केंद्र सरकारचा मोठा निर्णय: नोकरी गमावलेल्यांना सरकार देणार 50 टक्‍के पगार

नवी दिल्ली : करोनामुळे देशात तीन महिने पुर्णपणे लॉकडाऊन होता. त्यातच काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. अशाच नोकऱ्या गमावणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कामगारांना मिळणाऱ्या बेरोजगार भत्त्यासाठी केंद्राकडून नियम शिथील करण्यात आले आहेत. करोना काळात नोकरी गेलेल्यांसाठी बेरोजगार भत्ता म्हणून तीन महिन्यांचा 50 टक्के पगार दिला जाणार आहे. पण ही सुविधा फक्त … Read more

मोदी सरकारकडे युवकांना रोजगार देण्याची क्षमता नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न उपस्थित करीत मोदी सरकारला त्या विषयावरून घेरले आहे. या संबंधात त्यांनी बेरोजगारीच्या विरोधात मोदी सरकारच्या विरोधात रोजगार दो अभियान सुरू केले आहे. ट्‌विटरवर जारी केलेल्या एका व्हिडीओ संदेशात त्यांनी म्हटले आहे की, देशात दर वर्षी किमान दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्‍वासन देऊन … Read more

मुंबईमध्ये 17 हजार पदांची मेगा भरती

मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध कामे करणाऱ्या कंत्राटदार यांच्याकडील सुमारे 17 हजार पदांच्या भरतीसाठी कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 2 हजार 923 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने 6 ते 8 … Read more

राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती लवकरच

पाठपुरावा सुरूच : मुंबईतील बैठकीत शिक्षणमंत्र्यांचे आश्‍वासन अनुकंपा भरतीबाबत तत्काळ कार्यवाही होणार पुणे – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाबाबत मागील सरकारने घातलेला घोळ दुरुस्त करून तात्काळ भरती सुरू करण्याबाबतचे आश्‍वासन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी औरंगाबाद विभागाचे शिक्षक … Read more

3,737 रिक्‍त पदांसाठी निगडीत मंगळवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे – विविध खासगी कंपन्यांमधील रिक्‍त पदांसाठी निगडी येथे मंगळवारी (दि.18) पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात एकूण 32 कंपन्या सहभागी होणार असून, त्यामधील एकूण 3 हजार 737 रिक्‍त पदांकरिता पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्याकरिता दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर, कोणताही आयटीआय ट्रेड, बी.ई. मेकॅनिकल, बीबीए, … Read more

एसटीत चालक, वाहकांची होणार भरती

पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) चालक व वाहकांची भरती होणार आहे. यासाठी 15 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून राज्याच्या विविध जिल्ह्यात 3 हजार 6 चालक-वाहकांच्या जागा भरणार आहेत. एसटीच्या ताफ्यात बसची संख्या वाढत असताना चालक-वाहकांअभावी खोळंबा होत होता. यामुळे, महामंडळाने चालक-वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10 वी … Read more

सार्वजनिक स्वयंपाकघरांवरून सर्वोच्च न्यायालय कठोर

केंद्र सरकार आणि राज्यांना 5 लाख रूपयांचा दंड नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सार्वजनिक स्वयंपाकघरांच्या (कम्युनिटी किचन्स) मुद्‌द्‌यावरून कठोर भूमिका घेतली. त्या मुद्‌द्‌याशी निगडीत जनहित याचिकेवर उत्तर न दिल्याबद्दल न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्यांना 5 लाख रूपयांचा दंड ठोठावला. देशभरात सार्वजनिक स्वयंपाकघरांची उभारणी करावी, अशी मागणी करणारी याचिका काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे. … Read more

74 पदांची शैक्षणिक निकषानुसार भरती

पुणे – जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गाच्या 714 रिक्‍त पदे सरळसेवेने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी 10 टक्‍के म्हणजेच 74 पदे ग्रामपंचायत कर्मचारी सेवाज्येष्ठता यादीतून शैक्षणिक निकषानुसार भरणार आहेत. त्या कर्मचाऱ्यांची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. संबंधित पात्र कर्मचाऱ्यांनी 10 फेब्रुवारीपर्यंत विस्तार अधिकाऱ्यांकडे काही आक्षेप असल्यास कागदपत्रांसह नोंदविण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाने दिल्या आहेत. जिल्हा … Read more

विविध 714 रिक्‍त पदांची सरळसेवा भरतीला सुरुवात

पुणे – जिल्हा परिषदेकडील विविध 714 रिक्‍त पदे सरळसेवेने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या एकूण पदांपैकी 10 टक्‍के म्हणजेच 74 पदे ग्रामपंचायत कर्मचारी सेवा ज्येष्ठता यादीमधून शैक्षणिक अर्हतेनुसार व सेवा ज्येष्ठतेनुसार भरली जाणार आहेत. ही प्रक्रिया पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये पूर्ण होणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. लोकसभा निवडणूक आचारसंहिता आणि त्यानंतर पुन्हा … Read more

जात प्रमाणात अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सरकारी नोकरी

मुंबई : राज्य सरकारच्या सेवेतील अनुसूचित जमाती, अन्य जाती प्रवर्गातील ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जात प्रमाणपत्रे कालानुरूप अवैध ठरली अशा कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित न करता त्यांना सेवेतच ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने शासन निर्णयही शनिवारी जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांत जातीचे प्रमाणपत्र सादर करून अनेक … Read more