पुणे जिल्हा | उड्डाणपुलावरील कठडा बनतोय अपघातांचा हॉट स्पॉट

थेऊर, (वार्ताहर)- कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठडे प्रवाशांना धोकादायक ठरत असून कठड्यांना धडकून अपघात होत आहेत. येथील सततच्या अपघातात काहींना आपला जीव गमवावा लागला आहे, तर कित्येकांना गंभीर इजा झाल्याने अपंगत्व आले आहे. त्यामुळे येथील कठड्यावर पिवळा दिवा (ब्लिंकर्स) बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. उड्डाणपुलावर असलेले कठडे धोकादायक बनले असून … Read more

पुणे जिल्हा : कुंजीरवाडीच्या सरपंचपदी हरेश गोठे बिनविरोध

लोणी काळभोर : बहुचर्चित कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हरेश शामराव गोठे हे बिनविरोध निवडून आले. कुंजीरवाडीच्या तत्कालिन सरपंच अंजू गायकवाड यांनी निवडणूक खर्चाचा हिशेब राज्य निवडणूक आयोगाला निर्धारीत वेळेत सादर केला नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. तसेच पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास तसेच ग्रामपंचायत सदस्य … Read more

कुंजीरवाडी हद्दीत करोना रुग्ण आढळल्याने खळबळ

थेऊर (प्रतिनिधी) : कुंजीरवाडी ता.हवेली हद्दीतील थेऊरफाटा जवळ असलेल्या एका वस्तीवरील ३५ वर्षाच्या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. शेवाळेवाडी ( ता. हवेली ) येथील एका खाजगी रुग्नालयात उपचार घेत असताना हा प्रकार उघडकीस आला असून हडपसर गाडीतळ येथील एका रुग्णालयातही या रुग्णाने उपचार घेतले असून त्याचे संपर्कात आलेल्यांची माहिती प्रशासन घेत आहे. कोरोनाची … Read more