‘या’ देशात महिलांवर हिजाब सक्ती! कायदा मोडणाऱ्या महिलांना शवगारात मृतहेदांची स्वच्छता करण्याची शिक्षा

तेहरान : इराण सरकार महिलांवर हिजाब सक्तीचा कायदा लागू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.एवढेच नाही तर  हिजाब परिधान न करणाऱ्या महिलांना क्रूर अशा शिक्षादेखील देण्यात येत आहे. कठोर हिजाब कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या महिलांवर इराण सरकार शिक्षा देण्यासोबतच त्यांच्या मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करत आहे. कायदा मोडणाऱ्या महिलांना शवागारात काम करण्याची शिक्षा दिली जात आहे. फ्रान्सच्या … Read more

“कोणताही देश दोन कायद्यांवर चालू शकत नाही…’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भोपाळ – एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांसाठी वेगवेगळे नियम असू शकत नाहीत’ आणि कोणताही देश दोन कायद्यांच्या आधारे चालवू शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी संहितेचे समर्थन केले. मध्य प्रदेशात काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या “मेरा बूथ, सबसे मजबूत’ या मोहिमेचा एक भाग म्हणून … Read more

पेसासारख्या कायद्यांमुळे आदिवासी विकासाला गती – राज्यपाल कोश्यारी

नाशिक  : आदिवासी विकास योजनांमधून विकासाचे काम सुरू आहे, पेसासारख्या कायद्यांनी त्याला गती मिळाली आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. कळवण तालुक्यातील गुलाबी गाव (भिंतघर) येथील एकात्मिक आदिवासी जिल्हा प्रकल्पाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत बांधलेल्या आदिवासी … Read more

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात सुधारित कायद्यांची आवश्यकता – मंत्री अशोक चव्हाण

मुंबई : केंद्राचे नवे कृषी कायदे हमीभावाला हरताळ फासणारे व शेतकऱ्यांचे शोषण करणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी राज्यात सुधारित कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मंत्री चव्हाण यांनी यासंदर्भात राज्याच्या कृषी कायदे सुधारणा विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवले आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे होणारे … Read more

फ्रांस मध्ये नवीन सुरक्षा कायद्यांच्या विरोधात निदर्शने

पॅरीस – फ्रांस सरकारने सुरक्षेसाठी या देशात काही नवीन कायदे लागू करण्याची योजना आखली असून त्या कायद्यांना नागरीकांचा विरोध वाढत चालला आहे. आज पॅरीस मध्ये या कायद्यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या 95 नागरीकांना अटक करण्यात आली. निदर्शकांनी तत्पुर्वी मोठा हिंसाचारही केला. त्यात सुरक्षा बंदोबस्तास असलेले तब्बल 65 सुरक्षा रक्षक आणि अधिकारी जखमी झाले आहेत. फ्रांस सरकारचे … Read more

…तर राहुल गांधी ‘त्या’ आंदोलनातही तोंडावर आपटणार

मुंबई – केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे; तर देशाच्या भविष्यासाठी नव्या कृषी कायद्यांना विरोध करावाच लागेल. नोटाबंदी आणि जीएसटी हा शेतकऱ्यांवरील हल्ला होता. त्यापेक्षाही कृषी कायदे अधिक हानीकारक ठरणार आहेत, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘शेती वाचवा’ या आंदोलनात मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार. कृषी बिलाची … Read more

शेतकरी, मजुरांना उद्‌ध्वस्त करण्यासाठी बनवले कृषी कायदे

संगरूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून लहान व्यापारी आणि छोट्या उद्योजकांना संपवले. त्याच पद्धतीने शेतकरी आणि मजुरांना उद्‌ध्वस्त करण्यासाठी त्यांनी तीन नवे कृषी कायदे बनवले, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. पंजाबच्या संगरूरमधील सभेत बोलताना राहुल यांनी मोदी आणि त्यांच्या सरकारवरील शाब्दिक हल्ला आणखी तीव्र केला. मोदी यांच्या नेतृत्वाखालील … Read more

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांशी कॉंग्रेस करणार दोन हात

नवी दिल्ली – मोदी सरकारचे वादग्रस्त कृषी कायदे आपली सत्ता असणाऱ्या राज्यांत रद्दबातल ठरवण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. कृषी कायदे रद्द ठरवण्यासाठीच्या कायद्याचा मसुदा पक्षाने तयार केला आहे. मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी कृषी सुधारणांशी संबंधित तीन कायदे मार्गी लावले. त्या कायद्यांना तीव्र विरोध करत शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने ते कायदे वादग्रस्त ठरले आहेत. विरोधी … Read more

देशाच्या भविष्यासाठी कृषी कायद्यांना विरोध करावाच लागेल – राहुल गांधी

नवी दिल्ली – केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे; तर देशाच्या भविष्यासाठी नव्या कृषी कायद्यांना विरोध करावाच लागेल. नोटाबंदी आणि जीएसटी हा शेतकऱ्यांवरील हल्ला होता. त्यापेक्षाही कृषी कायदे अधिक हानीकारक ठरणार आहेत, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. वादग्रस्त ठरलेल्या कृषी विधेयकांवरून देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, राहुल यांनी देशाच्या … Read more

कामगार कायदे सौम्य करण्याविरोधात मजदूर संघ आक्रमक

नवी दिल्ली- कामगार कायदे सौम्य करण्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने बुधवारी देशव्यापी आंदोलन केले. करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या कामगारांना त्वरित वेतन देण्यात यावे, अशी मागणीही मजदूर संघाने केली आहे. भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरांसमोर आणि सरकारी कार्यालयांसमोर रस्त्यांवर उभे राहून लॉकडाऊनच्या काळात वेतन न देण्याविरोधात जोरदार … Read more