विरोधकांच्या अस्त्राची धार भाजप करणार बोथट

नवी दिल्ली -केंद्र सरकारने भरतीप्रक्रियेसंदर्भात ठोस पाऊले उचलण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे विरोधकांकडून उगारण्यात येणाऱ्या बेरोजगारीच्या अस्त्राची धार बोथट करण्यास सत्तारूढ भाजप सज्ज होऊ शकणार आहे. देशात बेरोजगारी वाढल्याच्या मुद्‌द्‌यावरून विरोधक सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला घेरतात. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांत विरोधकांनी भाजपची कोंडी करण्यासाठी बेरोजगारी हा प्रचाराचा महत्वाचा मुद्दा बनवला. आता आगामी … Read more

“त्या’ पाच स्टार्टअपना 10 लाखांची कामे देणार – सतेज पाटील

कोल्हापूर – लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्वानिमित्त आयोजित स्टार्टअप समिटमध्ये चांगल्या संकल्पनांना मूर्त स्वरुप देण्याचा मानस आहे. स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी या इनोवेशन कॉम्पिटीशन व प्रदर्शनात पहिल्या पाच क्रमांकाच्या स्टार्टअपना शासनाकडील 10 लाखाची कामे देण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्वानिमित्त शाहू मिल … Read more

पुणे : नोकरीसाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे सहकार्य

पुणे-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नोकरीसाठी मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाने “स्मार्ट इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म’ सुरू केले असून, त्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून त्या अनेक कंपन्यांना पाठविण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्प यांच्या एकत्रित प्रयत्नातून “स्टिक’ या उपक्रमांतर्गत … Read more

मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना नोकरी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसाला एसटी महामंडळात अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मृत्यू झालेल्या ३५ आंदोलकांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ३५ पैकी सहा जणांनी एसटीतील नोकरीत स्वारस्य दाखवले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर १२ आंदोलकांच्या वारसांना एसटीत नोकरी देण्याचा … Read more

नोकरीची मोठी संधी! हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती

मुंबई –  हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती आहे. कंपनीने इंजिनिअर पदासाठी अर्ज मागवले आहेत. मॅकेनिकल इंजिनिअर १२० पदे, सिव्हिल इंजिनिअर ३० पदे, इलेक्ट्रिकल इंजिनिअर २५ पदे, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर २५ पदे अशी एकूण २०० पदे आहेत. पात्र आणि ईच्छुक उमेदवार १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता • या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार आयसीटीई … Read more

RBI Recruitment : भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे – कोरोनाचा सगळ्यांसाठीच खूप अवघड काळ होता. यादरम्यान उद्योग-धंद्यांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने अनेक तरुणांच्या नोकरीवर गदा आली. कोरोनामुळे अनेक सरकारी भरती प्रक्रिया देखील लांबणीवर गेल्या.  त्यानंतर अनेकजण पदवीधर तरूण नोकरी आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.मात्र अशातच रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) मोठी भरती प्रक्रिया (Recruitment In RBI) सुरू झाल्याने संबंधित क्षेत्रातील तरुणांना दिलासा … Read more

खादी आणि ग्रामोद्योग आयोगात संचालक आणि उपसंचालकांची पद भरती

पुणे – खादी आणि ग्रामोद्योग आयोगात संचालक  आणि उपसंचालकांची पद भरती होत आहे. संचालक पदासाठी एकूण 18 तर उपसंचालक पदासाठी 16 जागा आहेत. आवेदनाची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2020 असून संचालक पदासाठी वयोमर्यादा कमाल 50 वर्षे तर  उपसंचालक पदासाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्षे इतकी आहे. सविस्तर माहिती – पदाचे नाव : संचालक (एकुण पदे 18) … Read more

खूशखबर…”एम.कॉम.’ होणार रोजगाराभिमुख

सुधारणा करण्यासाठी पुणे विद्यापीठाचे पाऊल स्पेशलायझेशन विषयात वाढ करण्याचा निर्णय पुणे  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता “एम.कॉम’ या पारंपरिक अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या पारंपरिक अभ्यासक्रमातून रोजगाराची संधी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर विद्यापीठाने सध्याच्या काळातील आणि उद्योग क्षेत्रातील मनुष्यबळाची निकड लक्षात घेत “एमकॉम’च्या स्पेशलायझेशन विषयात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.   … Read more

कर्नाटकमध्ये नोकऱ्यांसाठी कन्नड चाचणीची शक्‍यता

बेंगळूरु – कर्नाटकमध्ये स्थानिक युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी कर्नाटक सरकार लवकरच कन्नड भाषा चाचणी घ्यायला सुरुवात करणार आहे. ‘कन्नड भाषा कौशल्य परीक्षा’ असे या चाचणीचे नाव असणार आहे. स्थानिक नोकऱ्या अथवा शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात येणर आहे. केंद्र सरकारने ज्याप्रमाणे ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीची पदभरती करण्यासाठी ज्याप्रमाणे राष्ट्रीय पात्रता … Read more

नव्या `सीए’ना मागणी वाढली

नवी दिल्ली – चालू वर्षात करोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीत प्रचंड घट झाली असली तरी नव्यानेच उत्तीर्ण झालेल्या चार्टर्ड अकाउन्टंटना विविध पदांवर मोठी मागणी असल्याचे सीए इन्सिट्यूटच्या कॅम्पस प्लेसमेंटच्या आकडेवारीवरून दिसत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्टंटस् ऑफ इंडियाने (आयसीएआय) सप्टेंबरमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या व्हर्च्युअल कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नव्याने उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीची ऑफर मिळण्याच्या संख्येत तब्बल 37 … Read more