Read more

प्रेमात सैराट होत नोकरदार तरुणीने बॅंकेच्या पैशावर मारला डल्ला

पाथर्डी – प्रेमात सैराट झालेल्या व खासगी बॅंकेत नोकरीस असलेल्या तरुणीने बॅंकेतील सुमारे साडे 38 लाख रुपये आणि बारा तोळे सोने प्रियकराबरोबर घेऊन पोबारा केला आहे. या घटनेबाबत मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पाथर्डी पोलिसात दाखल केली आहे. पाथर्डी शहरातील एका खासगी पतसंस्थेमध्ये नोकरीस असलेली वीस वर्षांची तरुणी रोख रक्कम 38 लाख 34 हजार … Read more

आई-वडिलांंची काळजी घेण्यासाठी स्वीकारली पूर्णवेळ मुलीची नोकरी; दरमहा घेते ‘इतका’ पगार

बीजिंग – वयोवृद्ध पालकांची काळजी घेण्याचे काम मुलगा किंवा मुलगी यांनी करावे हे सांस्कृतिक तत्व जगाच्या पाठीवरील सर्वच देशांमध्ये लागू होते. विविध कारणांनी जरी मुले आपल्या पालकांची प्रत्यक्ष काळजी घेत नसले तरी आर्थिक बाबतीत मात्र ते मदत करत असतात. आता चीनमध्ये एक आगळीवेगळी बाब समोर आली आहे. एका चाळीस वर्षे महिलेने आपली नोकरी सोडून आई-वडिलांची … Read more