काश्मिरी पंडित आजही निर्वासित छावण्यांत का?; ठाकरे गटाचा मोदी सरकारला सवाल

मुंबई – गेल्या चार वर्षांत काश्मीरमध्ये सातत्याने जवानांवर आणि पोलिसांवर निर्घृण हल्ले सुरूच आहेत आणि शेकडो जवानांना त्यात हौतात्म्य पत्करावे लागले. सामान्य जनतेवरही हल्ले झाले. मुख्य म्हणजे शांतता नांदत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात, मग निर्वासित छावण्यांत आजही काश्मिरी पंडित का राहत आहेत? त्या पंडितांची घरवापसी का होऊ शकलेली … Read more

काश्मीरशी संबंधित विधेयके सादर; पीओके निर्वासित अन् काश्मिरी पंडितांसाठी ३ जागा नामनिर्देशित

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन महत्त्वाची विधेयके मांडली. विधानसभेत विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी दोन जागा आणि पीओके विस्थापित लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी एक जागा नामनिर्देशित करण्याची तरतूद आहे. याशिवाय, राज्यातील ९० सदस्यीय विधानसभेत अनुसूचित जातीसाठी ७ जागा आणि एसटी प्रवर्गासाठी ९ जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना … Read more

मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत; घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना पुन्हा एकदा नजरकैदेत ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. यासोबतच काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीवरून मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “भारत सरकार काश्मिरी पंडितांची … Read more

“काश्‍मिरी पंडितांच्या खऱ्या यातना दाखवण्याची “त्यांच्यात” हिंमत नाही”

नवी दिल्ली – काश्‍मिरी पंडितांच्या खऱ्या यातना दाखवण्याची बॉलीवूडमधील बहुतांश लोकांची आजही हिंमत नाही. त्यामुळेच द कश्‍मिर फाइल्स चित्रपटाचे कौतुक करण्याची वेळ येते तेव्हा ते गप्प होतात, अशी टीका या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला असून समीक्षकांसह सर्वसामान्य रसिकांनी चित्रपटाची भरपूर प्रशंसा केली आहे. काश्‍मिरी पंडितांना … Read more

पुणे : काश्‍मिरी पंडितांसाठीच्या कोट्यात होणार वाढ

* मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नवीन फॉर्म्युला * मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरच निर्णय * उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती पुणे – काश्‍मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी राखीव कोटा ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता. आता हा प्रश्‍न अधिक चिघळल्याने या मुलांसाठी कोटा वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नवीन फॉर्म्युला ठरविण्यात येणार … Read more

काश्‍मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा : उद्धव ठाकरे

मुंबई – कश्‍मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्‍य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिली. काही दिवसांपासून कश्‍मिरी पंडित आणि हिंदूंचे “टार्गेट किलिंग’ कश्‍मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात अनेक कश्‍मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्‍मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. … Read more

काश्‍मिरी पंडितांनी खोऱ्यातून पलायन न करता काश्‍मिरातच राहावे; मुफ्ती नसीर उल इस्लाम यांचे आवाहन

श्रीनगर – काश्‍मीर खोऱ्यात पुन्हा काश्‍मिरी पंडित आणि हिंदुंना लक्ष्य करून त्यांच्या हत्या करण्याचा प्रकार वाढला असून या घृणास्पद प्रकारांचा श्रीनगरातील ग्रॅंड मुफ्ती नसीर उल इस्लाम यांनी निषेध केला आहे. या प्रकाराची कसून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली असून त्यांनी लोकांना काश्‍मीर खोऱ्यातील बंधुभावाचे वातावरण कायम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच काश्‍मिरी पंडितांनी किंवा … Read more

‘काश्मीर सोडा, नाहीतर मरायला तयार व्हा!’; दहशतवादी संघटनांकडून काश्मिरी पंडितांना धमकी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना दहशतवादी संघटनेने धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. ‘काश्मीर सोडा, नाहीतर मरायला तयार व्हा’, असे धमकी वजा पत्र लष्कर-ए-इस्लाम नावाच्या दहशतवादी संघटनेने पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवासांपूर्वीच राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर आता या धमकीमुळे काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण … Read more

काश्‍मीरी पंडितांचे नायब राज्यपालांना निवेदन; काश्‍मीर खोऱ्यातून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी

श्रीनगर – काश्‍मीर मधील एका सरकारी सेवकाची दोन दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून हत्या करण्याचा प्रकार घडल्यानंतर काश्‍मीर पंडितांमध्ये पुन्हा संताप आणि भीतीची लाट पसरली असून त्यांची तेथील निदर्शने सुरूच आहेत. आज त्यांच्यावतीने राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना एक निवेदन पाठवण्यात आले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की प्रशासनाने काश्‍मीर खोऱ्यातील काश्‍मीरी पंडितांना अन्यत्र सुरक्षित … Read more

हत्येच्या निषेधासाठी जम्मू-काश्‍मीरमध्ये काश्‍मिरी पंडितांची निदर्शने

श्रीनगर – काश्‍मिरी पंडित असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केल्याच्या घटनेने शुक्रवारी जम्मू-काश्‍मीर ढवळून निघाले. हत्येचा निषेध करण्यासाठी काश्‍मिरी पंडित समुदाय रस्त्यांवर उतरला. त्या निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा केला. त्या घडामोडींमुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. हत्येमुळे संतप्त झालेल्या काश्‍मिरी पंडित समुदायातील सदस्यांनी काश्‍मीरात विविध ठिकाणी निदर्शने केली. त्या निदर्शनांचे केंद्रस्थान … Read more