कात्रज चौकात कंटेनर खाली येऊन एकाचा मृत्यू

पुणे : कात्रज बायपास कडून देहूरोड ला जाताना सकाळी नऊच्या सुमारास बाराचाकी कंटेनर ( MH 43 Y 5137 ) व स्प्लेंडर मोटरसायकल नंबर ( MH 13 DP 8293 ) संतोष दिलीप तिखट ( रा. सोलापूर ) हे कंटेनरच्या पुढील डाव्या चाकाखाली आल्याने त्याच्या पोटावरून चाक गेल्याने ते खाली कोसळले या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ … Read more

PUNE: सुशोभीकरणावरील निधी झाडीझुडपात; कात्रज चौक परिसरातील रस्ते स्वच्छतेअभावी विद्रूप

कात्रज – दक्षिण पुण्याचेद्वार असलेल्या कात्रजकडून पुणे शहरांमध्ये प्रवेश करताना कात्रज चौकापासून पुढे रस्त्याच्या दुतर्फा महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या पदपथ व सायकल ट्रॅक आणि त्याच्या बाजूला सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या शोवभिवंत झाडांमध्ये गवत व इतर झुडपे वाढल्याने रस्त्याची दुतर्फा बाजू विद्रूप दिसत आहे. याकडे महापालिकेच्या छाटणी विभागाचे दुर्लक्ष असल्याने येथे लावण्यात आलेली शोभेची झाडे करपून गेली आहेत. स्वारगेट-सातारा … Read more

कात्रज चौकावर ‘अवजड भार’; नियमांचे उल्लंघन करीत वाहतूक, पोलिसांचे दुर्लक्ष

कात्रज – कात्रज चौक ते नऱ्हे गाव रस्त्यावर दररोज सकाळी मिक्‍सर व डंपर, हायवा अशा वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंद असूनही अवजड वाहने धावत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी विशिष्ट वेळेत अवजड वाहनांना बंदी असताना या सूचनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून पादचारी तसेच दुचाकी चालकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. … Read more

विजेचा खांब कोसळण्याचा धोका ! पुण्यातील कात्रज चौकातील भीषण स्थितीकडे महावितरणचे दुर्लक्ष

  कात्रज, दि. 10 (प्रतिनिधी) -कात्रज येथील कायम रहदारीचा असलेल्या शहराला जोडणाऱ्या संत खेतेश्‍वर चौक येथे कात्रज-कोंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मधोमध अनेक दिवसांपासून उच्च दाब विद्युत वाहक खांब वाकलेल्या स्थितीमध्ये असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे. मात्र, याकडे महावितरण विभागाचे दुर्लक्ष आहे. हा खांब चौकात कोसळल्यास विद्युत वाहकतारांमुळे मोठी दुर्घटना घडण्याचा धोका आहे. त्यामुळे हा … Read more

पुण्यातील कात्रज चौक ‘जॅम’

– धिरेंद्र गायकवाड कात्रज – पुणे महानगरपालिकेच्या बसेससाठी कात्रज चौकातील पिकअप पॉईंट रूंद करण्यात आल्याने या चौकामध्ये वाहतूक कोंडी सुरळीत होण्याऐवजी या थांब्याजवळ आता रिक्षांची गर्दी होऊ लागली आहे. किनारा हॉटेलजवळ तसेच जीएसपीएम कार्यालयासमोरील बस पिकअप पॉईंट येथेही अनेक रिक्षांसह अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहने थांबत असून अवैध प्रवासी वाहतुकीमुळे कात्रज चौक पुन्हा एकदा जॅम … Read more

कात्रज चौकात विनाचालक पीएमपीचा थरार

– तरुणाच्या धाडसामुळे मोठी जिवितहानी टळली पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसचा विनाचालक पीएमपी’चा थरार नागरिकांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास अनुभवला. या बसचा ब्रेक निकामी झाल्याने विनावाहक बस उतारावरुन सुमारे 100 मीटर अंतरावर गेली. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, दोन रिक्षांचे नुकसान झाले असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. … Read more