ग्रामपंचायत निवडणूक निकाल : भाजपच्या ताब्यातील खर्डा, साकतमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व

जामखेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील खर्डा, साकत ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने झेंडा फडकावला आहे. येथे  राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला. साकतमध्ये राष्ट्रवादी ५, भाजप ४ व दोन अपक्ष असे बलाबल आहे. आणि दोन बिनविरोध आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ७ झाले आहे. पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांचे दहा वर्षांपासून असलेली सत्तापालट झाली आहे. … Read more

जामखेड : खर्ड्याची प्रतिक्षा भुते उपजिल्हाधिकारीपदी

जामखेड (प्रतिनिधी) : उपजिल्हाधिकारीपदी प्रतीक्षा भुते हिची निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत तिने यश मिळवले. प्रतीक्षा ही जामखेड तालुक्यातील खर्ड्याची रहिवासी आहे. उच्च माध्यमिक व अभियांत्रिकी शिक्षण नगरमध्ये झाले.  कॅम्पस् इंटरव्ह्यूमध्ये निवड होऊनही ते नाकारून तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत यश मिळवले. ती सध्या नायब तहसीलदार म्हणून सांगली येथे कार्यरत आहे. याबद्दल तिचे … Read more

जामखेड : खर्डा येथे मावा बनवणाऱ्या दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

१४ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू व सुपारी जप्त जामखेड (प्रतिनिधी) : खर्डा येथील सुर्वे गल्ली व गवंडे गल्ली येथे मावा बनवणाऱ्या दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. या मध्ये एकुण चौदा हजार रुपयांचे सुगंधी तंबाखू व सुपारी सह इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी दोघाजणांनवर जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

सिध्दार्थनगर व साठेनगरमधील पाणी पुरवठा सुरळीत करा

जामखेड : खर्डा रस्ता परिसरात गटारीचे काम चालू असताना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जेसीबीच्या सहाय्याने तुटल्याने सिध्दार्थ नगर व साठे नगर मध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून जामखेड नगरपरिषदेला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा मुख्यधिकारी दखल घ्यायला तयार नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. याबाबत नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले आहे. खर्डा चौक ते … Read more