ललित पाटील प्रकरण: ससूनच्या उपाहारगृहातील कामगाराचा जामीन फेटाळला

पुणे – ससून रुग्णालयातून अमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेला रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार रौफ रहीम शेख याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश व्ही. आर कचरे यांनी फेटाळला. ललित पाटील याचा साथीदार सुभाष मंडल सह रौफ रहीम शेख याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३० सप्टेंबरला अटक केली. पाटीलला रुग्णालयात दोन कोटी … Read more

पुणे | “ससून’च्या पाच वर्षांच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “ललित पाटील प्रकरणापासून ससून रुग्णालयातील गैरकारभार सातत्याने समोर येत आहे. आता पुणे अपघात प्रकरणातही अल्पवयीन चालकाच्या रक्ताची चाचणी करताना ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी फेरफार केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी सातत्याने ससूनच्या व्यवस्थापनावर आरोप केले जात आहेत. त्यामुळे ससून रुग्णालय प्रशासनाच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढा,’ अशी मागणी … Read more

PUNE: ललित पाटीलप्रकरणी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र

पुणे – ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या एकूण १४ पैकी सहा आरोपींविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कार्यवाही केली आहे. दरम्यान, या प्रकरणात ससून रुग्णालयातल वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रवीण देवकाते याचाही सहभाग समोर आला असून, त्यालाही अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय ढोके … Read more

PUNE: आमदार धंगेकर यांचे ठिय्या आंदोलन; ललित पाटील प्रकरणात कठोर कारवाईची मागणी

पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, तसेच ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागण्या मांडत आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. अमली पदार्थ तस्करांवर सरकारने कठोर कारवाई करावी. केंद्रीय तपास यंत्रणेकडे … Read more

Lalit Patil case: ससूनचे डीन डॉ. ठाकूर यांना तत्काळ अटक करा – आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

पुणे – ड्रग माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालवत होता, हे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर हेच उपचार करत असल्याचे रजिस्टरमधील माहितीवरून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चुकीचे काम केले असताना डॉ. ठाकूर यांना निलंबीत करण्याचे सोडून राज्य शासन त्यांना पाठीशी घालत आहे, ही बाब दुर्देवी आहे. ठाकूर यांना … Read more

‘या’ कारणामुळे देवेंद्र फडणवीस जाणार ललित पाटील प्रकरणात चर्चेत असलेल्या ‘हॉटेल लेमन ट्री’मध्ये, वाचा….

Devendra Fadnavis – ड्रग माफिया ललित पाटील पलायण प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या हॉटेल लेमन ट्रीमध्ये (Hotel Lemon Tree) उद्या (बुधवार) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उतरणार आहे. ते येथील एका कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत. यामुळे पोलीस आणि ससून प्रशासनाची ते तेथे झाडाझडती घेणार का? हा चर्चेचा विषय ठरणार आहे. फडणवीसांनी ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणी प्रथमच … Read more