Lok Sabha: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा लोकशाहीचा विजय, बारामुल्लामध्ये मतदानाचा विक्रम मोडला, आजपर्यंतचे सर्वाधिक मतदान

Baramulla all-time highest voter turnout: जम्मू आणि काश्मीरच्या जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्यांच्यासाठी लोकशाहीच्या महान उत्सवापेक्षा मोठे दुसरे काहीही नाही. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात बारामुल्ला लोकसभा जागेवर आज 59 टक्के मतदान झाले असून, यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढण्यात आले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या … Read more

पुणे: काश्‍मीर खोऱ्यात दसरा साजरा

पुुनित बालन यांच्या सहयोगाने “केपीएसएस’कडून उत्साहात आयोजन पुणे – काश्‍मिरी पंडित संघर्ष समितीने (केपीएसएस) यावर्षी दसरा उत्सवातून एकता आणि जातीय सलोख्याच्या अनोख्या रंगांनी खोरे उजळून टाकले. या दिमाखदार उत्सवादरम्यान, केपीएसएसचे अध्यक्ष संजय टिक्कू यांनी पुनित बालन यांचे त्यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी कौतूक केले. बालन यांनी दहन करण्यासाठी रावणाचा पुतळा आणि महत्त्वपूर्ण योगदान देऊन कार्यक्रमाला अभूतपूर्व भव्यता … Read more

काश्मीर खोऱ्यात हिंदूंच्या हत्या वाढताहेत, सुरक्षा देण्यात भाजप अपयशी – संजय राऊत

मुंबई – काश्‍मीर खोऱ्यात हिंदुंच्या हत्या वाढत आहेत त्यावरून शिवसेनेही भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या संबंधात बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे की, काश्‍मीर खोऱ्यात 1990 च्या दशकात जी स्थिती होती तशीच स्थिती आता तेथे निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाने काश्‍मिरी पंडितांच्या स्थितीचे भांडवल करून मते मिळवली. पण आता त्यांना … Read more

काश्‍मीरी पंडितांचे नायब राज्यपालांना निवेदन; काश्‍मीर खोऱ्यातून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी

श्रीनगर – काश्‍मीर मधील एका सरकारी सेवकाची दोन दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून हत्या करण्याचा प्रकार घडल्यानंतर काश्‍मीर पंडितांमध्ये पुन्हा संताप आणि भीतीची लाट पसरली असून त्यांची तेथील निदर्शने सुरूच आहेत. आज त्यांच्यावतीने राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना एक निवेदन पाठवण्यात आले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की प्रशासनाने काश्‍मीर खोऱ्यातील काश्‍मीरी पंडितांना अन्यत्र सुरक्षित … Read more

64 हजार 827 काश्‍मिरी पंडित कुटूंबांनी सोडले काश्‍मीर खोरे

नवी दिल्ली -पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे 1990 च्या दशकाच्या प्रारंभी 64 हजार 827 काश्‍मिरी पंडित कुटूंबांना काश्‍मीर खोरे सोडणे भाग पडले. ती कुटूंबे जम्मू, दिल्ली आणि देशाच्या इतर भागांत स्थायिक झाली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात संबंधित माहिती देण्यात आली आहे. काश्‍मिरी पंडितांच्या सर्वांधिक 43 हजार 618 कुटूंबांनी जम्मूत आश्रय घेतला. दिल्ली आणि लगतच्या भागांत 19 … Read more

काश्‍मीरी पंडितांसाठी ट्रॅन्झिट कॅम्प उभारणार

बारामुल्ला – काश्‍मीर पंडितांच्या 336 कुटुंबांसाठी काश्‍मीर खोऱ्यात एक ट्रॅन्झिट कॅम्प उभारण्यात येणार असून त्यासाठी 40 कोटी रूपये खर्च केले, जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज येथे बोलताना दिली. या कॅम्पचा पायाभरणी समारंभ आज सोनोवाल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. काश्‍मीर पंडितासाठी केंद्र सरकारने घेतलेले हे एक महत्वाचे पाऊल … Read more

काश्‍मिरातील चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद

श्रीनगर -भारत-पाकिस्तान सीमेवर आज चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.तर या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात गुरी भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा जवानांना त्यांच्या गुप्तचरांकडून मिळाली. त्यामुळे त्या गावाला सुरक्षा दलांनी वेढा दिला. त्यावेळी जवानांवर गोळीबार करून या दहशतवाद्यांनी तेथून पळ काढण्याच्या प्रयत्न केला,त्यावेळी झालेल्या चकमकीत … Read more

काश्‍मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-कश्‍मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत लश्‍कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले. नवीद अहमद भट उर्फ फुर्गन आणि अकिब यसीन भट अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. यातील नवीद हा कुलगाममधील कायमोह येथील आणि अकिब हा कुलगामधीलच वाहपोरा कायमोह येथील रहिवासी होता, असे जम्मू काश्‍मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी पत्रकारांना … Read more