पिंपरी | अमेझॉन कंपनीच्या 48 लाखांच्‍या वस्‍तू चोरल्‍या

पिंपरी, (प्रतिनिधी) – अमेझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाइल व इतर महागड्या इलेक्‍ट्राॅनिक वस्तूंची वाहतूक करीत असताना कंटेनर चालकाने 48 लाख रुपयांच्‍या महागड्या वस्तू चोरून नेल्‍या. ही घटना 12 मार्च ते 14 मार्च याकालावधीत बेंगलोर ते आंबेठाण, पुणे या मार्गावर घडली आहे. अनुज सचिव तिवारी (वय 25, रा. वाघोली) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. … Read more

त्वरा करा.! ‘या’ कंपनीच्या लॅपटॉपवर मिळतोय तब्बल ‘इतक्या’ हजाराचा डिस्काउंट; कुठं आणि कसा ऑर्डर करायचा पाहा….

Dell 14 Inch Laptop । जर तुम्हीही नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी सर्वोत्तम वेळ ठरू शकते. कारण सध्या तुम्हाला त्यावर प्रचंड सूट मिळत आहे. हा लॅपटॉप तुम्हाला अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळू शकतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी … Read more

जॅकी श्रॉफ लिटिल चॅम्प स्पर्धकाला,’लॅपटॉप देणार अन् वीज बिल भरणार’

अभिनेता जॅकी श्रॉफ सध्या चर्चेत आहे. नुकतेच जग्गू दादा सिंगिंग रिअॅलिटी शो सा रे ग म प लिल चॅम्प्स ग्रँड फिनालेमध्ये पाहुणे म्हणून पोहोचले. यादरम्यान स्पर्धक हर्ष सिकंदरचा परफॉर्मन्स पाहून जॅकी श्रॉफ भावूक झाले, त्याला मिठी मारली. हर्षच्या कुटुंबाच्या आर्थिक संकटाबद्दल कळल्यानंतर, हर्षलला जॅकी श्रॉफ लॅपटॉप देण्याचे वचन देतात आणि एक वर्षासाठी इंटरनेट आणि वीज … Read more

Pune Crime : लॅपटॉप “हॅक’ करून खंडणी

पुणे  (संजय कडू) – सायबर गुन्हेगार सातत्याने नवीन पद्धत वापरून ऑनलाइन गंडा घालण्याचा प्रयत्न करत असतात. सेक्‍सटॉर्शनचे प्रकार उघड असतानाच आता आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांचे लॅपटॉप हॅक करून ते डिकोड करण्यात येत आहेत. त्यानंतर खंडणीची मागणी करण्यात येत आहे. ही खंडणीही क्रिप्टो (आभासी चलन) करन्सीच्या माध्यमातून केली जाते. अशा प्रकारचे … Read more

लॅपटॉप कशासाठी हवा आहे, हे आधी नक्की ठरवा…

लॅपटॉप-स्मार्टफोनची कितीही हवा असली तरी तास-दोन तास गांभिर्याने काम करण्यासाठी (किंवा गेम्स खेळण्यासाठीही) मोठा स्क्रीन सोयीचा असल्याने लॅपटॉप आपले स्थान टिकवून आहेत. लॅपटॉपचा विचार करताना त्यामधली समाविष्ट ओएस उर्फ ऑपरेटिंग सिस्टीम, स्क्रीनचा आकार, रिझोल्यूशन, बॅटरी लाइफ, सर्व्हिस सेंटर्सची संख्या आणि प्रमाण आणि खुद्द त्या लॅपटॉपचं वजन या बाबींकडे मुख्यतः लक्ष ठेवायला हवं. परंतु मुळात आपल्याला … Read more

कॉम्पिटिटर्स फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना लॅपटाॅप वाटप

पुणे – कॉम्पिटिटर्स फाउंडेशन सेवाभावी संस्थेमार्फत महाराष्ट्रातील विविध भागात शिक्षण घेत असलेल्या गरजु व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्ययनासाठी लॅपटॉप प्रदान कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार भोसले हे होते. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे सायबर सेक्युरिटी सेलचे उपमहानिरीक्षक हरीष बैजल सर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले ,” … Read more

मोबाईल स्क्रीनमुळे निद्रानाश

निद्रा ही जरी नैसर्गिक शारीरिक गरज असली तरीही गेल्या काही वर्षात त्याचं महत्त्व कमी झालं आहे. जनसामान्यांत त्याबद्दल अनेक गैरसमजुती आहेत. त्यावर सत्तरच्या दशकापासूनच सिनेमाची गाणे, झोप न येणे हे किती आनंददायी व प्रतिष्ठेचं आहे असे दर्शवितात. म्हणूनच निद्रा महत्त्वाची आहे असं वाटतच नाही. त्यातच अजून भर म्हणून गेल्या दशकात सोशल मीडिया व मोबाईल स्क्रीनमुळे … Read more

मोबाइल, लॅपटॉपने वाढतोय अंधुकपणा

मायोपिया आजाराचा धोका : वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होमचा परिणाम पिंपरी – शहरातील करोनाबाधितांची संख्या आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. मात्र या करोनाचा फटका फक्त बाधितांनाच नाही तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनाही बसला आहे. खासकरून मुलांना स्कूल फ्रॉम होम असल्याने त्यांचा जास्तीत जास्त वेळ लॅपटॉप व मोबाइलवर जात आहे. या स्क्रीन वेळेचा विपरीत … Read more

कोल्हापूर : लॅपटॉपवरून क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या एकास अटक

कोल्हापूर – आयपीएल क्रिकेट मॅचवर बॅटिंग घेणाऱ्या एकाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. उमेश नंदकुमार शिंदे (वय ३९, रा. आकाशवाणी केंद्राजवळ, सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तावडे हॉटेल परिसरातील एका हॉटेलमध्ये सांगली येथील उमेश शिंदे हा दुबईत सुरू असलेल्या … Read more

आरटीओ पेपरलेसचा फक्‍त “फुगवटा’

भ्रष्टाचारमुक्‍त आणि पारदर्शी कारभारही फक्‍त तोंडदेखला – संजय कडू पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयात सप्टेंबर 2014 पासून टप्प्याटप्प्याने ऑनलाइन कामकाजाला सुरुवात झाली. त्यावेळी दलालांचा त्रास वाचेल, कारभार भ्रष्टाचारमुक्‍त होईल आणि पारदर्शकता येईल, असे सांगण्यात आले. मात्र, जवळपास सर्व कामकाज पेपरलेस होऊनही कार्यालय दलाल मुक्‍त झालेले नाही आणि पारदर्शकताही आलेली नाही. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत प्रादेशिक … Read more