Rahul Gandhi | ‘लोकसभेतील विरोध पक्ष नेतेपद राहुल गांधींनी स्वीकारावे’; काँग्रेस नेत्यांची मागणी

Rahul Gandhi | Leader of Opposition | Lok Sabha Election 2024 – राहुल गांधी यांनीच आता लोकसभेतील विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी स्वीकारावी अशी जाहीर मागणी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी केली आहे. या पदासाठी ते एकदम रास्त व्यक्ती आहेत, ते देशातल्या १४० कोटी जनतेचा आवाज आहेत आणि त्यातून पक्षालाही बळकटीमिळेल असा दावा कॉंग्रेस नेते प्रतापसिंग बाजवा यांनी केला … Read more

तेजस्वी मुख्यमंत्री बनणार की विरोधी पक्षनेते? वाचा सविस्तर….

पाटणा -बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नेमके काय करणार याविषयीचा राजकीय सस्पेन्स शिगेला पोहचला आहे. नितीश यांच्या नव्या राजकीय खेळीनंतर विद्यमान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव नव्या भूमिकेत दिसतील. त्यामुळे ते मुख्यमंत्री बनणार की विरोधी पक्षनेते याविषयीच्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. नितीश पुन्हा भाजपशी मैत्री करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, त्यांनी स्वत: जाहीर भाष्य केलेले … Read more

“हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा”

नागपूर – विरोधी पक्षांकडून नेहमीच नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली जाते आणि सत्ताधारी मात्र त्याला गांभीर्याने घेत नाही. गेल्या काही वर्षांत आलेला अनुभव. आता पुन्हा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay wadettiwar ) यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान दोन दिवस वाढवा, अशी मागणी केली आहे. ( Shinde fadanvis sarkar ) १९५६ च्या राज्य … Read more

कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदावर भाजपकडून आर. अशोक यांची निवड

बेंगळुरू  – कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाच्या प्रश्‍नावर अखेर भाजपने निर्णय घेतला असून या पदावर आर. अशोक यांची निवड करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणूका होऊन आज जवळपास सहा महिने या पदावरील नियुक्ती रखडली होती. पण आता मात्र तो प्रश्‍न भाजपने मार्गी लावला आहे. दरम्यान, आर अशोक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप … Read more

“हसन मुश्रीफांसह 9 मंत्र्यांची हकालपट्टी करा” विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde fadanvis sarkar) येत्या 15 दिवसांत मंत्रिमंडळात असणाऱ्या 9 भ्रष्ट नेत्यांची हकालपट्टी करावी. अन्यथा 15 दिवसांनंतर त्यांच्याबाबतीतले भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही सादर करू, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. ज्या मंत्र्यांवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत, ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत अशा नेत्यांना मंत्रिमंडळातून … Read more

विजय वडेट्टीवारांची विरोधी पक्षनेतेपदी औपचारिक निवड; राहुल नार्वेकरांची घोषणा

मुंबई – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पडली. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद रिकामे झाले होते. यानंतर कॉंग्रेसने माजी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी औपचारिरक निवड केल्याची घोषणा केली. वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री … Read more

Maharashtra Govt : सर्वसामान्यांसाठी नेहमीच आवाज उठविणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

मुंबई :- महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीची घोषणा विधानसभेत केली. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, … Read more

Maharashtra : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी ‘विजय वडेट्टीवार’ यांची नियुक्ती

मुंबई :- विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर कॉंग्रेसतर्फे विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करायचे हा निर्णय कॉंग्रेसच्या हायकमांडकडे अडकलेला होता. अखेर दिल्ली हायकमांडने वडेट्टीवार यांच्यांकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपावली आहे. मात्र विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच असणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर कॉंग्रेसला विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद मिळणार … Read more

महाविकास आघाडीचा निर्णय : विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे; लवकरच करणार नावाची घोषणा… 

मुंबई :- राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर सभागृहातील संख्याबळाचे आकडे बदलले आहे. विरोधी बाकांवर ज्या पक्षाचे संख्याबळ सर्वाधिक, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. सध्या कॉंग्रेसकडे संख्याबळ सर्वाधिक असल्याने विधानसभेत कॉंग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार असल्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कॉंग्रेसकडून लवकरच विरोधी पक्षनेतापदी नावाची घोषणा करण्यात … Read more

विरोधी पक्षनेतेपदावर कॉंग्रेसचा दावा; नेमकं अशोक चव्हाण काय म्हणाले? वाचा…

मुंबई – राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. मात्र, अद्याप विरोधी पक्षनेता कोण? यावर मविआतील घटकपक्षांचे एकमत झाल्याचे दिसत नाही. कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीच याबाबत बोलताना अजूनतरी विरोधी पक्षनेतेपदाबाबत काहीही चर्चा झालेली नाही. मात्र, पक्ष घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले आहे. विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे … Read more