पुणे जिल्हा : आंबेगाव तालुक्याला अवकाळी पावसानाने झोडपले ; पिकांचे मोठे नुकसान , सहकार मंत्र्यांकडून आढावा

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात काल दुपारी तीन ते पाच च्या दरम्यान अतिवृष्टी व गारपटीने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान केले आहे यामध्ये कांदा बटाटा ज्वारी हरभरा लसूण टोमॅटो इत्यादी पिकांचा समावेश आहे. आज राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियोजित असलेले सर्व दौरे रद्द करून सातगाव पठारातील नुकसान झाले पिकांची पाहणी करण्यात … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

कोल्हापूर (प्रतिनिधी)- राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढलाय. धरण परिसरात गेल्या २४ तासात ६५ मिली मीटर पावसाची नोंद आहे. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पहाटे उघडले. सहा क्रमांकाचा दरवाजा पहाटे तीन वाजून १० मिनिटांनी तर तीन क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा पहाटे चार वाजून ५५ मिनिटाला उघडला. या दोन्ही दरवाजासह धरणातून मिळून ४२५६ क्युसेक … Read more

सातारा : कराड शहराला पावसाने झोडपले

कराड (प्रतिनिधी) – गुरूवारी दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने कराड शहराला अक्षरश: झोडपून काढले. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणीचपाणी साचले होते. गुरूवारी सकाळपासून हवेत उष्णता जाणवत होती. परंतु, पावसाचे चिन्ह कोठेच दिसत नव्हते. दुपारी तीनच्या सुमारास अचानक मुसळधार पावसास सुरूवात झाली. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. सुमारे अर्धा तास हा पाऊस पडत होता. मात्र, या … Read more

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

पुणे (प्रतिनिधी) : शहरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी चार ते साडेचार च्या सुमारास उपनगरांसह शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या पेठांमध्ये हा पाऊस झाला. तत्पूर्वी जोरदार सोसाट्याचा वारा सुटला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे शुक्रवारी आणि शनिवारी शहरातील विविध भागतील २०० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. … Read more