पुणे जिल्हा : गॅस चोरी करताना भीषण स्फोट ; खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

खेड : गॅसच्या कंटेनरमधून  गॅस चोरी करताना भीषण स्फोट  झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही चोरी सुरू असताना एकामागोमाग एक स्फोट झालेत. चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही घटना आज पहाटे पावणे पाच च्या सुमारास घडली. आग आटोक्यात आली असली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हा गोरखधंदा एका … Read more

पुणे जिल्हा : खेड तालुका कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. शिंदे

राजगुरूनगर – खेड तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) खेड तालुका कार्याध्यक्षपदी राजगुरूनगर वकील बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. देविदास शिंदे यांची निवड झाली आहे. अ‍ॅड. शिंदे यांना निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुका अध्यक्ष हिरामण सातकर यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.दीपक चौधरी, राजगुरूनगर … Read more

pune gramin : खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू; वेळेत मतदान करता येत नसल्याने मतदार आक्रमक

प्रतिनिधी – रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर –  खेड तालुक्यातील २५ पैकी १९ ग्रामपंचायती साठी मतदान सुरू असून दुपार नंतर तिन्हेवाडी व सातकरस्थळ ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया संत गतीने सुरू असल्याने मतदारांच्या केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत तर वेळेत मतदान करता येत नसल्याने मतदार आक्रमक झाले आहेत. खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून २५ … Read more

पुणे जिल्हा : खेड तालुक्‍यात इच्छुकांची मांदियाळी

ग्रामपंचायतींचा फड ऑक्‍टोबर हिटमध्ये तापला पंचवार्षिक 25 तर 21 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक थरार राजगुरूनगर – अत्यंत टोकाच्या राजकारणातून ग्रामविकासाची स्वप्न दाखविणाऱ्या लोकशाहीचा उत्सव म्हणून ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका ओळखल्या जातात. यंदा 5 नोव्हेंबरला खेड तालुक्‍यातील संवेदनशील व मातब्बर अशा 46 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिकसह पोटनिवडणुका होणार आहेत. ऐन ऑक्‍टोबर “हिट’मध्ये निवडणुकीचा “फड’ तापणार आहे. तालुक्‍यातील प्रमुख गावांमध्ये आपले वर्चस्व … Read more

Pune : खेड तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

पुणे :- खेड तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पावसाची स्थिती लक्षात घेऊन तसेच प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली असल्याचे खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी कळविले आहे. जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी भरती प्रकियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. पोलीस पाटील पदासाठी … Read more

SSC Exam Result : खेड तालुक्याचा दहावीचा निकाल ९६.५८ टक्के..

राजगुरूनगर (प्रतिनिधी) :- खेड तालुक्यातील(जिल्हा- पुणे) ८९ शाळांपैकी ३४ शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. खेड तालुक्याचा शेकडा निकाल ९६.५८ टक्के लागला. दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्यातील ६ हजार ७३४ विद्यार्थी बसले यापैकी ६ हजार ५०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २११८ विद्यार्थ्यांनी विशेष गुणावता मिळवली असून २४६९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १५७५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ३४२ … Read more

पुणे जिल्हा : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर येळवळी गावात ‘रस्ता’, पहा व्हिडीओ…..

राजगुरूनगर(रामचंद्र सोनवणे,प्रतिनिधी) :– देश प्रगतीपथावर गेला, स्वातत्र्यानंतर देशात अनेक क्रांती झाल्या. शिक्षण, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य अशा अनेक जीवनावश्‍यक सेवा सर्व गावात उपलब्ध झाल्या; मात्र खेड तालुक्‍यात असे एक गाव होते की ते या सेवा सुविधांपासून वंचित होते. मात्र, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे या गावाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जायला रस्ता … Read more

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेला खेड तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

आळंदी, – काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या हिंगोली जिल्ह्यात आहे. ही यात्रा राज्यातील चारच जिल्ह्यातून जाणार असली तरी राज्यभर ठिकाठिकाणी काॅंग्रेससह विरोधी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या भागात काही अंतर चालून भारत जोडो यात्रेचे समर्थन करत आहेत. आज खेड तालुक्यात राजगुरुनगर ते आळंदी भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला … Read more

पुणे जिल्हा : खेड तालुक्‍यात लम्पीचे 11 बळी

15 गावांमध्ये 244 जनावरांना लागण ः 20 अत्यवस्थ राजगुरुनगर – खेड तालुक्‍यात विविध गावांतील आतापर्यंत 11 जनावरांचा लम्पीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. तालुक्‍यात 15 गावांतील 244 जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली असून 20 पेक्षा जास्त जनावरे अत्यवस्थ आहेत. खेड तालुक्‍यात जनावरांना होणाऱ्या लम्पी आजाराला रोखण्यात सुरुवातीला पशुवैद्यकीय विभागाला यश आले आले होते; मात्र नंतर तालुक्‍यात … Read more

पुणे जिल्हा : खेड तालुक्‍यामध्ये “लम्पी’ने बाधित एकही जनावर नाही

पशुधन विकास अधिकारी डॉ. शेळके; जिल्हा परिषदेकडून लस उपलब्ध नाही; पण खासगी लसीकरण सुरू राजगुरूनगर – खेड तालुक्‍यात अद्यापपर्यंत एकही जनावर लम्पी आजाराने बाधित नाही, तालुक्‍यात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ योगेश शेळके यांनी दिली. देशात सर्वत्र गाय, म्हैस, बैल, रेडा यांना लम्पी स्किन डिसीज या व्हायरसची लागण … Read more