पिंपरी | राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुदत वाढवावी – श्रीराम पुरोहित

कर्जत, (वार्ताहर) – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वागतार्ह असून त्यामुळे चांगले विद्यार्थी घडतील यात शंका नाही. मात्र, शासनाने त्यामधील काही गोष्टींचे स्पष्टीकरण दिल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात अडचण येणार नाही. 34 वर्षांनी येणारे हे धोरण 2040 पर्यंत असणार असे. त्यामुळे शासनाने हरकती सुचविण्यासाठी दिलेली 3 जून 2024 ही अंतिम तारीख खूप मर्यादित असून ती वाढवून द्यावी. तसेच … Read more

nagar | दूध उत्पादकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील राहणार

कर्जत (प्रतिनिधी): दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन जय श्रीराम दूध संकलन केंद्राचे संचालक चेअरमन अनिल गांगर्डे यांनी केले. तालुक्यातील कोंभळी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती अचूक भरून शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी चांगले काम केल्याबद्दल परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून अनिल गांगर्डे यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी ते बोलत होते. चेअरमन अनिल गांगर्डे म्हणाले … Read more

पिंपरी | घरकुल योजना राबविण्याची अधिकाऱ्यांची ग्वाही

कर्जत, (वार्ताहर) – कर्जत नगरपरिषद हद्दीतील भिसेगावातील आदिवासी वाडीत राहणाऱ्यांना घरकुल योजना द्या, म्हणत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. याबाबत उपविभागीय कार्यालय आणि नगरपरिषद कार्यालयात अमोघ कुळकर्णी सह सर्व महिलांनी निवेदन दिले होते. तीन दिवसांनी संबंधित अधिकारी वर्गाने आदिवासी वाडीत भेट देऊन त्यांची मागणी मान्य केली. त्यामुळे तात्पुरता बहिष्कार उठण्यात आला आहे. भिसेगावातील आदिवासी वाडीत … Read more

पिंपरी | कर्जतमध्ये सापडले प्राचीन मंकाळा खेळाचे अठरा कोरीव पट

कर्जत, (वार्ताहर) – कर्जत तालुक्यातील मोठे वेणगावच्या उत्तरेला दहिवली गावाच्या वेशीवरील शेवटची देवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या जाखमाता परिसरात प्राचीन खेळ मंकाळाचे तब्बल अठरा कोरीव पट इतिहास अभ्यासक आणि संशोधक सागर मधुकर सुर्वे आणि नेत्रा गणेश कनोजे यांनी शोधून काढले आहेत. विद्यापीठाचा दहिवली गावाच्या वेशीचा प्रकल्प करत असताना हे दोघे जाखमाता परिसरात संशोधन करण्यासाठी गेले होते. … Read more

nagar | कन्नडची मालमत्ता जप्त केल्यावर कर्जत का बंद नाही ?

कर्जत, (प्रतिनिधी): औद्योगिक वसाहतीचा सदोष प्रस्ताव शासनाने नाकारला तरी कर्जत बंद ?, शासनाने आता कोंभळी येथील जागेसाठी तत्वतः मंजुरी दिली तरी कर्जत बंद ?, कोणावर ईडीची कारवाई झाली तरी कर्जत बंद ?, कर्जत बंद करणाऱ्या बंद बहाद्दरानी कन्नड साखर कारखान्याची मालमत्ता इडीने जप्त केल्यावर कर्जत बंद का केले नाही ? असा सवाल करत आ. प्रा. … Read more

nagar | नवनिर्वाचित नोटरी पब्लिक सदस्यांच्या सन्मान

कर्जत, (प्रतिनिधी) : कर्जत न्यायालयात सेवा देणाऱ्या विधिज्ञांची भारत सरकार नोटरी पब्लिक सदस्यपदी निवड झाली. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कर्जत शहर यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात सन्मान करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कैलास शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. … Read more

पिंपरी | कळंब येथे साडेनऊ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण

कर्जत,(वार्ताहर) – कळंब जिल्हा परिषद वार्डात ९ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा आणि लोकार्पण जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत खांडस, अंभेरपाडा आणि नांदगाव हद्दीतील ही कामे होणार आहेत. या वेळी १२ विकासकामांमध्ये काठेवाडी, पादीरवाडी सरस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी रुपयाचा निधी, खांडस, अंभेरपाडा रस्त्यासाठी १ … Read more

nagar | कर्जतमध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

कर्जत, (प्रतिनिधी) – कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या वतीने साहित्यिक, वैद्यकीय, शैक्षणिक व राजकीय अशा विविध क्षेत्रातील महिलांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. साहित्यिक क्षेत्रातील प्रसिद्ध कवयित्री स्वाती पाटील, वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉ.जयश्री मुळे, राजकीय क्षेत्रातील चांदे बुद्रुक गावच्या आदर्श सरपंच पूजा सूर्यवंशी आणि कर्जत पंचायत समितीच्या गटशिक्षणाधकारी उज्वला … Read more

नगर | बेलगाव शाळा तालुक्यात प्रथम

कर्जत, (प्रतिनिधी) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये जि. प. प्राथमिक शाळा बेलगावने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सदर शाळा डिजिटल शाळा, वाचनालय , क्रीडांगण , गुणवत्ता, परसबाग, बगीचा, खेळणीने समृद्ध असून शाळेत CSR च्या माध्यमातून मल्टी पर्पझ हॉलचे 27 लाखांचे काम झाले आहे. विद्यार्थी गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांचा प्रत्येक उपक्रमात … Read more

नगर | समर्थ विद्यालय जिल्ह्यात द्वितीय, तालुक्यात प्रथम

कर्जत, (प्रतिनिधी) : समर्थ विद्यालय हे आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असतानाच मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत समर्थ शाळेला तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याबद्दल शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समर्थ विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी यांचे संस्थाध्यक्ष नामदेव राऊत, सचिव वैभव छाजेड, संस्था निरीक्षिका उषा राऊत, … Read more