ललित पाटील प्रकरण: ससूनच्या उपाहारगृहातील कामगाराचा जामीन फेटाळला

पुणे – ससून रुग्णालयातून अमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेला रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार रौफ रहीम शेख याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश व्ही. आर कचरे यांनी फेटाळला. ललित पाटील याचा साथीदार सुभाष मंडल सह रौफ रहीम शेख याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३० सप्टेंबरला अटक केली. पाटीलला रुग्णालयात दोन कोटी … Read more

पुणे बनले ड्रग्सचे स्लिपर सेल; माफियांना अभय कोणाचे?

पुणे – ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून, तब्बल ११०० कोटींचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी मोठ्या कष्टाने हे रॅकेट उद्ध्वस्त केले असले, तरी ललित पाटील प्रकरणानंतरही शहरात पोलिसांच्या नाकाखाली मेफेड्रोनची सर्रास विक्री सुरू असल्याने हे पोलिसांचे यश म्हणावे की अपयश, असा सवाल उपस्थित केला जात … Read more

Pune: आरोपींकडून 1100 कोटींचे मेफेड्रोन जप्त; 3 जणांंना अटक

पुणे : सोमवारी रात्रीपर्यंत गुन्हे शाखेच्या पथकांनी विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात छापा टाकला. हैदरने गोदामात मिठाच्या पोत्यात मेफेड्रोन लपविले होते. पोलिसांनी 100 ते 200 पोत्यांची तपासणी केली. रात्री उशीरापर्यंत ही तपासणी सुरू होती. पोलिसांनी हैदरने मिठाच्या पोत्यात लपविलेले 1100 कोटी मेफेड्रोन जप्त केले असून, जप्त केलेल्या 600 किलो मेफेड्रोनची किंमत 1100 कोटी रुपये असल्याची माहिती आयुक्त … Read more

PUNE: आरोप खोटे असल्याचा धंगेकरांचा दावा

पुणे – भाजपच्या आदेशानेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नंदकिशोर जगताप यांना शिविगाळ केल्याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन आमदार … Read more

PUNE: डॉ. ठाकूर यांना कोण पाठीशी का घालतेय? आमदार धंगेकर यांचा संतप्त सवाल

पुणे – ड्रग्ज तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर मोठे रॅकेट उघडकीस आले. त्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत या ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांंनी केलेल्या तपास आणि चौकशीत ससूनचे माजी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे देखील दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना देखील वैद्यकीय … Read more

पुणे : ललित पाटीलवर २ हजार ६०० पानांचे दोषारोपपत्र दाखल

– ससून रूग्णालय ड्रग्ज तस्करी पलायन प्रकरण पुणे – ससून रुग्णालयामधून पलायन केल्याप्रकरणी ड्रग्ज तस्कर ललित पाटील व ललितला पळून जाण्यास मदत करणाऱ्या सचिन वाघ या दोघांवर पोलिसांकडून तब्बल २ हजार ६०० पानांचे पुरवणी दोषाराेपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात यापूर्वी सहा जणांवर २ हजार २०० पानांचे … Read more

PUNE: डॉ. संजीव ठाकूर यांचा पाय आणखी खोलात

पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलवर ससून रुग्णालयात उपचार करताना जाणीवपूर्वक उशीर केल्याचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संजीव ठाकूर यांच्या जबाबातून समोर आले आहे. त्यामुळे डाॅ. ठाकूर आणखी अडचणीत सापडले आहेत. ललितवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर लगोलग शस्त्रक्रिया निश्चित कशी करण्यात आली? यामागचे कारण पोलिसांकडून शोधण्यात येत आहे. ललित पाटील प्रकरणात डाॅ. ठाकूर यांचा पुणे … Read more

डॉ. संजीव ठाकूर यांच्या अडचणीत वाढल्या; ललितला ससूनमध्ये आश्रय देणे पडणार महागात

पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये ससून रूग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या विरूध्द पुणे पोलिसांना ठोस पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे डॉ. ठाकूर यांच्या विरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांनी 5 जानेवारी रोजी संबंधीत विभागाच्या सक्षम प्राधिकरण अधिकार्‍याकडे त्याबाबत परवानगी मागितली आहे. पोलिसांनी उचललेल्या ठोस पावलामुळे डॉ. ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी … Read more

पुणेकरांनाही मिळावी मिळकतकरात सूट

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना आमदार रवींद्र धंगेकर. पुणे  – शनिवारवाडा परिसरातील 100 मीटर परिघात बांधकाम करण्यास केंद्रीय पुरातत्त्व विभागाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेक जुने वाडे मोडकळीस आले आहेत. याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा द्यावा. पुणे शहरातील 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या सदनिकांना मिळकत करातून सूट देण्यात यावी, … Read more

ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे सरकारमधील मंत्र्यांपर्यंत – आमदार रवींद्र धंगेकर

पुणे – ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणाचा सखोल तपास तातडीने झाला पाहिजे. या प्रकरणाचे धागेदोरे सरकारमधील मंत्र्यांपर्यंत पोहचलेले आहेत. त्यामुळे ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या ‘त्या’ मंत्र्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज हिवाळी अधिवेशन प्रसंगी केली. ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणाचा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्याने पाठपुरावा करीत … Read more