चारचौघात कंगनाच्या कानशिलात लगावणारी कुलविंदर नेमकी कोण ? दोन लहान मुले; पतीदेखील CISF जवान, वाचा….

Kangana Ranaut : कपूरथला बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचलमधून निवडून आलेली खासदार कंगना रणौत हिला चंदिगड विमानतळावर सीआयएसएफ महिला कर्मचारी कुलविंदर कौर हिच्याकडून कानशिलात लगाविण्यात आली. त्यानंतर कुलविंदरला आता ताब्यात घेण्यात आले आहे. कंगनाच्या शेतकऱ्यांबद्दलच्या वक्तव्यावर महिला कर्मचारी संतापल्याचे सांगण्यात येते. कुलविंदर कौर ही पंजाबमधील कपूरथला येथील रहिवासी आहे. कुलविंदर कौरचा विवाह 6 वर्षांपूर्वी जम्मूमध्ये झाला … Read more

Kangana Ranaut । कंगनाला मारणाऱ्या CISF महिलेचं ऑलिम्पिक विजेता खेळाडूने केलं कौतुक; ट्विट चर्चेत….

Kangana Ranaut । Bajrang Punia : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावतला चंदीगड विमानतळावर महिला CISF जवानाने कानाखाली मारली. शेतकरी आंदोलनादरम्यानच्या कंगना राणावतच्या वक्तव्यामुळे महिला संतप्त झाली होती. त्यांनी सांगितले की, त्यांची आईही शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलन करायला बसली होती. कंगना राणावतला कानाखाली मारल्यानंतर सीआयएसएफ कर्मचारी कुलविंदर कौर म्हणाल्या, “शेतकरी तिथे 100 रुपयांसाठी बसले आहेत, … Read more

Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत कंगना राणावत विजय; पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाली….

Lok Sabha Election 2024 | Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने पहिल्या निवडणुकीतच विजय मिळवला आहे. भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. मंडी मतदार संघात कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते. कंगना रनौत यांनी मंडी लोकसभा जागेवर जोरदार प्रचार केला आणि विजय मिळवला. अभिनेत्रीची ही … Read more

संसदेच्या आवारात कंगनाला करायचे आहे ‘इमर्जन्सी’ सिनेमाचे शूटिंग; लोकसभा सचिवालयाकडे मागितली परवानगी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून वेळ आहे, मात्र त्याआधी चित्रपटाचा टीझर आणि महत्वाच्या कलाकारांचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातील अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेते अनुपम खेर, श्रेयश तळपदे यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतंच अभिनेत्री कंगनाने संसदेच्या आवारात तिच्या … Read more

कंगना राणावत साकारणार ‘चंद्रमुखी’ची भूमिका; सिक्वेलबाबत दिली महत्वाची माहिती, ‘या’ दिवशी सुरू होणार शूटिंग….

मुंबई – बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणावत आपल्या परफेक्शनसाठी ओळखली जाते. फॅशनसोबतच कंगना आपल्या कामाच्याबाबत नेहमीच सिरिअस असते. कंगना सध्या आपल्या अपकमिंग ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. अश्यातच आता कंगनाने तिच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली असून, या संदर्भातील एक पोस्ट देखील तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्री कंगना बहुचर्चित “चंद्रमुखी’ या तमिळ चित्रपटाच्या सिक्वेल मध्ये … Read more

कंगना राणावतकडे 6 महिन्यांपासून नाही काम; टॅक्‍स भरण्यासाठी ही पैसे नाही शिल्लक

आपल्या सडेतोड वक्‍तव्यांमुळे कंगना राणावत नेहमी चर्चेत असते. स्वतःला सर्वाधिक जास्त टॅक्‍स भरणारी ऍक्‍ट्रेस म्हणवते. मात्र, गेल्या 6 महिन्यांपासून ती टॅक्‍स भरू शकलेली नाही. तिने स्वतःच याबाबतचा खुलासा केला आहे.  टॅक्‍स न भरू शकण्याचे कारण म्हणजे तिच्याकडे गेल्या 6 महिन्यांपासून कोणतेही काम नाही. त्यामुळे तिच्याकडे खूप पैशांची तंगी आहे. कंगना सर्वाधिक टॅक्‍सच्या श्रेणीमध्ये येते. आपल्या … Read more

पसरली पिवळ्या रंगाची जादू; ‘क्वीन’ कंगनाच्या क्लासी लूकवर चाहते घायाळ…

मुंबई – गेल्या काही काळापासून सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारी  बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री ‘कंगना रणावत’ सोशलवर चांगलीच सक्रिय असते. नुकतंच कंगनाला मनकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी आणि पंगा या चित्रपटांतील अभिनयाबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सोशल मीडियावर कंगना राणावतचा स्टायलिश आणि क्लासी लूक पहायला मिळतो. कंगना सिनेसृष्टीत सौंदर्य आणि ड्रेसिंग सेन्समुळे खासकरून ओळखली … Read more

कंगना ईमेल प्रकरण: उद्या होणार मुंबई पोलिसांकडून हृतिकची चौकशी, वाचा सविस्तर बातमी…

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. कंगनाने गतवर्षी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हृतिक रोशनवर हल्लाबोल करताना त्याच्यावर थेट फसवणुकीचा आरोप लावला होता. तसेच कंगनाने हृतिक आणि आपल्यामध्ये काही ईमेल्सच्या माध्यमातून संवाद झाल्याचे देखील सांगितले. त्यावेळी थेट प्रसिद्धी माध्यमांसमोर कंगनाने हृतिकवर आरोप लावल्याने बॉलिवूडमध्ये मोठे वादंग देखील उठले होते. दरम्यान, … Read more