“कर्नाटकात काँग्रेसचा नाही तर पाकिस्तानचा विजय झालाय का?”, नितेश राणेंचा सवाल

मुंबई – कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 135 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे अर्थातच काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर दुसरीकडे भाजपला केवळ 65 जागा जिंकता आल्या आहेत. या निकालानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी कर्नाटकातील विजय पाकिस्तानचा विजय असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले की, “कर्नाटकातील विजय हा पाकिस्तानचा … Read more

कर्नाटकमधून परिवर्तनाची सुरुवात – आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर – कर्नाटकमधील विजय हा मोठा असून, तो जनतेचा विजय आहे. भाजपने सुरू केलेले दहशतीचे आणि जातिभेदाचे राजकारण नागरिकांना मान्य नसून, कर्नाटक विधानसभा निकालाने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी कॉंग्रेस सरकारची गरज असून, भाजपची आता घसरण सुरू झाल्याचे प्रतिपादन आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या विजयाचा आनंद संगमनेरमध्ये कॉंग्रेसच्या … Read more

खतम टाटा बाय बाय.! कर्नाटक निवडणुकीचे निकाल हाती येताच सोशलवर पडला मजेशीर मिम्सचा पाऊस…

मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकांची उत्सुकता अवघ्या देशाला लागून राहिली होती. आज या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. कर्नाटकात काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली असल्याचे आता स्पष्ट झाले असून, भाजपाचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत आहे. हे कल हाती आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्याचं दिसून आलं आहे. Prefect time to use @RahulGandhi meme … Read more

कर्नाटक निकालावर राहुल गांधी म्हणतात, ‘नफरत का बाजार बंद, मोहब्बतकी दुकाने शुरू…’

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचे कौतुक करताना दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे की नफरत का बाजार बंद हो गया है और मोहब्बतकी दुकाने शुर हो गयी है. आज या निकालानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही कर्नाटकच्या जनतेला जी आश्‍वासने दिली होती आणि ज्या पाच हमी दिल्या … Read more

Karnataka Election : ‘बाळासाहेबांच्या शापामुळे भाजपचा पराभव…’; ‘या’ बड्या नेत्याचा खोचक टोला

मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकांची उत्सुकता अवघ्या देशाला लागून राहिली होती. आज या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. कर्नाटकात काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली असल्याचे आता स्पष्ट झाले असून, भाजपाचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत आहे. हे कल हाती आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वातावरण बदलले असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, याच संदर्भात प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत … Read more

Karnataka Election : ‘भाजपचा अंतकाळ सुरू झाला आहे…’; अखिलेश यादव यांची जहरी टीका

लखनौ – कर्नाटकातील कॉंग्रेसच्या विजयावर प्रतिक्रीया देताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की “या निकालामुळे भाजपचा अंतकाळ आता सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत’. भाजपची नकारात्मक, भ्रष्टाचारी, जातीयवादी आणि श्रीमंताभिमुख राजनिती लोकांना पसंत नाही. त्याचेच त्यांना आता फळ मिळणार आहे असे ते म्हणाले. कर्नाटकचा निकाल म्हणजे नव्या भारताचा सकरात्मक कौल असून बेरोजगारी,भ्रष्टाचार, … Read more

डी.के.शिवकुमार यांना विजय मिळवल्यानंतर अश्रु अनावर; म्हणाले,”मी हे कधीही विसरू शकत नाही की…”

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून निवडणुकांचे कल समोर येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस चांगलीच आघाडी घेत आहे. त्यातच कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे १ लाख मतांनी विजयी झाले आहेत. यावेळी बोलताना त्यांना विजयामुळे अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. कर्नाटक काँग्रेसच्या विजयानंतर डी के शिवकुमार यांनी माध्यमांशी … Read more

“बजरंग बलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली”; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

मुंबई – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे. बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस 117 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 76 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये ‘काँटे की टक्कर’ असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर … Read more

कर्नाटक निवडणुक मतदान पूर्ण: कुमारस्वामी म्हणाले- ‘जेडीएस किंग ठरणार’

बंगळुरू – कर्नाटकात त्रिशंकू स्थितीचा अंदाज वर्तवण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी अतिशय महत्वपूर्ण भाष्य केले. आर्थिक चणचणीमुळे जेडीएसला 25 जागांवर फटका बसू शकेल. तसे असले तरी आमचा पक्षच किंग ठरेल, असा दावा त्यांनी केला. भाजप, कॉंग्रेस आणि जेडीएसमुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीला तिरंगी लढतीचे स्वरूप झाले. अर्थात, प्रमुख लढत भाजप आणि … Read more

“मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे “- देवेंद्र फडणवीस

बेळगाव : देशात सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीचे पडसाद राज्यातही उमटत असताना दिसून येत आहेत. दरम्यान,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इथे प्रचारासाठी पोहचले आहेत. त्यातच बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर एक विधान केले आहे, त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यात सत्ता संघर्ष सुरु असताना … Read more