satara | वडूज परिसरात रामनवमी उत्साहात साजरी

वडूज, (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील वडूज परिसरात अनेक गावांत रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भजन, कीर्तन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाकेश्वर येथे सकाळी १० ते १२ या वेळेत हभप उमेश दशरथे यांचे रामजन्मावर कीर्तन झाले. या किर्तनात त्यांनी प्रभू रामचंद्राचा संपूर्ण चरित्र सांगताना विविध व्यावहारिक उदाहरणे दिली. तर लोकांनी प्रभू … Read more

पिंपरी | श्री विठ्ठल- रुक्मिणी माता मूर्ती स्थापनेचा शतकी वर्धापन

पिंपरी, (प्रतिनिधी) – श्री विठ्ठल तरुण मंडळ वरील आळी दापोडी येथे श्री विठ्ठल- रुक्मिणी माता मूर्ती स्थापनेचा १०० वा वर्धापन दिनानिमित्त शताब्दी कीर्तन महोत्सव २०२४ – अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून येत्या रविवारी (दि. २५) पर्यंत कीर्तन सेवा होणार आहे. या महोत्सवानिमित्त दररोज काकडा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, महिला भजनी मंडळांची भजनसेवा तसेच २५ … Read more

पाथर्डी| संत वामनभाऊंनी समाज सुधारण्याचे काम केले

पाथर्डी,(प्रतिनिधी): संत वामनभाऊंनी आयुष्यभर बैलगाडीतून प्रवास करून गावोगावी जाऊन लोकांना परमार्थाची शिकवण देत समाज सुधारण्याचे काम केले. कधी बुवाबाजी अथवा भोंदूगिरी न करता भाऊंनी अडाणी समाजाची उन्नतीसाठी कायम सर्वत्र भ्रमंती केली. नुसता उपदेश नाही दिला तर आपल्या कृतीतून महान कार्यामुळेच या संतांना आजही समाज विसरलेला नाही. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे हजारो ठिकाणी मोठ्या भक्तीभावाने भाऊ- … Read more

परदेशी कुटुंबाचं गायीवरील प्रेम; कीर्तन, महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करून साजरं केलं डोहाळे जेवण

मलठण – शेतकरी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे गाईची तसेच दावणीला असलेल्या इतर जनावरांची काळजी घेत असतात. शेतकरी आणि जनावरांचे प्रेम नेहमीच पाहायला मिळते. नुकतेच मलठण येथील भरतसिंह परदेशी यांनी देशी गोवंशाच्या पहिल्या वेताच्या गीर जातीच्या गायीचे डोहाळे जेवण मोठ्या धुमधडाक्‍यात केले आहे. या अनोख्या मुक्‍या प्रेमापोटी शेतकऱ्याच्या आस्थेची मलठण परिसरात चर्चा रंगली आहे. ग्रामीण भागात शेतीला … Read more

“सुनेनं सासू-सासऱ्याला आई वडिलांसारखं मानलं तर महाराष्ट्रातील वृद्धाश्रमं बंद होतील”

पळसदेव – महाराष्ट्रात मोठ्या संख्येने वृद्ध आश्रम वाढत आहेत. ही सगळी सुनांची पुण्याई मोठी आहे. घरात आलेल्या सुनेनं सासू-सासऱ्याला आई वडिलांसारखं मानलं व त्या प्रमाणे त्यांचा सांभाळ केला तर महाराष्ट्रातील वृद्ध आश्रम बंद होतील, असे मत हभप संतोष महाराज गाडेकर यांनी व्यक्‍त केले. पळसदेव येथे डॉक्‍टर हिंगमिरे यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आयोजित कीर्तनाच्या वेळी महाराज … Read more

“तीन गाण्यांसाठी तीन लाख घेते..” इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया म्हणाली,,”महाराजांविषयी मी काय…”

मुंबई – आपल्या लावणीमुळे धुमाकूळ घालत संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील हिची लोकप्रियता दिवसेंदिवस आणखीच वाढत आहे. गौतमीची प्रसिद्धी इतकी जास्त वाढली आहे की, कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी देखील गौतमीवर भाष्य केले. इंदुरीकर महाराज म्हणाले होते “कीर्तनकारांनी 5 हजार रुपये मागितले तर काय खरं आहे त्यांचं, असं म्हणतात. पण तिकडे तिची लाख रुपये देऊन तीनच … Read more

पुणे जिल्हा : सलग 12 तास 20 मिनिटांचे कीर्तन

बाजीराव बांगर यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद नारायणगाव – येथील मुक्ताई मंदिराच्या हॉलमध्ये हभप बाजीराव महाराज बांगर यांनी सलग 12 तास 20 मिनिटांचे कीर्तन केले. याची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात आली आहे. या रेकॉर्डसाठी शेमेरो मराठी बाणा चॅनलचे सर्किट हाऊस, प्रॉडक्‍शन दिग्दर्शक सुनील खेडेकर व समन्वयक प्रमोद रणनवरे यांच्या टीमने वर्ल्ड रेकॉर्ड … Read more

इंदुरीकर महाराज म्हणाले,”आम्ही भाग्यवान करोनाच्या दुसऱ्या लाटेत वाचलो पण तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच असणार…”

मुंबई : देशात सध्या करोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असून याआधी आलेल्या दोन लाटांमध्ये फार मोठं नुकसान सहन करावे लागले आहे. दरम्यान दुसऱ्या लाटेतून वाचलो असल्याने तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहोत. तुमचा आणि माझा जन्म नाही तर पुनर्जन्म आहे असे वक्तव्य ज्येष्ठ कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केले आहे. लातूरमध्ये आयोजित कीर्तनात बोलताना त्यांनी तिसरी लाट माळा … Read more

सामाजिक कार्यकर्ते अतुल तरवडेंच्या वतीने इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन

हडपसर – येथील समाजिक कार्यकर्ते अतुल नारायण तरवडे यांच्या वतीने गुरुवारी ( दि. २८ ) २०२१ रोजी ह.भ.प श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरवडे वस्ती, महंमदवाडी येथे सायंकाळी ८ ते १० यावेळेत ,सामाजिक कार्यकर्ते अतुल तरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोविड-१९ … Read more

आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा – इंदुरीकर महाराज

चिंबळी – आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा त्यांनी घालून दिलेल्या आदर्श मार्गदर्शनप्रमाणे वागल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत प्रबोनधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्‍त केले. निघोजे येथे माजी सरपंच दयानंद येळवंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने रक्‍तदान शिबिर आणि इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 160 जणांनी रक्‍तदान … Read more