मान्सूनच्या वाटचालीस पूरक स्थिती; पुढील दोन-तीन दिवसांत वातावरण बदलणार

पुणे – नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) गेल्या 24 तासांपासून स्थिर असून, येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्राचा आणखीन काही भाग व्यापण्याची अपेक्षा आहे. सोबतच अरबी समुद्राचा दक्षिणेकडील भाग, लक्षद्वीप व केरळचा उर्वरित भाग, कर्नाटकचा काही भाग, तामीळनाडू व बंगालच्या उपसागराचा नैऋत्येकडील काही भाग व्यापण्यासाठी मान्सूनला अनुकूल वातावरण असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले. मान्सून … Read more

Lok Sabha Election 2024 : लक्षद्वीपमध्ये रंगणार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना; अजित पवार गटाने दिला उमेदवार

नवी दिल्ली -महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटाने लक्षद्विपमधील लोकसभेच्या एकमेव जागेसाठीचा उमेदवार जाहीर केला. त्यानुसार, सामाजिक कार्यकर्ते युसूफ टी.पी.यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. मावळत्या लोकसभेत मोहम्मद फैजल हे लक्षद्विप मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार आहेत. त्या गटाने फैजल यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसने याआधीच हमदुल्लाह … Read more

लक्षद्विपजवळ नौदलाचे जहाज आयएनएस जटायू तैनात

मिनिकोय (लक्षद्विप) – लक्षद्विपजवळ असलेल्या मिनिकोय या संरक्षणदृष्ट्या महत्वाच्या बेटाजवळ भारतीय नौदलाने आयएनएस जटायू हा नाविक तळ तैनात केला आहे. यामुळे संरक्षण दृष्ट्या महत्वाच्या लक्षद्विप बेटासह सागरी सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षणाला उपयोगी परिस्थिती निर्माण होऊ शकेल. याशिवाय हिंद-प्रशांत महासागरातील चाचेगिरीविरोधी उपाययोजनांसाठी आणि कारवाईसाठी हा नाविक तळ उपयोगी ठरणार आहे. अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील भागात सागरी मार्गांनी होणारी … Read more

Nagarjuna : ‘PM मोदींचा अपमान खपवून घेणार नाही…’; नागार्जूनने मालदीवला थेट सुनावलं

Nagarjuna : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच लक्षद्वीपला भेट दिली होती. या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरुन मालदीव आणि लक्षद्वीपची तुलना सुरू झाली. यानंतर पीएम मोदींनी देशवासियांना देखील लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. याची आता मालदीव सरकारला काळजी वाटू लागली. त्यानंतर मालदीवमधील मंत्री आणि नेत्यांनी पीएम मोदींवर टीका करण्यास सुरूवात केली … Read more

मालदीवमधील भारतीय लक्षद्वीपला येण्यास उत्सुक ! PM मोदींच्या भेटीनंतर बदलले चित्र

नवी दिल्ली – मालदीवमध्ये अनेक वर्षे रहात असलेले आणि नव्याने भेट दिलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की, ते आता पुढच्या वेळी लक्षद्वीपला भेट देतील. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात केलेल्या अपमानजनक टिप्पणीनंतर अनेक भारतीय सेलिब्रिटींसह भारतातील लोकांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. मालदीव या पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या देशाला भेट देत … Read more

Lakshadweep Tour : तुम्हा सुद्धा ‘लक्षद्वीपला’ फिरायला जायचं आहे? जाणून घ्या, खर्च आणि महत्वाचे नियम, प्रवास होईल सुखकर….

Lakshadweep Tour : गेल्या आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारतातील हा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश चांगलाच चर्चेत आला आहे आणि गुगल सर्चवरही ट्रेंड करत आहे. पीएम मोदींनी लक्षद्वीपच्या शांत वातावरणाचे आकर्षण म्हणून वर्णन केले आणि त्याचे भरपूर कौतुक केले. तसेच सोशल मीडियावर लक्षद्वीपचे काही अप्रतिम फोटो पोस्ट करून आपला अनुभव शेअर केला. फोटो … Read more

मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका; भारतीयांनी आतापर्यंत 10,500 हॉटेल बुकिंग, 5520 फ्लाइट तिकिटे केली रद्द

Maldives VS Lakshadweep Controversy: अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती. यानंतर त्यांनी लक्षद्वीप ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन देशवासियांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. मात्र, यादरम्यान मालदीवच्या काही नेत्यांच्या कमेंटमुळे मालदीव आणि लक्षद्वीपदरम्यान वाद वाढला. एकीकडे बॉयकॉट मालदीव सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला, तर दुसरीकडे लोक लक्षद्वीपचे फोटो शेअर करत … Read more

Ranveer Singh: लक्षद्वीपला पाठिंबा देताना रणवीरकडून घडली चूक; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Ranveer Singh: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लक्षद्वीप येथे काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. त्यांनी येथील फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केल होते. पीएम मोदींनी देशवासियांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. यावरून मालदीवमधील  मंत्र्यांनी भारताविरोधात केलेल्या अपमानजनक टीकेनंतर मालदीवविरोधात लाट उठली. यानंतर भारतातील सर्वच दिग्गजांपासून ते सामान्य लोकांनी लक्षद्वीप पर्यटनाला प्रोत्साहन देत मालदीवविरोधात आवाज … Read more

लक्षद्वीपवरील टीकेनंतर महानायक संतापले; मालदीवला उद्देशून म्हणाले, “भारत आत्मनिर्भर है..!’

Amitabh Bachchan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरुन आतामालदीव आणि लक्षद्वीपची तुलना सुरू झाली. यानंतर पीएम मोदींनी देशवासियांना देखील लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. याची आता मालदीव सरकारला काळजी वाटू लागली. मालदीवमधील मंत्री आणि नेत्यांनी पीएम मोदींवर टीका करण्यास सुरूवात केली. प्रकरणाबाबत मालदीवच्या एका … Read more

लक्षद्वीपला जाण्यासाठी कोणता मार्ग आहे ? 3 दिवसांत 7 हजार जणांनी केलं बुकिंग

Lakshadweep – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशात पर्यटनाला नवे पंख मिळाले आहेत. ऑल इंडिया टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटर असोसिएशन (एआयटीटीओए) च्या मते, लक्षद्वीपमध्ये बुकिंगसाठी गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात काॅल आले आहेत. गेल्या तीन दिवसांत लक्षद्वीपला जाण्यासाठी अनेकांनी बुकिंग केले आहे. लक्षद्वीपच्या पर्यटन आणि क्रीडा विभागानेही आपल्या राज्यात येणाऱ्या … Read more