जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. सैन्य दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बिजबेहरा आणि अवंतपोरा या दोन ठिकाणी जोरदार चकमक झाली. यावेळी अवंतीपोरा भागात तीन दहशतवाद्याचा खात्मा झाला असून दोन्ही ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबाचा कमांडर … Read more

राज्य दहशतवाद विरोधी पथकाची काश्मीरमध्ये धडक कारवाई; ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंध असल्याच्या संशयावरुन तरुणाला अटक

नवी दिल्ली ; राज्य दहशतवाद विरोधी पथकाने जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन एका तरुणाला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे .  या अगोदरही एटीएसने या प्रकरणी पुण्यातील दापोडीतील एका तरुणासह तिघांना अटक केली होती. हे अरोपी देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाने दिली … Read more

पुण्यात ATSची मोठी कारवाई; लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या तरूणास अटक

पुणे – लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडी परिसरातून एका तरुणाला अटक केली. मोहम्मद जुनेद खान (वय , रा. दापोडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दरम्यान त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजय फरगडे … Read more

2006 बॉम्बस्फोट प्रकरण : मोहसीन पूनावाला याला पुण्यातून उचलले

गुजरात एटीएसची कारवाई  पुणे -अहमदाबादमधील कालुपुरा रेल्वेस्थानक परिसरात 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी मोहसीन पूनावाला याला गुजरात राज्य दहशतदवादी विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातून अटक केली. त्याला गुजरातला नेण्यात आले आहे. “या कारवाईसाठी गुजरात एटीएसने पुणे पोलिसांकडे मदत मागितली होती. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली आहे,’ अशी माहिती परिमंडळ-5 च्या पोलीस उपायुक्‍त नम्रता पाटील … Read more

तोयबाच्या म्होरक्‍यांशी संपर्कात असलेल्या तरूणाला कर्नाटकमधून अटक

नवी दिल्ली – पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्‍यांशी संपर्कात असणाऱ्या तरूणाला कर्नाटकमध्ये अटक करण्यात आली. ती महत्वपूर्ण कारवाई राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केली. पाकिस्तानातून सक्रिय असणाऱ्या तोयबाच्या म्होरक्‍यांचे भारतविरोधी मनसुबे उघड करणारे एक प्रकरण काही महिन्यांपूर्वी समोर आले. सोशल मीडियाचा वापर करून तोयबाचे म्होरके त्यांच्या दहशतवादी संघटनेत तरूणांना भरती करण्यासाठी प्रयत्नशील होते. तरूणांना दहशतवादाच्या … Read more

लष्कर ए तोयबा ही आयएसआयशी संबंधितच

नवी दिल्ली, दि. 27 – पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय तेथील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाशी संबंधित असल्याची कबूली 2008च्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड डेव्हीड कोलमन हेडली याने दिली आहे. या हल्ल्यात अमेरिकन न्यायालयाने त्याला 35 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पाकिस्तानी अमेरिकन दहशतवादी या प्रकरणात माफीचा साक्षिदार होता. हेडलीने अमेरिकन आणि भारतीय अशा दोन्ही तपास … Read more

सीआरपीएफ पथकावरील हल्ला लष्कर ए तोयबाकडूनच !

श्रीनगर – श्रीनगर शहराच्या नोवगाम भागात सीआरपीएफच्या पथकावर जो हल्ला करण्यात आला तो हल्ला लष्कर ए तोयबाकडूनच करण्यात आल्याचा निष्कर्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काढला आहे. यात सैफुल्ला नावाचा पाकिस्तानी दहशतवादी सामील होता, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. आम्ही त्यांच्या मागावर असून त्यांचा लवकरच नायनाट केला जाईल, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान … Read more

लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घ्यालण्यात यश आले आहे. दुसरीकडे शोपिया येथे सचिवालयात तैनात असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भागात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. अबु रिहान आणि अदिल रशिद भट असे ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे नाव आहे. पोलीस … Read more

लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमध्ये काल रात्री झालेल्या एका चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीमध्ये पोलीस उपनिरीक्षक शहीद झाला.  दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या जवळ पांथा चौक भागातील पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका नाक्‍यावर गोळीबार केला. त्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली होती. हे दहशतवादी मोटरसायकलवरून आले होते आणि सुरक्षा चौकीवर गोळीबार … Read more

काश्‍मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-कश्‍मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत लश्‍कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले. नवीद अहमद भट उर्फ फुर्गन आणि अकिब यसीन भट अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. यातील नवीद हा कुलगाममधील कायमोह येथील आणि अकिब हा कुलगामधीलच वाहपोरा कायमोह येथील रहिवासी होता, असे जम्मू काश्‍मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी पत्रकारांना … Read more