नोकरभरती पुण्यात, जाहिरात बिहारमध्ये ! पीएमआरडीए कार्यालयासमोर ‘मनसे’चे आंदोलन

औंध -शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रोसाठी कामगारांची भरती केली जाणार आहे. मात्र, या भरतीची जाहिरात बिहारमधील वृत्तपत्रात देण्यात आली आहे. याचा निषेध करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मेट्रो प्रशासन आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या कार्यालयासमोर जोरदार निषेध आंदोलन केले. स्थानिकांना नोकरीपासून वंचित ठेवत बिहारच्या तरुणांना रोजगार का देता? असा सवाल या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात … Read more

कराडच्या युवकाला नोकरीच्या अमिषाने साडेसहा लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा

कराड  – ऑनलाइन काम देण्याची बतावणी करून, आपली साडेसहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद तुषार मच्छिंद्र शिंदे (रा. मार्केट यार्ड, शनिवार पेठ, कराड) याने कराड शहर पोलीस ठाण्यात दिली असून, अज्ञातावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, तुषार शिंदेला सोशल मीडियावर ऑनलाइन काम देणार असल्याचा मेसेज आला होता. त्याने मेसेजला उत्तर देत ऑनलाइन … Read more

बसून गांजा ओढा आणि दरमहा ८८ लाख पगार घ्या! जगातील सर्वात विचित्र नोकरी करणार का?

एका जर्मन कंपनीने अतिशय विचित्र काम हाती घेतले आहे. बसून गांजा ओढा आणि दरमहा ८८ लाख रुपये पगार घ्या! या नोकरीला जगातील सर्वात विचित्र नोकरी म्हटले जात आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना ही नोकरी मिळेल त्यांना भरघोस पगार मिळेल. याला ‘सर्वात नशेचे काम’ म्हटले जात आहे. जर्मन कंपनीने ‘कॅनाबिस टेस्टर’ पदासाठी ही नोकरीची … Read more

नोकरीच्या आमिषाने महिलेची पावणेसहा लाखांची फसवणूक

सातारा – शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची पावणेसहा लाख रुपयांची फसवणूक केली आणि तिच्यावर अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अब्दुल राजकर रवाठार-शेख (रा. मिरज), तेजस्वी भास्कर चव्हाण (रा. पीरवाडी, सातारा) आणि हिना अमन अफराज (रा. करंजे, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. जुलै ते डिसेंबर 2022 या … Read more

कोविडमुळे आयटी क्षेत्रातील रोजगार वाढले; केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांचा दावा

कोची – कोविड महामारीमुळे डिजिटल सेवांची मागणी वाढली आहे त्यामुळे अनेक व्यावसायिकांना आयटी क्षेत्रात रोजगार मिळत आहे असे आयटी आणि कौशल्य विकास मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. कोची येथे सेंट तेरेसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत आयटी क्षेत्रात 18 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे … Read more

Employment : राज्यात ऑक्टोबरमध्ये 21 हजार बेरोजगार उमेदवारांना रोजगार

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये 21 हजार 525 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार … Read more

वैद्यकीय विभागाचा दरमहा भरणा एक कोटी

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये 1 ऑगस्ट 2022 पासून उपचाराकरिता शासकीय दर लागू केले. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नामध्ये एकाच महिन्यात तब्बल 45 लाख 38 हजार 404 रुपयांची वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात वैद्यकिय विभागाने महापालिकेच्या कोषागरात एक कोटी 24 लाख 40 हजार 621 रुपयांचा भरणा केला. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये पूर्वी पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या … Read more

नोकरीच्या आमिषाने 19 लाखांची फसवणूक

सातारा -सरकारी नोकरीचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून अनेक तरूणांची 19 लाख रूपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गणेश कृष्णा चव्हाण (रा.सदरबझार, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश नंदकुमार शिंदे (रा. बोरगाव, ता. सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. 7 जानेवारी 2021 ते दि. 31 मार्च 2021 या … Read more

Bandhan Bank Recruitment 2022: 12वी पास उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, पाहा संपूर्ण माहिती

Bandhan Bank Recruitment 2022: बंधन बँकेने डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. यासाठी त्यांना कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या ncs.gov.in या पोर्टलवर जावे लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2022 आहे. डेटा एंट्री ऑपरेटरच्या 39 पदांच्या भरतीसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. मान्यताप्राप्त बोर्डाचे 12वी … Read more

पालिकेतही भरतीसाठी खासगी एजन्सी

पिंपरी  – राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकर भरती करण्यासाठी खासगी कंपन्यांचा सहभाग वाढला आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेनेदेखील खासगी संस्थांच्या मदतीने भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका गट “अ’ ते ‘क’ संवर्गातील विविध 128 पदांसाठी अर्ज मागवले आहे. आतापर्यंत महापालिकेला 19 हजार 15 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा राज्य शासनाच्या आदेशानुसार … Read more