कुवेतमध्ये संसद विसर्जित, राज्यघटनेचा काही भाग देखील स्थगित; सर्व सत्ताधारी अमिरांचा निर्णय

दुबई  – कुवेतमध्ये सत्ताधारी अमिरांनी संसद विसर्जित केली आहे. अलिकडच्या काळात राजकीय कोंडी निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शेख मेशाल अल अहमद अल जाबेर यांनी सरकारी दूरचित्रवाणीद्वारे दिलेल्या भाषणात ही घोषणा केली. राज्यघटनेतील काही तरतूदींच्या अंमलबजावणीलाही स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती किमान पाच वर्षांसाठी असेल, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्याचा तपशील … Read more

सीमा हैदर, अंजूनंतर आता दीपिकाची ‘love story’ आली समोर; पतीला “तुम्ही माझ्यामुळे दुःखी असता” म्हणत पळाली कुवेतला

नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून देशात काही प्रेम कहाण्या सुरु झाल्या आहेत. प्रियकरासाठी प्रेयसी देशाच्या सीमा ओलांडत आहेत. सर्वात अगोदर पाकिस्तानी महिला सीमा हैदर आपल्या प्रेमासाठी भारतात आली त्यानंतर भारतीय अंजु पाकिस्तनात जाऊन फातिमा बनली. हे एवढं कमी होत कि काय म्हणून आता भारताची आणखी एक महिला आपल्या प्रेमासाठी घर संसार मुलंबाळं सोडून परदेशात … Read more

Kuwait : कुवेतमध्ये एकाचवेळी 7 कैद्यांना फाशी

दुबई – कुवेतमध्ये एकाचवेळी 7 कैद्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. या कैद्यांना एकाचवेळी फाशी देण्यात येणार आल्याबद्दल कुवेतवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून टीका व्हायला लागली होती. मात्र या टीकेला न जुमानता कुवेतमध्ये या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. ज्या कैद्यांना आज फाशी देण्यात आली आहे, त्यांच्यावर पूर्वनियोजित हत्या आणि अन्य आरोप होते. या आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात … Read more

कुवेतमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला आग

दुबई  – कुवेतमधील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला आग लागली आहे. या आगीमुळे पसरलेल्या धुराचा त्रास झाल्यांने काही कामगारांना अस्वस्थ वाटायला लागले आहे. तर काही जणांना किरकोळ भाजले आहे, असे सरकारी मालकीच्या तेल कंपनीने म्हटले आहे. मिना अल अहमदी असे आग लागलेल्या तेलकंपनीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे नाव आहे. सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील किनाऱ्याजवळ पर्शियन आखातात हा … Read more

शेख नवाफ कुवेतचे नवे राजे

दुबई – आपल्या प्रदीर्घ राजवटीनंतर अलिकडेच निधन झालेले कुवेतचे दिवंगत राजे शेख सबाह अल अहमद अल सबाह यांच्या जागी कुवेतचे नवीन राजे म्हणून शेख नवाफ अल अहमद अल सबाह यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. ते दिवंगत राजांचे सावत्र भाऊ आहेत.ते 83 वर्षांचे आहेत. त्यांनी आज संसद भवनात झालेल्या एका कार्यक्रमात आपली सूत्रे स्वीकारत शपथ घेतली. आपल्या … Read more

कुवेतमधील 8 लाख भरतीयांचे वास्तव्य धोक्‍यात

दुबई- कुवेतमध्ये कार्यरत असलेल्या विदेशी कामगारांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठीचे विधेयक तेथील संसदीय समितीपुढे विचाराधीन आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यास कुवेतमधील सुमारे 8 लाख भारतीयांना तेथून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवणार आहे. कुवेतमधील स्थानिक प्रसार माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. “एक्‍स्पाट कोटा बिल’ नावाचे हे विधेयक घटनात्मक आहे, असा विचार नॅशनल असेंब्लीच्या कायदेशीर आणि प्रशासकीय … Read more